17 हजार पोलीसांची मेगाभरती आचारसंहितेच्या अगोदर होणार! Police Bharti 2024

Police Bharti 2024

महाराष्ट्र पोलीस भरती 2024: महाराष्ट्र राज्यातील राज्य राष्ट्रीय पोलीस जिल्हा शिपाई व कारागृह तसेच रेल्वे पोलीस शिपाई या पदांकरिता भरती प्रक्रिया लवकरच राबवण्यात येत आहे. राज्यातील पोलीस खात्यामध्ये 17000 पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. लोकसभा 2024 च्या निवडणुका प्रक्रिया सुरू होण्याअगोदर म्हणजेच आचारसंहितेच्या पूर्वी पुढील आठवड्यात भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे.

राज्यात विशेषतः प्रत्येक जिल्ह्याची लोकसंख्या वाढली आहे. त्याचबरोबर गुन्हेगारीत देखील वाढ होत असतानाही पोलिसांचे मनुष्यबळ मात्र कमी पडत असल्याने सध्या स्थिती ग्रह विभागाच्या नवीन आकृतीबंध मजकुरात आता नवीन पोलीस ठाणे स्थापन करण्याचा प्रस्तावही ग्रह विभागाकडे प्राप्त झाला आहे. याच अनुषंगाने सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी व तसेच मागील वर्षीच्या राहिलेल्या रिक्त जागा पूर्णतः भरून घेण्यात येणार आहेत.

17 हजार पोलीसांची मेगाभरती आचारसंहितेच्या अगोदर होणार!

Police bharti new gr 2024

मागील वर्षी भरती झालेल्या पोलिसांचे प्रशिक्षण आता सुरू झाले आहे ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान त्यांचे प्रशिक्षण संपल्यावर नवीन भरती झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणाला सुरुवात करता येईल.

आठवडाभरात पोलीस भरतीची जाहिरात एकत्रित प्रसिद्ध करण्यात येणार आहे, त्यानंतर जून जुलैमध्ये सर्व उमेदवारांची परीक्षा होईल. भरतीमध्ये पहिल्यांदा मैदानी चाचणी व त्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे. उन्हाळा असल्यामुळे उमेदवारांची मैदानी चाचणी जून जुलै घेतली जाणार आहे.

पहिल्यांदा मैदानी चाचणीचे आयोजन होणार…

उन्हाळा संपल्यानंतर जून जुलैमध्ये भरतीला सुरुवात होईल. एप्रिल मे महिन्यामध्ये उन्हाळा खूप जास्त प्रमाणात जाणवतो मैदानी चाचणी देणाऱ्या विद्यार्थ्यांना इजा पोहोचू नये याकरिता ग्राउंड चे नियोजन जून जुलै दरम्यान करण्यात येणार आहेत. अशी गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती.

पोलीस भरती रिक्त होणाऱ्या पदांची माहिती:

  • पोलीस शिपाई :10300
  • जेल पोलीस शिपाई : 1900
  • एसआरपीएफ शिपाई : 4800

एकूण 17000 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. मित्रहो तयारीला लागा आता नाही तर कधिही नाही.

माहिती सोर्स:- सकाळ न्यूज