चालू घडामोडी : Daily Current Affiars 4 June 2019

रशिया टेक्नॉलॉजीसह घातक मिग-35 भारताला द्यायला तयार झाला
 • अमेरिकेच्या लॉकहीड मार्टिन प्रमाणे रशियाच्या मिग कॉर्पोरेशननेही भारताला अत्याधुनिक मिग-35 विमाने देण्याची तयारी दर्शवली आहे. 
 • भारताकडून फायटर विमानांचे कंत्राट मिळवण्यासाठी स्पर्धेत असलेल्या चार ते पाच परदेशी कंपन्यांमध्ये मिग कॉर्पोरेशनही आहे. रोसोबोरोनेक्सपोर्टच्या माध्यमातून मिग कॉर्पोरेशन फायटर विमान पुरवठयाचे कंत्राट मिळवण्यासाठी निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी होणार आहे.
 • मिग कॉर्पोरेशन ऑफ रशियाचे सीईओ इल्या तारासेन्को यांनी ही माहिती दिली. फायनान्शिअल एक्सप्रेसने हे वृत्त दिले आहे. भारताच्या मेक इन इंडिया धोरणाशी सुसंगत मिग-35 फायटर विमानांची निर्मिती करण्याची तयारी मिग कॉर्पोरेशनने दाखवली आहे. 
 • अनेक दशकाच्या सहकार्यामधून मिग विमानांसाठी आवश्यक असलेले इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही भारतात उभारले आहे. यामध्ये उत्पादन आणि विक्रीनंतर विमानाच्या देखभालीसाठी आवश्यक असलेल्या बाबींचा समावेश आहे.


निर्मला सीतारमण यांची भारतातील पहिली महिला अर्थमंत्री म्हणून नियुक्ती :
 • निर्मला सीतारमण यांचे अर्थ व कॉर्पोरेट अफेयर्सचे राज्यमंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी नॉर्थ ब्लॉकच्या कार्यालयात स्वागत केले. 
 • 2017 पासून निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री म्हणून काम केले आहे. सध्या कर्नाटकचे राज्यसभा सदस्य (एमपी) आहेत. 
 • 2014 मध्ये त्या आंध्र प्रदेशातील राज्यसभा खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांनी वित्त आणि कॉर्पोरेट अफेयर्सचे राज्य मंत्री म्हणून काम केले आणि नंतर ते वाणिज्य व उद्योग मंत्री म्हणून स्वतंत्र प्रभार म्हणून काम केले. 
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्मला सीतारमणला भारतचे पुढील अर्थमंत्री नियुक्त केले आहे. यासोबत त्या भारताची पहिली पूर्ण वेळ महिला अर्थमंत्री बनली आहे. 
 • माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी फक्त 1 वर्षासाठी (जुलै 1969 आणि जून 1970) हे मंत्रालय ठेवल्यानंतर निर्मला सीतारामन प्रथम महिला अर्थमंत्री आहेत.


उच्च शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा EQUIP प्रकल्प :
 • पाच वर्षांत उच्च शिक्षणाची गुणवत्ता आणि त्यास प्रवेश याबाबतीत सुधारण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने 1.5 लक्ष कोटी रुपयांचा त्याचा महत्वाकांक्षी ‘EQUIP’ प्रकल्प राबविण्याची योजना आखली आहे.
 • धोरणे आणि अंमलबजावणी यांच्यामधील तफावत पुर्ण करण्यासाठी मंत्रालयाने “शिक्षण गुणवत्ता सुधारीकरण व समावेशन कार्यक्रम” (Education Quality Upgradation and Inclusion Program - EQUIP) या नावाने हा प्रकल्प तयार केला आहे.
 • उच्च शिक्षणाला अधिकाधीक प्रवेश तसेच संशोधनाला चालना देण्यासाठी सुधारात्मक बदल घडवून आणण्यासाठी हा प्रकल्प मदत करेल.


परकीय चलन साठा USD 1.99 अब्जने वाढून UDS 419.992 अब्जावर पोहचला
 • भारताचे परकीय चलनाच्या साठ्यात 1.994 अब्ज अमेरिकी डॉलरने वाढ झाली आणि एकूण साठा 419.992 अब्ज डॉलर झाला.
 • सोन्याचा साठा 23.021 अब्ज अमेरिकी डॉलरवर स्थिरावला आहे.
 • परकीय चलन साठा (Forex Reserve) म्हणजे परकीय चलनाच्या स्वरुपात केंद्रीय बँकेद्वारे साठविली जाणारी मालमत्ता होय. याचा वापर कर्जे फेडण्याकरिता आणि पत वाढविण्याकरिता केला जातो.


अनिता भाटिया: UN महिला संघटनेच्याउप-कार्यकारी संचालक
 • धोरणात्मक भागीदारी, स्त्रोतांना जमवण्यात आणि व्यवस्थापनाच्या क्षेत्रात महारत असलेल्या भारतीय मूळ असलेल्या अनिता भाटिया यांना ‘UN महिला’ या जागतिक संघटनेच्या उप-कार्यकारी संचालकपदी नेमण्यात आले आहे.
 • भाटिया यांनी कलकत्ता विद्यापीठामधून इतिहास विषयात पदवीचे शिक्षण घेतलेले आहे.
 • ‘UN महिला’ हा स्त्री-पुरुष समानता आणि महिला सशक्तीकरणासंबंधी संयुक्त राष्ट्रसंघाचा विशेष विभाग आहे. दि. 2 जुलै 2010 रोजी संघटनेची स्थापना झाली आणि जानेवारी 2011 मध्ये ही संघटना कार्यरत झाली. त्याचे मुख्यालय न्यूयॉर्क (अमेरीका) येथे आहे.
 • महिला आणि मुली यांच्यासाठी जागतिक पातळीवर समानता आणून त्यांना विकासामध्ये हातभार लावण्यासाठी सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यास ही संघटना जबाबदार आहे.


NITI आयोगाकडून ‘राष्ट्रीय प्रकल्प व्यवस्थापन धोरणाविषयी कार्यचौकट’ बाबत शिफारस
 • राष्ट्रीय भारत पारिवर्तन संस्था (NITI) आयोगाने ‘राष्ट्रीय प्रकल्प व्यवस्थापन धोरणाविषयी कार्यचौकट’ तयार करण्याविषयी शिफारस दिली आहे.
 • NITI आयोगाचे प्रमुख अमिताभ कांत यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्प व्यवस्थापनाच्या संदर्भात तयार केलेल्या कृती दलाने सार्वजनिक क्षेत्रातल्या तसेच सार्वजनिक-खासगी भागीदारीतून विकसित केल्या जाणार्‍या पायाभूत संरचनेसंबंधी प्रकल्पांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी धोरण तयार करण्याचे सुचविले आहे.
 • जागतिक दर्जाच्या पायाभूत संरचना उभारण्यासाठी चार्टर्ड प्रोजेक्ट मॅनेजमेंट व्यवसायिकांच्या प्रमाणिकरणासाठी मध्यवर्ती मंडळाची स्थापना करण्याविषयीची देखील शिफारस केली गेली.
 • अमेरिका, ब्रिटन, संयुक्त अरब अमिरात आणि चीन यांच्या अनुभवांचा उपयोग करून घेण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.

Post a Comment

0 Comments