loading...

चालू घडामोडी : Daily Current Affiars 7 October 2019

loading...

भारत-बांगलादेशमध्ये 7 महत्त्वपूर्ण करार
 • ढाक्क्यामध्ये विवेकानंद भवनची उभारणी होणार, एलपीजी गॅस बांगलादेशहून आयात करण्यास मान्यता.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्या भेटीमध्ये एकूण सात महत्त्वपूर्ण करारांवर सहय़ा करण्यात आल्या.
 • भारतासाठी आवश्यक असणाऱया एलपीजीची आयात करण्यास मान्यता देण्यात आली असून तीन संयुक्त उपक्रमांचाही व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करण्यात आले.
 • या भेटीमध्ये भारतातील व बांगलादेशातील रोहिंग्यांच्या आसऱयाचा प्रश्न आणि भारतात सुरु असणाऱया एनआरसीविषयीही चर्चा झाली. या दोन्ही प्रश्न पूर्ण सहकार्य करण्याचे बांगलादेशने मान्य केले आहे. संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी याची माहिती दिली.

करार पूर्वोत्तर राज्यांसाठी अधिक लाभदायी :
 • लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना चार दिवसांच्या भारत दौऱयावर आल्या आहेत
 • वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होण्याकरता त्या भारतामध्ये आल्या आहेत.
 • दोन्ही पंतप्रधानांनी सात करारांवर स्वाक्षऱया करत तीन संयुक्त प्रकल्पांचे उद्घाटनही करण्यात आले.
 • पूर्वोत्तर राज्यांच्या विकासाच्या दृष्टीने हे करार महत्त्वाचे ठरणार आहेत.
 • बांगलादेशमधून आयात होणाऱया एलपीजीचे वितरण पूर्वोत्तर राज्यांमध्ये केले जाणार असल्याने तेथील नागरिकांना स्वस्त आणि सुलभतेने इंधन उपलब्ध होणार आहे.
 • चटगाव तसेच मंगला बंदरातून दोन्ही देशांमध्ये सुलभ वाहतुकीबाबतही करार करण्यात आला आहे.
 • फेना नदीतून वाहतूक सुरु करण्याचाही प्रस्ताव असून यामुळे त्रिपुराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे. याशिवाय बांगलादेश आणि भारताच्या किनाऱयावरील सुरक्षेकरता गस्तीकरार करण्यात आला आहे.

ढाक्क्यात विवेकानंद भवनची उभारणी करणार
 • सांस्कृतिक शैक्षणिक विकास परियोजनेअंतर्गत हैदराबाद आणि ढाक्का युनिर्व्हसिटीमध्ये आदानप्रदान करण्याचेही ठरवण्यात आले आहे.बांगलादेश, भारत औद्योगिक विकास परियोजनेतून कुशल कामगार आणि तंत्रज्ञ दोन्ही देशांसाठी तयार करण्यात येणार आहे.ढाक्क्यातील रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून तेथे विवेकानंद भवन उभारले जाणार असून या दोन महामानवांच्या जीवनापासून प्रेरणा घेत सामाजिक प्रगती साधली  जावी, असे उद्गारही दोन्ही पंतप्रधानांनी काढले.

रोहिंग्यांना मूळस्थानी पाठवण्यावर एकमत
 • दोन्ही देशांमध्ये चर्चेचा व काहीअंशी वादाचा विषय असणाऱया रोहिंग्या शरणार्थी तसेच एनआरसीच्या मुद्यांवरही सखोल चर्चा करण्यात आली.
 • पंतप्रधान मोदी यांनी रोहिंग्या शरणार्थींना अधिक काळ सांभाळणे भारताला शक्य होणार नसल्याचे स्पष्ट केले.
 • रोहिंग्यांवर आतापर्यंत सुमारे 120 कोटी रुपये खर्च झाला असून 40 हजारहून अधिक रोहिंग्या अनधिकृतपणे भारतात राहत असल्याचे सांगितले.
 • शेख हसिना यांनी हा मुद्दा मान्य करत रोहिंग्यांना अधिक स्थान देण्यापेक्षा त्यांच्या मूळस्थानी पाठवणे योग्य ठरेल, असे मत मांडले.

MCC ​​एमसीसी अध्यक्षपदी संगकारा
 • ऐतिहासिक मेरलिबोन क्रिकेट क्लबच्या (एमसीसी) अध्यक्षपदाची सुत्रे श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराने स्वीकारली आहेत.
 • या मानाच्या क्लबमध्ये अध्यक्ष होणारा संगकारा हा पहिला ब्रिटिशेतर खेळाडू ठरला आहे. गेल्या मे महिन्यातच मावळते अध्यक्ष अँथनी रेफर्ड यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत संगकाराच्या नावाची घोषणा केली होती.
 • ‘एमसीसीसारख्या अतिउच्च अन् मानाच्या क्लबचा अध्यक्ष होणे ही माझ्यासाठी सर्वोच्च आनंदाची बाब आहे.
 • एमसीसीचे मावळते अध्यक्ष रेफर्ड म्हणाले, ‘सध्याच्या घडीला एमसीसीच्या अध्यक्षपदासाठी संगकारापेक्षा सरस व्यक्ती असूच शकत नाही.
 • क्रिकेट या खेळाची ताकद आणि या खेळाची प्रेक्षकांना बांधून ठेवणारी उत्कंठा संगकाराला ठाऊक आहे.
 • एमसीसीच्या मार्फत क्रिकेटच्या प्रसारासाठी जे कार्य सुरू असते, त्याचा ब्रँडअॅम्बेसिडर म्हणून संगाकारा योग्य व्यक्ती आहे’.
 • १३४ कसोटींमध्ये श्रीलंकेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ४१ वर्षांच्या संगकाराचे एमसीसी क्लबशी असलेले नाते जुनेच आहे.

