चालू घडामोडी : Daily Current Affiars 9 May 2019

मुस्लिम समुदायाचा राज्यव्यवस्थेतील सहभाग

मुस्लिम समुदायाचा राज्यव्यवस्थेतील सहभाग
 • 1981 साली 68 दशलक्ष असलेली भारतातली मुस्लिमांची लोकसंख्या 2011मध्ये 172 दशलक्ष झाली आहे. याच काळात मुस्लीम खासदारांची संख्या 1980च्या 49वरून 2014मध्ये 22पर्यंत खाली घसरली आहे.
 • 1980पासून सातत्याने ही घसरण दिसतेय
 • 2014 साली काँग्रेसने 31 उमेदवार दिले होते त्यातले 7 उमेदवार निवडून आले. तर भाजपने 7 मुस्लीम उमेदवार दिले होते, एकालाही प्रतिनिधित्व मिळाले नाही. 
 • स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच संसदेत सत्ताधारी पक्षाचा एकही मुस्लिम प्रतिनिधी नाही. 
 • 2019 मध्ये काँग्रेसने भारतात केवळ 32 मुस्लिम उमेदवार दिले आहेत. यंदाही भाजपने 7 उमेदवार दिले आहेत.
 • 543 सदस्यसंख्या असलेल्या भारतीय संसदेत टक्केवारीत सांगायचं तर 1980साली मुस्लीम लोकसंख्या 11% असताना खासदारांची टक्केवारी 9% होती. 2014 साली जेव्हा मुस्लिमांची लोकसंख्या 14.2% इतकी असताना त्यांचं प्रतिनिधित्व केवळ 4% राहिलं आहे.
 • थोडक्यात मुस्लिमांची लोकसंख्या आणि त्यांचं प्रतिनिधित्व यांच्यातली दरी या कालावधीत 2 टक्क्यांवरून 10 टक्क्यांवर गेली आहे.


न्या. पी. आर. रामचंद्र मेनन: छत्तीसगडचे नवे मुख्य न्यायाधीश
 • न्यायमूर्ती पी. आर. रामचंद्र मेनन यांनी छत्तीसगड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. 
 • छत्तीसगडचे राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी त्यांना पदाची व गोपनीयतेची शपथ दिली. न्या. मेनन आधी केरळ उच्च न्यायालयात न्यायाधीश होते.
 • लोकपालमध्ये सदस्य म्हणून नियुक्ती केल्यानंतर मुख्य न्यायाधीश अजय कुमार त्रिपाठी यांनी राजीनामा दिला, त्यानंतर छत्तीसगड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पद रिक्त होते.


गोल्फपटू टायगर वूड्स यांना अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान दिला गेला
 • अमेरिकेचे गोल्फपटू टायगर वूड्स यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्ते ‘प्रेसिडेंशीएल मेडल ऑफ फ्रीडम’ हा अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान देवून सन्मानित करण्यात आले आहे.
 • टायगर वूड्स हे क्रिडा जगतातल्या अमेरिकेच्या महान खेळाडूंपैकी एक असल्याचे वर्णन केले जाते. 43 वर्षीय वूड्स हा चौथा आणि सर्वात तरुण गोल्फपटू आहे, ज्याला अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला.
 • वयाच्या 20 व्या वर्षी वूड्स यांचे व्यवसायिक खेळाडू म्हणून 1996 साली पदार्पण झाले आणि त्यांनी 15 प्रमुख स्पर्धांमध्ये विजय मिळवलेला आहे.


