चालू घडामोडी : Daily Current Affiars 13 June 2019

भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम 'चांद्रयान-2' च्या प्रक्षेपणाचा अखेर निश्चित.
 • 15 जुलै रोजी पहाटे 2 वाजून 51 मिनिटांनी चांद्रयान-2 चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे. प्रेक्षपणासह या संपूर्ण मोहिमेवर 978 कोटी रुपये खर्च होतील, अशी माहिती इस्रोचे प्रमुख डॉ.के.सिवान यांनी दिली आहे.
 • असं आहे 'चांद्रयान-2' : 'चांद्रयान-2'चे लँडर, रोव्हर आणि ऑर्बिटर असे तीन भाग असतील. रोव्हर हे एक रोबोटिक यंत्र असून त्याचे वजन 27 किलो असून लांबी 1 मीटर आहे. 
 • लँडरचे वजन 1.4 टन आणि लांबी 3.5 मीटर आहे. तर ऑर्बिटरचे वजन 2.4 टन आणि लांबी 2.5 मीटर इतकी आहे. यानाचं एकूण वजन 3800 किलो आहे.
 • या देशांची यशस्वी मोहीम : चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्यात आतापर्यंत रशिया, अमेरिका आणि चीनला यश आले आहे.
 • विशेष : 'चांद्रयान-2'च्या निमित्तानं अवघ्या दहा वर्षांत 'इस्रो' दुसऱ्यांदा चंद्रावर स्वारी करणार आहे.
पी. के. मिश्रा: देशाचे अतिरिक्त प्रधान सचिव

 • निवृत्त IAS अधिकारी पी. के. मिश्रा यांची पंतप्रधानांचे अतिरिक्त प्रधान सचिव या पदावर नेमणूक करण्यात आली आहे.
 • मिश्रा सध्या गुजरात आपातकालीन व्यवस्थापन संस्था (GIDM) याचे महासंचालक आहेत.

शरद कुमार: प्रभारी केंद्रीय दक्षता आयुक्त
 • केंद्रीय दक्षता आयुक्त के. व्ही. चौधरी यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर 9 जून 2019 रोजी भारत सरकारने दक्षता आयुक्त शरद कुमार यांची प्रभारी केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून नेमणूक केली आहे.
 • ही नियुक्ती 10 जूनपासून प्रभावी झाली आहे आणि पदावर पुढील नियुक्ती होतपर्यंत ते या पदाचा कारभार सांभाळतील.
 • भारताचे केंद्रीय दक्षता आयोग (CVC) भारत सरकारच्या विभिन्न विभागांच्या अधिकारी/कर्मचारी यांच्या संबंधित भ्रष्टाचार नियंत्रणाची सर्वोच्च संस्था आहे. 
 • याची स्थापना सन 1964 मध्ये झाली. ही कोणत्याही कार्यकारी अधिकारीच्या नियंत्रणापासून मुक्त आहे आणि केंद्र सरकाराच्या अंतर्गत सर्व दक्षता कृतींवर देखरेख ठेवते. 
 • आयोगात एक केंद्रीय दक्षता आयुक्त (CVC) आणि दोन दक्षता आयुक्त नियुक्त केले जातात.

ATM व्यवहारांवरील बँकांच्या दरांचे पुनरावलोकन करण्यासाठी RBIने समितीनेमली
 • भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) बँकांकडून ठरविण्यात आलेल्या ऑटोमेटेड टेलर मशीनशी (ATM) संबंधित दरांचे पुनरावलोकन करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमली आहे. IBAचे मुख्य कार्यकारी व्ही. जी. कन्नन यांच्या नेतृत्वात सहा सदस्यांची ही समिती नेमण्यात आली आहे.
 • ऑटोमेटेड टेलर मशीन (ATM) यांचा वापर लक्षणीयपणे वाढत आहे आणि त्याबाबतचे शुल्क बदलण्याची सतत मागणी केली जात आहे.
 • ATMच्या माध्यमातून होणार्‍या व्यवहारांची सध्याची पद्धत आणि त्यावर होणारा खर्च, संबंधित शुल्क आणि विनिमय दर अश्या बाबींचे पुनरावलोकन करणार आहे.

हवाई दलाच्या बेपत्ता‘AN-32’ विमानाचे  अवशेष सापडले
 • भारतीय हवाई दलाचे ‘AN-32’ हे विमान आसाममधल्या हवाई दलाच्या तळावरुन 3 जून 2019 रोजी बेपत्ता झाले होते. या परिसरात शोध घेणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या MI-17 हेलिकॉप्टरला लिपोच्या उत्तरेकडे 16 किलोमीटरच्या अंतरावर अंदाजे 12,000 फूट उंचीवर या विमानाचे अवशेष आढळले.
 • तब्बल आठ दिवसांच्या शोधानंतर बेपत्ता असलेल्या विमानाचे अवशेष अरुणाचल प्रदेशातील लिपो भागात दिसल्याची माहिती दिली गेली. या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच हे विमान रडार वरून बेपत्ता झाले होते.
 • 3 जून रोजी आसाममधील जोरहाटहून अरुणाचल प्रदेशातील दुर्गम भागात असलेल्या मेनचुका येथे जाण्यासाठी हे विमान दुपारी 12.25 वाजता निघाले होते. मात्र पुढच्या 35 मिनिटांतच त्याचा रडारशी संपर्क तुटला होता. त्यानंतर भारतीय सैन्यदलाकडून युद्धपातळीवर विमानाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरु होते.

Post a Comment

0 Comments