चालू घडामोडी : Daily Current Affiars 18 June 2019

'फेमिना मिस इंडिया २०१९' सुमन राव • विजेती :- सुमन राव ( राजस्थान)
 • फर्स्ट रनर अप (द्वितीय) :- संजना वीज ( तेलंगणा)
 • बिहारची श्रेया शंकर हिनं 'मिस इंडिया युनायटेड कॉन्टिनेंट २०१९' आणि छत्तीसगडच्या शिवानी जाधव हिनं 'मिस ग्रँड इंडिया २०१९' चे जेतेपद पटकावले
 • ७ डिसेंबर रोजी थायलंडच्या पट्टाया येथे होणाऱ्या 'मिस वर्ल्ड' स्पर्धेत भारताकडून सुमन राव सहभागी होणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार
 • आशिष शेलार : शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण
 • राधाकृष्ण विखे-पाटील : गृहनिर्माण
 • राम शिंदे : पणन व वस्त्रोद्योग
 • डॉ. संजय कुटे : कामगार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण
 • जयदत्त क्षीरसागर : रोजगार हमी व फलोत्पादन
 • डॉ. सुरेश खाडे : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
 • प्रा. डॉ. तानाजी सावंत : जल संधारण
 • संभाजी पाटील-निलंगेकर : अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, कौशल्य विकास, माजी सैनिक कल्याण
 • डॉ. अनिल बोंडे : कृषी
 • डॉ. अशोक उईके : आदिवासी विकास
 • जयकुमार रावल : अन्न व औषध प्रशासन, पर्यटन, राजशिष्टाचार
 • सुभाष देशमुख : सहकार, मदत व पुनर्वसन

मुंबईत ‘किम्बर्ले प्रोसेस’ संदर्भात आंतरसत्रीय बैठक आयोजित
 • दिनांक 17 जून ते 21 जून 2019 या काळात मुंबई (महाराष्ट्र) या शहरात भारताच्या अध्यक्षतेत ‘किम्बर्ले प्रोसेस’ संदर्भात आंतरसत्रीय बैठक आयोजित करण्यात आली आहे.
 • भारत दि. 1 जानेवारी 2019 पासून ‘किम्बर्ले प्रोसेस सर्टिफिकेशन स्कीम (KPCS)’ याचे अध्यक्षपद भूषवित आहे.
 • संघटनेविषयी - 2003 साली ‘किम्बर्ले प्रोसेस सर्टिफिकेशन स्कीम (KPCS)’ याचा शुभारंभ करण्यात आला. भारत KPCSचा संस्थापक सदस्य आहे आणि त्याच्या क्रियाकलापांमध्ये सक्रियपणे सहभागी आहे, जेणेकरून जगातील 99% हिर्‍यांचा व्यापार हा वादमुक्त आहे हे सुनिश्चित करते. 
 • किम्बर्ले प्रोसेस (KP) याचे 82 देशांचे 55 भागीदार आहेत, त्यात युरोपीय संघ आणि त्याच्या सदस्य राज्यांचाही सहभाग आहे.

महाराष्ट्र राज्याचा २०१८-१९ चा आर्थिक पाहणी अहवाल जाहीर
 • राज्याच्या कृषी आणि सलग्न कार्य क्षेत्रात २.७ टक्क्यांची घट अपेक्षित आहे ,
 • २०१८-१९ मध्ये कृषी दर ०.४ टक्के असण्याचा पूर्वानुमान
 • राज्याच्या उद्योग क्षेत्रातही ०.७ टक्क्यांची घट अपेक्षित आहे
 • २०१८-१९ वर्षात ६.९ टक्के असण्याचा पूर्वानुमान
 • सेवा क्षेत्राचा वृद्धीदर मात्र गेल्यावर्षीच्या ८.१ टक्यावरून ९.२ टक्के वाढणे अपेक्षित आहे
 • दरडोई उत्पादनात देशात कर्नाटक आणि तेलंगाना राज्यानंतर महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर आहे
 • महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न १,९१,८२७ रुपये इतके आहे
 • राज्याचा विकासदर २०१८-१९ या आर्थिक वर्षात ७.५ टक्के इतका राहणार आहे
 • यंदाही आर्थिक पाहणी अहवालात सिंचनाची टक्केवारी उपलब्ध नाही .

National Disaster Management Authority : MDMA
 • स्थापना :- आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार
 • अध्यक्ष :- पंतप्रधान
 • रचना  :- 1 अध्यक्ष + 9 सदस्य
 • हे प्राधिकरण भारत सरकारच्या केंद्रीय गृहमंत्रालयाअंतर्गत कार्यरत आहे.
 • कार्य  : राष्ट्रीय आपत्ती बाबत योजना तयार करणे व स्वीकृत करणे. विविध मंत्रालयांमध्ये राष्ट्रीय आपत्ती वेळी समन्वय साधणे.