(चालू घडामोडी) Daily Current Affiars 3 May 2019


डॉ. गगनदीप कांग: लंडनच्या रॉयल सोसायटीकडून फेलोपदाचा मान मिळालेली पहिली भारतीय महिला
 • डॉ. गगनदीप कांग, मंजुळ भार्गव आणि अक्षय व्यंकटेश या तीन भारतीयांसह जगभरातल्या एकूण 51 संशोधकांची लंडन या शहरामधील रॉयल सोसायटीकडून फेलोपदासाठी निवड करण्यात आली आहे.
 • डॉ. गगनदीप कांग ही रॉयल सोसायटीकडून फेलोपदाचा मान मिळालेली पहिली भारतीय महिला ठरली. मूळ पंजाबमधील जालंधरच्या डॉ. गगनदीप कांग यांनी रोटा विषाणूची प्रतिबंधक  लस शोधून तयार केली आहे. 
 • भारतातील मुलांमध्ये होणाऱ्या पोटातील संसर्गावर त्यांनी केलेले संशोधन महत्त्वाचे ठरले. त्यांच्या संशोधनाचा भर मानवी प्रतिकारशक्ती वाढवण्यावर आहे.
 • मंजुळ भार्गव आणि अक्षय व्यंकटेश हे प्रिन्सटन विद्यापीठात प्राध्यापक आहेत.


चालु घडामोडी वन लाईनर्स
● भारतीय बॉक्सिंग महासंघाकडून अर्जुन पुरस्कारासाठी अमित पांघल व गौरव बिधुरी यांच्या नावांची शिफारस करण्यात आली

● " फणी " चक्रिवादळ लवकरच ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकण्याचा इशारा

● बेंजामिन नेत्यान्याहू यांनी सलग पाचव्यांदा इस्रायलचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली

● आयपीएलमध्ये 150 बळी घेणारा पियुष चावला दुसरा भारतीय गोलंदाज बनला

● टी-२० क्रिकेटमध्ये १०० सामने जिंकणारा कोलकाता नाईट रायडर्स जगातील ६ वा संघ ठरला आहे

● मुलींसाठी विवाहाचे किमान वय म्हणून 18 वर्षे निश्चित करण्यासाठी पाकिस्तानच्या सर्वोच्च नियामक मंडळाने विधेयक पास केले

● मदर डेयरी प्रा. लि. च्या व्यवस्थापकीय संचालक पदी संग्राम चौधरी यांची नियुक्ती

● इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ लवकरच जीएसटीवर जागरूकता कार्यक्रम सुरू करणार

● मंगळुरू सिटी पोलिसांनी " रानी अब्बाका फोर्स " एक ऑल-वुमन पोलिस पेट्रोल युनिट सुरू केले

● न्यूझीलंड ओपन बॅडमिंटन टूर्नामेंट , ऑकलँड मध्ये आयोजित करण्यात आले

● युरोपियन युनियनने म्यानमारवर शस्त्रे विक्रीवरील बंदी वाढवली

● बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने एम. जयश्री व्यास यांना प्रथम स्वतंत्र महिला संचालक म्हणून नियुक्त केले

● बार्सिलोना एफसी ला स्पॅनिश ला लीगा २०१९ स्पर्धेचे विजेतेपद

● जयराम रमेश लिखित व्ही के कृष्णा मेनन यांचे आत्मचरित्र " Chequered Brilliance : The Many Lives Of V K Krishna Menon " २०२० मध्ये प्रकाशित होणार

● एशियन रोड पॅरा सायकलिंग चॅम्पियनशिप स्पर्धा २०१९ उझबेकिस्तान मध्ये आयोजित करण्यात आली

● दिविज शाह ने एशियन रोड पॅरा सायकलिंग चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक पटकावले

● सुधाकर मराठे ने एशियन रोड पॅरा सायकलिंग चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकावले

● गुरलाल सिंह ने एशियन रोड पॅरा सायकलिंग चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकावले

● लोकपाल कार्यालयात दिलीप कुमार यांची " Officer On Special Duty (OSD) " म्हणून नियुक्ती करण्यात आली

● मिनी-मॅरेथॉन ' रन टू वोट ' लेह येथे आयोजित करण्यात आली

● विप्रो ने फिलिपिन्स ची सर्वात मोठी वैयक्तिक देखभाल कंपनी ' स्पलॅश ' ला विकत घेतले