हिटमॅन' रोहित शर्माचा षटकारांचा नवा विक्रम
 • टीम इंडियाचा 'हिटमॅन' अशी ओळख असलेल्या रोहित शर्मा यानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीतील चौथ्या दिवशी षटकारांच्या नव्या विक्रमाची नोंद आपल्या नावावर केली आहे.
 • रोहित शर्माने आता कसोटी, वन डे आणि टी-२० या तिन्ही फॉर्मेटमध्ये एका-एका सामन्यात सर्वात जास्त षटकार ठोकण्याचा विक्रम केला. रोहित शर्माने २०१३ मध्ये खेळल्या गेलेल्या एका वन डे सामन्यात १६ षटकार ठोकले होते. त्यानंतर त्याने २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळताना टी-२० सामन्यात एकूण १० षटकार ठोकले होते.
 • रोहित शर्माने सध्या सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात आतापर्यंत १० षटकार ठोकले आहेत. याप्रकारे रोहित शर्माने भारताकडून खेळताना तिन्ही फॉर्मेटमध्ये एका-एका सामन्यात सर्वात जास्त षटकार ठोकणार तो एकमेव खेळाडू बनला आहे.
 • भारताने पहिल्या डावात ७ गडी गमावून ५०२ धावा केल्या होत्या. त्यानंतर पहिल्या डावाची घोषणा केली होती. भारताचा सलामीवीर मयंक अग्रवाल (२१५ धावा) आणि रोहित शर्मा (१७६ धावा) यांच्या खेळीमुळे भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर ५०२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

PMC बँक घोटाळाप्रकरणी ईडीने दाखल केला माहिती अहवाल
 • पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक (पीएमसी) घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने आर्थिक गुन्हे शाखेच्या एफआयआरवर आधारित आपला माहिती अहवाल दाखल केला आहे.
 • यापूर्वी पोलिसांनी याप्रकरणी हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या (एचडीआयएल) दोन संचालकांना अटक केली होती. त्याचबरोबर कंपनीची ३५०० कोटींची संपत्तीही जप्त केली आहे.
 • आर्थिक गुन्हे शाखेने ४३५५.४३ कोटी रुपयांच्या या बँक घोटाळ्यामध्ये सोमवारी एफआयआर दाखल केला होता. याप्रकरणी पोलिसांनी १७ लोकांविरोधात लुकआऊट नोटीसही प्रसिद्ध केली आहे. आरोपी राकेश वधावन आणि सारंग राकेश वधावन या पितापुत्रांना पोलिसांनी याप्रकरणी अटक केली आहे.
 • चौकशीत त्यांनी समाधानकारक उत्तरे दिले नसल्याने त्यांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले होते. या घोटाळ्यासंबंधी सर्वजणांची चौकशी केली जाणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
 • दरम्यान, पीएमसी बँकेच्या ग्राहकांना ३ ऑक्टोबर रोजी आरबीआयने दिलासा दिला. बँकेच्या ग्राहकांना रक्कम काढण्याची मुदत १०,००० रुपयांवरुन वाढवून ती २५,००० रुपये केली. सुरुवातीला आरबीआयने खातेधारकांना सहा महिन्यांत केवळ १,००० रुपयेच काढण्याला परवानगी दिली होती.

आरोग्यविम्याशिवाय अमेरिकेत प्रवेशबंदी
 • ट्रम्प प्रशासन हे आरोग्यविमा आणि वैद्यकीय खर्च करण्यास सक्षम नसलेल्यांना अमेरिकाप्रवेशावर बंदी घालणार आहे.
 • राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी याची माहिती दिली. ३ नोव्हेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
 • ट्रम्प यांच्या घोषणेनुसार, जे अमेरिकी आरोग्यसेवेवर भार बनणार नसल्याची खात्री देऊ शकतील त्यांनाच व्हिसा वितरित करण्याच्या सूचना वकिलातीमधील अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेत.
 • अमेरिकेत प्रवेश करणाऱ्यांनी येथील आरोग्यसेवेवर भार टाकून अमेरिकी करदात्यांना त्रास देता कामा नये, असे ट्रम्प प्रशासनाद्वारे जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

‘हिम विजय’: भारतीय लष्कराचा पहिला पर्वतीय युद्ध सराव
 • चीनच्या नियंत्रणाखाली असलेल्या तिबेट प्रदेशाच्या सीमेजवळ अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये भारतीय लष्कर पहिल्यांदाच ‘हिम विजय’ या नावाने आतापर्यंतचा सर्वात मोठा पर्वतीय युद्ध सराव आयोजित केला आहे. सरावाची सांगता 25 ऑक्टोबर 2019 रोजी होणार.
 • नियंत्रण रेषेपासून 100 किलोमीटर आत अरुणाचल प्रदेशातल्या पर्वतीय क्षेत्रात 14 हजार फूट उंचीवर नव्या प्रकाराचे युद्ध धोरण तपासण्यासाठी हा सराव आयोजित करण्यात आला आहे.सरावामध्ये प्रत्येकी 4 हजार सैनिक असलेले तीन गट तयार करण्यात आले आहेत.
 • या अभ्यासामध्ये नव्याने संकलित केलेल्या ‘इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप’ (IBG) या तुकडीची क्षमता तपासली जात आहे.