विकल्प योजना संबंधित माहिती
 • भारतीय रेल्वेव्दारे तिकीट आरक्षणासाठी लागणार्या वेटिंग लिस्टची समस्या कमी करण्यासाठी पायलट प्रोजेक्ट तत्वावर विकल्प योजना 1 नोव्हेंबर 2015 रोजी सुरू करण्यात आली.
 • पायलट तत्वावर विकल्प योजना प्रथम दिल्ली-लखनऊ आणि दिल्ली-जम्मू रेल्वेमार्गांवर सुरू करण्यात आली.
 • विकल्प योजनेचा लाभ ऑनलाईन बुकिंग करण्यात आलेल्या तिकीटांवर मिळू शकेल.
 • विकल्प सेवेसाठी यात्रीस ऑनलाईन बुकिंग दरम्यान Alternate Train Accommodation Scheme ची निवड करणे आवश्यक राहील.
 • विकल्प योजनेअंतर्गत आरक्षणादरम्यान जर एखाद्या यात्रीस वेटिंग लिस्टमध्ये स्थान मिळाले तर त्यास दुसर्या पर्यायामध्ये रेल्वेमध्ये कन्फर्म (फिक्स) जागा उपलब्ध केली जाईल. 
 • रेल्वे मंत्रालय या योजनेअंतर्गत या रेल्वेमार्गावर पर्याय रेल्वेस पहिल्या रेल्वेपासून अर्ध्या तासापासून 24 तासांपर्यंत चालवेल. या सेवेसाठी रेल्वे मंत्रालयाव्दारे कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकरण्यात येणार नाही.
 • पायलट प्रोजेक्ट तत्वावर दिल्ली-लखनऊ, दिल्ली-जम्मू मार्गांवर सुरू करण्यात आलेल्या विकल्प योजनेचा विस्तार करून ही योजना आणखी तीन मार्गांवर सुरू करण्यात येणार आहे.


दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना
 • दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 25 जुलै 2015 रोजी पटणा (बिहार) येथून सुरू करण्यात आली.
 • दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना केंद्रीय ऊर्जा मंत्रालायमार्फत सुरू करण्यात आली असून ग्रामीण भागामध्ये 24 तास वीज पुरवठा करणे हे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
 • या योजनेअंतर्गत होणारा एकूण खर्च 760 हजार कोटी रु. असून भारत सरकारमार्फत 630 हजार कोटी रु. निधी देण्यात येईल.
 • ही योजना पूर्वीच्या राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेचे आधुनिक रूप म्हणूनही ओळखली जाते.


चर्चीत व्यक्ती - डॉ. ऋतुजा चित्रा तारक
 • अमेरिकेत संशोधक म्हणून कार्यरत डॉ. ऋतुजा चित्रा तारक यांना इकॉलॉजीतील यावर्षीचा आंतरराष्ट्रीय जॉन हॉर्पर पुरस्कार प्राप्त झाला असून हा पुरस्कार मिळणाऱ्या त्या पहिल्या भारतीय आहेत.
 • २००८ पासून ब्रिटिश इकॉलॉजिकल सोसायटीतर्फे  दरवर्षी हा पुरस्कार मूलभूत संशोधन करणाऱ्या युवा शास्त्रज्ञास दिला जातो.
 • जागतिक हवामान बदलाचा जीवसृष्टीवर होणाऱ्या परिणामांवर जगभर संशोधन सुरू आहे. डॉ. ऋतुजा यांनी सात वर्षे उष्णकटिबंधीय शुष्क जंगलातील वनसृष्टीवर दुष्काळीस्थितीत काय परिणाम होईल, याचा सखोल अभ्यास केला.
 • वनस्पती परिस्थितीकी (इकॉलॉजी) शास्त्रातील  आजवरचे हे पहिलेच निरीक्षण. हा अभ्यास त्यांनी कर्नाटक व तामिळनाडू सीमेवरील मदुमलाई राष्ट्रीय उद्यानातील ५० हेक्टर परिसरातल्या बारा प्रकारच्या प्रजातींच्या ७ हजार ६७७ वृक्षांचा तसेच २००३ ते २००५ या दाहक दुष्काळी काळात मृत झालेल्या वृक्षांच्या आधारावर केला. 
 • १९९२ ते २०१२ या काळात पडलेला पाऊस, भूगर्भातील जलपातळी या पाश्र्वभूमीवर दर उन्हाळय़ात जमिनीच्या वेगवेगळय़ा खोलीवर पाण्याची उपलब्धता तपासली होती.
 • पर्यावरणतज्ञ डॉ. तारक काटे यांची कन्या असलेल्या डॉ. ऋतुजा २ वर्षांपासून ‘स्मिथसोनियम एन्हायर्नमेंट रिसर्च सेंटर’ येथे कार्यरत होत्या.

Post a Comment

0 Comments