चालू घडामोडी : Daily Current Affiars 10 July 2019

भावना कांत लढा मोहिमेसाठी अर्हता प्राप्त करणाऱ्या प्रथम महिला लष्करी पायलट

 • भावना कांत ह्या मिग-२१ लढाऊ विमानावर दिवसाच्या मोहिमेसाठी पात्र होणाऱ्या प्रथम भारतीय महिला लष्करी पायलट बनल्या आहेत. 
 • त्यांना हि पात्रता मिग -21 बायसन विमानावरील लढाऊ पायलट म्हणून परिचालनात्मक अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मिळाली आहे.
 • राजस्थानमधील नल येथे फ्रंटलाइन एअरबेसमध्ये तैनात आहेत. भावना यांनी बेंगळुरू येथील एमएस महाविद्यालायतून बीई इलेक्ट्रिकलची पदवी घेतली. बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील घनश्यामपूरमधील बाऊर गावच्या आहेत.
 • भावना यांच्याव्यतिरिक्त मोहना सिंह आणि अवनी चतुर्वेदी या देखील फायटर पायलट बनल्या आहेत. भारतीय हवाई दलात सध्या ९४ महिला पायलट आहेत, पण त्या सुखोई, मिराज, जॅग्वॉर आणि मिग यासारखी युद्धविमाने उडवत नाहीत.

UGCचा संशोधनाला चालना देणारा ‘STRIDE’उपक्रम
 • भारताच्या सामाजिक-आर्थिक विकासासाठी भारतात संशोधनात्मक संस्कृती रुजविण्याच्या उद्देशाने विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) स्किम फॉर ट्रान्स-डिसिप्लीनरी रिसर्च फॉर इंडियाज डेव्हलपिंग इकॉनॉमी (STRIDE) नावाचा एक नवीन उपक्रम मंजूर केला आहे.
 • सामाजिकदृष्ट्या संबंधित, स्थानिक गरजांवर आधारित, राष्ट्रीय महत्त्वपूर्ण आणि जागतिक स्तरावर महत्त्वपूर्ण संशोधन प्रकल्पांना पाठिंबा देण्यासाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे. अर्ज प्राप्त करण्यासाठी योजनेचे संकेतस्थळ दि. 31 जुलै 2019 पासून सुरू करण्यात आले आहे.
 • ही योजना महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये संशोधन आणि अभिनव कल्पना याची संस्कृती रुजविण्यात बळकटी आणणार आणि सहकारी संशोधनासोबत भारताच्या विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये योगदान देण्यासाठी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मदत करेल.

‘नैसर्गिक भाषा भाषांतरण’ विषयक राष्ट्रीय मोहीम.
 • भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने “नैसर्गिक भाषा भाषांतरण’ विषयक राष्ट्रीय मोहीम” राबविण्याची योजना आखली आहे.
 • हा प्रस्ताव मंत्रालयाच्या 100 दिवसांच्या कृती योजनेचा एक भाग आहे. प्रकल्पासाठी पुढील तीन वर्षांसाठी 450 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. पंतप्रधान विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभिनवता सल्लागार परिषद (PM-STIAC) कडून याला मान्यता दिली गेली आहे.
 • लोकांना इंग्रजी तसेच स्थानिक भाषांमध्ये शैक्षणिक व संशोधन सामुग्री उपलब्ध व्हावी आणि त्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राबाबत माहिती मिळावी हे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. लोकांना शिक्षित करण्यासोबतच बेरोजगारांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक, लेखक, प्रकाशक, सॉफ्टवेअर विकसक आणि सामान्य वाचकांना मदत होणार.
 • मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभाग यांच्याबरोबरीने माहिती तंत्रज्ञान मंत्रालय ही मोहीम राबवविणार आहे. केंद्र आणि राज्य संस्था तसेच स्टार्टअप उद्योगांच्या मदतीने हा उपक्रम चालवला जाणार आहे.

अविनाश सुर्वे समिती
 • तिवरे धरण फुटल्याने झालेल्या जीवितहानी आणि वित्तहानीची उच्चस्तरीय सखोल चौकशी व्हावी यासाठी जलसंपदा विभागाचे सचिव तथा विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले.

तेजस एक्स्प्रेस' देशातील पहिली खासगी ट्रेन
 • केंद्र सरकारने भारतीय रेल्वेच्या खासगीकरणासाठी पहिले पाऊल उचलले आहे. अर्थसंकल्पात यासंबंधीचे स्पष्ट संकेत केंद्र सरकारने नुकतेच दिले होते. दिल्लीहून लखनऊला जाणारी '' ही देशातील पहिली खासगी रेल्वे ठरणार आहे. 
 • या रेल्वेसंबंधीच्या प्रस्तावाबाबत अंतिम निर्णय १० जुलैपर्यंत होणार असल्याची माहिती 'आयआरसीटीसी'ने दिली आहे.
 • रेल्वेने १०० दिवसांच्या अजेंडाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीच्या काळात देशात दोन खासगी रेल्वे चालवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.
 • तेजस एक्स्प्रेस ही देशातील पहिली खासगी रेल्वे ठरणार असून ती ताशी २०० किलोमीटर वेगाने धावणारी रेल्वे आहे. तेजस एक्स्प्रेसच्या प्रत्येक डब्यासाठी ३ कोटी २५ लाख रुपये खर्च आला आहे. तेजस एक्स्प्रेस ही देशातील पहिली ट्रेन आहे की ज्या ट्रेनला स्वयंचलित प्लगसारखे दरवाजे आहेत.

Post a Comment

0 Comments