चालू घडामोडी : Daily Current Affiars 13 July 2019

चालु घडामोडी वन लाईनर्स 13 जुलै 2019
● द्युती चंदनं रचला इतिहास; भारताला सुवर्णपदक भारताची आघाडीची धावपटू द्युती चंद हिने इटलीमध्ये सुरू असलेल्या ' समर वर्ल्ड युनिव्हर्सिटी स्पर्धेत' सुवर्णपदक पटकावले आहे.

● या स्पर्धेत तिनं १०० मिटर शर्यतीत सुवर्ण कामगिरी करीत भारताला अवघ्या ११.२ सेकंदात सुवर्णपदक मिळवून दिले आहे.

● फोर्ब्सच्या जगातील १०० महागड्या सेलिब्रिटीजच्या यादीत अमेरिकेची टेलर स्विफ्ट अव्वल स्थानी

● फोर्ब्सच्या जगातील १०० महागड्या सेलिब्रिटीजच्या यादीत कायली जेनर दुसऱ्या क्रमांकावर

● फोर्ब्सच्या जगातील १०० महागड्या सेलिब्रिटीजच्या यादीत कानये वेस्ट तिसऱ्या क्रमांकावर

● फोर्ब्सच्या जगातील १०० महागड्या सेलिब्रिटीजच्या यादीत लिओनेल मेस्सी चौथ्या क्रमांकावर

● फोर्ब्सच्या जगातील १०० महागड्या सेलिब्रिटीजच्या यादीत क्रिस्तियानो रोनाल्डो सहाव्या क्रमांकावर

● फोर्ब्सच्या जगातील १०० महागड्या सेलिब्रिटीजच्या यादीत नेयमार सातव्या क्रमांकावर

● फोर्ब्सच्या जगातील १०० महागड्या सेलिब्रिटीजच्या यादीत अक्षय कुमार ३३ व्या क्रमांकावर

● अमेरिकेच्या संसदेत ग्रीन कार्डवरील मर्यादा हटवण्यासंबंधी सादर करण्यात आलेले विधेयक मंजुर करण्यात आले आहे

● एकाच विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम मिचेल स्टार्कने आपल्या नावावर केला ( २७ बळी )

● २०२५ पर्यंत चीन १०० उपग्रह प्रक्षेपित करणार आहे

● २००६-२०१६ दरम्यान २७१ दशलक्ष भारतीयांना गरीबीतून मुक्त केले गेले : युएन अहवाल

● ५ ऑक्टोबर रोजी भारतातील पहिले  डॉल्फिन रिसर्च सेंटर पटना येथे सुरु करण्यात येणार

● विकास स्वरूप यांची परराष्ट्र व्यवहार मंत्रालयामध्ये सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली

● गुगल , फेसबुक या सोशल नेटवर्किंग साइट्सवर कर लागू करणारा फ्रांस पहिला देश बनला

● ५ वी भारत - युरोपियन युनियन उच्च-स्तरीय बैठक नवी दिल्ली येथे पार पडली


● यूएस - ऑस्ट्रेलिया संयुक्त सैन्य अभ्यास " Talisman Sabre " क्विन्सलँड मध्ये संपन्न

● यासार डोगु कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा तुर्की मध्ये आयोजित करण्यात आली

● आशियाई कनिष्ठ कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा थायलंड मध्ये आयोजित करण्यात आली

● आशियाई कनिष्ठ कुस्ती स्पर्धेत सचिन राणाने पुरुषांच्या ६० कीलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले

● २ री राष्ट्रीय ऊर्जा परिषद १२ जुलैपासून हैदराबाद येथे आयोजित करण्यात येणार आहे

● इजिप्तला इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या (आयएटीए) कार्यकारी समितीचे सदस्य म्हणून निवडण्यात आले

● जाॅर्डनने आनलाईन गेम " पबजी " वर पुर्णपणे बंदी घातली

● फ्लिपकार्टने अक्सिस बॅंक व मास्टरकार्डच्या सहकार्याने क्रेडिट कार्ड सुरू केले

● एचडीएफसी बँकेने मनीपाल ग्लोबल अकादमीसह " फ्यूचर बँकर्स " कार्यक्रम सुरू केला

● ड्रोन-आधारित स्थानिक सर्वेक्षण सुरू करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य बनले

● आय एस संधु यांची हस्तशिल्प हॅन्डलुम निर्यात महामंडळाचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली

● दिल्ली पोलिसांनी यावर्षी " ऑपरेशन मिलाप " अंतर्गत ३३३ मुलांना त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केले

● सेरेना विलियम्स २०१९ विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल

● सिमोना हालेप २०१९ विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल

● राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुरुषांच्या ६१ किलो वजनी गटात वी जेकाॅबने सुवर्णपदक पटकावले

● राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत महिलांच्या ६९ किलो वजनी गटात सुर्कना अडकने सुवर्णपदक पटकावले

● राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत महिलांच्या ६४ किलो वजनी गटात निरुपमा देवीने सुवर्णपदक पटकावले

● रॉजर फेडरर ३५० ग्रॅन्ड स्लॅम सिंगल्स मॅच जिंकण्याचा पहिला खेळाडू बनला आहे

● स्लिमाने चेनिन यांची अल्जीरियाच्या संसदेचे नवीन सभापती म्हणून नियुक्ती करण्यात आली

● २०१७-१८ या वर्षात शिक्षण क्षेत्रात  सर्वोत्कृष्ट परफॉर्मिंग राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या यादीत चंदीगड अव्वल स्थानी

● २०१७-१८ या वर्षात शिक्षण क्षेत्रात  सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यांच्या यादीत तमिळनाडू ५ व्या क्रमांकावर

● २०१७-१८ या वर्षात शिक्षण क्षेत्रात  सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यांच्या यादीत पंजाब ७ व्या क्रमांकावर

● २०१७-१८ या वर्षात शिक्षण क्षेत्रात  सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यांच्या यादीत अरुणाचल प्रदेश ३६ व्या क्रमांकावर

● अनधिकृत पॅकेजड ड्रिंक वॉटरची विक्री कमी करण्यासाठी रेल्वे पोलिस दलाने " Operation Thirst " सुरु केले

● केरळ सरकार कोटूरमध्ये भारतातील पहिले हत्ती पुनर्वसन केंद्र स्थापन करणार आहे .

Post a Comment

0 Comments