● २०१८ मध्ये भारत हा जगातील चौथा सर्वात जास्त सैन्यखर्च करणारा देश : SIPRI अहवाल

● २०१८ मध्ये चीन हा जगातील दुसरा सर्वात जास्त सैन्यखर्च करणारा देश : SIPRI अहवाल

● २०१८ मध्ये अमेरिका हा जगातील सर्वाधिक सैन्यखर्च करणारा देश : SIPRI अहवाल

● हॉकी इंडियाने खेलरत्न पुरस्कारासाठी पी आर श्रीजेश ला नामांकित केले

● हॉकी इंडियाने अर्जुन पुरस्कारासाठी अकाशदिप सिंह व चिंगलेन्साना सिंग यांना नामांकित केले

● संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने मसूद अझर ला " जागतिक दहशतवादी " घोषित केले

● भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड व ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाने ई-मोबिलिटी प्रोजेक्टसाठी करार केला .


राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना (मोदी केअर योजना)
 • केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी 2018-19 या वर्षासाठीचा सादर केलेल्या अर्थसंकल्पात जेटलींनी या आरोग्य योजनेची घोषणा केली.
 • या योजनेंतर्गत देशातील 5 लाख कुटुंबांना वैद्यकीय कवच मिळणार असून, याअंतर्गत 10 कोटी रुपये या कुटुंबांसाठी मिळणार आहे. 
 • या योजनेसाठी केंद्र सरकार 60 टक्के तर राज्य सरकार 40 टक्के रक्कम देणार आहे. 
 • याशिवाय शिक्षण आणि आरोग्यासाठी 11 हजारांची वाढ होणार असून, यावर 3 ते 4 टक्के उपकर लागू केला जाणार आहे. हा उपकर या योजनेसाठी वापरण्यात येणार आहे.किर्गिजस्तानामध्ये ‘SCO संरक्षण मंत्री परिषद’ संपन्न
 • किर्गिजस्तानाच्या बिश्केक या शहरात ‘शांघाय सहकार संघटना (SCO) संरक्षण मंत्री परिषद’ संपन्न झाली.
 • भारताचे संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण यांनी या परिषदेत भाग घेतला. परिषदेदरम्यान, SCOच्या कार्यक्षेत्रात संरक्षण आणि सुरक्षा सहकार्य वाढविण्याच्या मार्गांवर चर्चा करण्यात आली. 
 • शांघाय सहकार संघटना (Shanghai Cooperation Organisation -SCO) याची 2001 साली स्थापना झाली. त्याचे बिजींग (चीन) येथे मुख्यालय आहे. चीन SCO चा संस्थापक देश आहे. भारत 2017 साली समुहाचा पूर्ण सदस्य बनला. वर्तमानात रशियाकडे समूहाचे अध्यक्षपद आहे.
 • समूहामध्ये चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उज्बेकिस्तान, भारत आणि पाकिस्तान या देशांचा समावेश आहे. भारत 2017 साली SCOचा पूर्ण सदस्य बनला.


स्वदेशी ‘निर्भय’ या सब सॉनिक क्रुझ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी
 • स्वदेशी बनावटीच्या आणि देशातच विकसित केलेल्या लांब पल्ल्याच्या ‘निर्भय’ या प्रथम सब-सॉनिक क्रुझ क्षेपणास्त्राची ओडिशातल्या चंदीपूर येथे यशस्वी चाचणी घेण्यात आली.
 • संरक्षण संशोधन व विकास संस्थेने ही चाचणी घेतली. चाचणीसाठी ठेवण्यात आलेल्या सर्व उद्दिष्टांची पूर्तता झाली.
 • ‘निर्भय’ क्षेपणास्त्र समुद्रसपाटीपासून अतिशय कमी उंचीवर असलेले लक्ष्य भेदले जाऊ शकते. त्याची मारा क्षमता 1000 किलोमीटर एवढी आहे. हे क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (DRDO) बेंगळुरूमधील प्रगत संरक्षण आस्थापनाद्वारे (ADE) संरचित आणि विकसित केले गेले आहे.

Post a Comment

0 Comments