loading...

चालू घडामोडी : Daily Current Affiars 8 July 2019

loading...
मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील आर्थिक पाहणी अहवाल राज्यसभेत सादर
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हा सर्वेक्षण अहवाल सादर केला. यामध्ये 2019-20 या आर्थिक वर्षातील जीडीपी दर 7 टक्के राहील, असा अंदाज बांधण्यात आला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत हा आर्थिक विकास दर अधिक आहे.

अहवाल :
 • खासगी गुंतवणूक वाढून जीडीपी दरात वाढ होण्याची शक्यता.
 • आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किमती कमी होऊ शकते.
 • निर्यातीवरील विकास दर कमी राहण्याची शक्यता.

जीडीपी दर :
 • 2018-2019 या आर्थिक वर्षात विकास दर 6.8 टक्के होता. त्याआधी 2017-18 मध्ये विकास दर 7.2 टक्के होता.

निवडणुकांमुळे विकासदरात घट :
 • देशात लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीतील निकालाच्या अनिश्चिततेमुळे जानेवारी ते मार्च या तिमाहीतील विकास दरावर परिणाम झाल्याचं अहवालात म्हटलं आहे. 
 • या तिमाहीत विकास दर केवळ 5.8 टक्के होता.

NASAच्या ‘क्यूरिओसिटी’ रोव्हरला मंगळावर मिथेनचा साठा
 • मंगळ ग्रहावर एका प्रयोगादरम्यान वातावरणामध्ये रेणूचे प्रमाण मोजत असताना NASAने पाठवविलेल्या ‘क्यूरिओसिटी’ नावाच्या रोव्हरला कल्पनेच्या विपरीत तेथे मोठ्या प्रमाणात मिथेन वायू उपलब्ध असल्याचे आढळून आले आहे.
 • संशोधकांना मिळालेल्या माहितीमधून असे निष्कर्ष निघाले की तेथे 21 पार्ट्स पर बिलियन या प्रमाणात मिथेन वायूची पातळी आहे,
 • मंगळ हा सूर्यमालेतला चौथा ग्रह आहे. त्याच्या तांबड्या रंगामुळे त्याला तांबडा ग्रह (किंवा लाल ग्रह) असेसुद्धा म्हटले जाते.
 •  हा तांबडा रंग त्याला आयर्न ऑक्साइडमुळे मिळाला आहे. सूर्यमालेतला सर्वांत उंच पर्वत ऑलिम्पस मॉन्स तसेच सर्वांत मोठी दरी व्हॅलेस मरिनेरिस मंगळावर आहे.

लोकसभेत ‘केंद्रीय शैक्षणिक संस्था (शिक्षक संवर्गात आरक्षण) विधेयक’ मंजूर
 • संसदेच्या लोकसभेत विद्यापीठात शिक्षकांच्या नियुक्तीमध्ये आरक्षणाच्या संदर्भातला ‘केंद्रीय शैक्षणिक संस्था (शिक्षक संवर्गात आरक्षण) विधेयक-2019’ मंजूर करण्यात आले आहे.
 • हे विधेयक आरक्षण देण्याच्या प्रस्तावासाठी विद्यापीठ किंवा महाविद्यालयाला एक विभाग गृहीत धरण्याऐवजी एक एकक बनविण्याचे प्रस्तावित करते. हे विधेयक सर्व केंद्रीय विद्यापीठांना लागू असेल.
 • या विधेयकान्वये देशातल्या 41 केंद्रीय विद्यापीठांमधील सुमारे 8,000 रिक्त पदे भरणार आणि सर्वसाधारण प्रवर्गामधील आर्थिकदृष्ट्या कमकुवत प्रवर्गासाठी 10% आरक्षण देखील दिले जाणार.

UGCचा संशोधनाला चालना देणारा ‘STRIDE’उपक्रम
 • भारताच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी भारतात संशोधनात्मक संस्कृती रुजविण्याच्या उद्देशाने विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) स्किम फॉर ट्रान्स-डिसिप्लीनरी रिसर्च फॉर इंडियाज डेव्हलपिंग इकॉनॉमी (STRIDE) नावाचा एक नवीन उपक्रम मंजूर केला आहे.
 • सामाजिकदृष्ट्या संबंधित, स्थानिक गरजांवर आधारित, राष्ट्रीय महत्त्वपूर्ण आणि जागतिक स्तरावर महत्त्वपूर्ण संशोधन प्रकल्पांना पाठिंबा देण्यासाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे. अर्ज प्राप्त करण्यासाठी योजनेचे संकेतस्थळ दि. 31 जुलै 2019 पासून सुरू करण्यात आले आहे.
 • ही योजना महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये संशोधन आणि अभिनव कल्पना याची संस्कृती रुजविण्यात बळकटी आणणार आणि सहकारी संशोधनासोबत भारताच्या विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये योगदान देण्यासाठी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मदत करेल. शिवाय, मानवता आणि मानवशास्त्र या क्षेत्रात बहु-संस्थात्मक जाळे उभारून शोध प्रकल्पांना निधी देखील पुरविला जाणार.

परकीय चलन साठ्याने 427.67 अब्ज डॉलरचा नवा उच्चांक गाठला
 • भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडे असलेल्या सोन्याचे मूल्य 22.958 अब्ज डॉलर या पातळीवर राहिले.
 • आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून निधी घेण्याचा विशेष हक्क असलेली पातळी 3 दशलक्ष डॉलरने वाढून 1.456 अब्ज डॉलरवर गेली.
 • निधीसह देशाचा साठा 7 दशलक्ष डॉलरने वाढून 3.361 अब्ज डॉलरवर पोहचला आहे.

परकीय चलन साठा म्हणजे काय?

👉अमेरिकन डॉलरमध्ये मोजल्या जाणाऱ्या 'परकीय चलन मालमत्ता'मध्ये 'नॉन युएस करन्सीज'च्या (म्हणजे युरो, ब्रिटिश पौंड, जपानी येन, ज्यामध्ये भारतीय रिर्झव्ह बँक आपला परकीय चलन साठा ठेवते) विनिमय मूल्यात होणारी घट किंवा वाढीचा परिणाम समाविष्ट असतो.

👉थेट गुंतवणूक, त्याचबरोबर शेअर बाजारात झालेली गुंतवणूक याचा विचार करून परकीय चलन विनिमय दरानुसार या साठ्यांचे मूल्यांकन केले जात असते.

👉परकीय चलन साठा केंद्रीय बँकासाठी महसूल मिळविण्याच्या प्रमुख स्रोतांपैकी एक आहेत, जे परकीय सरकारी रोख्यांमध्ये पैसे गुंतवितात आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि इतर सुरक्षित गुंतवणूकीच्या पर्यायांमध्ये देखील गुंतवणूक करतात.