चालू घडामोडी : Daily Current Affiars 13 May 2019


IPL 2019 | मुंबई इंडियन्सकडे चौथ्यांदा आयपीअलचे विजेतेपद
 • आयपीएलच्या 12 व्या मोसमाच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सचा अवघ्या एका धावेने पराभव केला .
 • आयपीएलच्या इतिहासात चौथ्यांदा विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे.
 • हैदराबादच्या रणांगणातल्या या सामन्यात मुंबईने चेन्नईला विजयासाठी 150 धावांचे माफक आव्हान दिले होते.
 • हे आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरलेल्या चेन्नईचा संघ केवळ 148 धावांपर्यंतच मजल मारु शकला.
 • किरन पोलार्डच्या 41 धावा केल्या आणि ईशान किशनच्या 23 धावांच्या भरवशावर मुंबईने 149पर्यंत मजल मारली.

हवाई दलाच्या ताफ्यात ‘अपाची’ दाखल
 • भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात ‘अपाची’ हे अत्याधुनिक लढाऊ हेलिकॉप्टर दाखल.
 • अमेरिकेतील अरीझोना येथील उत्पादन तळावर भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांकडे ‘अपाची’ हेलिकॉप्टर सुपूर्द.
 • भारत आणि अमेरिकेत सप्टेंबर 2015 मध्ये 13,952 कोटी रुपयांचा अपाची हेलिकॉप्टर खरेदीचा करार झाला होता. 
 • भारताला मार्च 2020 पर्यंत 22 अपाची हेलिकॉप्टर मिळणार आहेत. या हेलिकॉप्टरची पहिली बॅच जुलैमध्ये भारतीय हवाई दलाला मिळे.


सिंगापूरमध्ये दुर्मिळ ‘मँकीपॉक्स’ रोगाचे देशातले पहिले-वहिले प्रकरण आढळले
 • सिंगापूरमध्ये दुर्मिळ ‘मँकीपॉक्स’ रोगाचे देशातले पहिले-वहिले प्रकरण आढळले आहे.
 • नावाप्रमाणे बंदरांच्या सानिध्यातून मानवात पसरणारा देवी हा रोग नायजेरियातून आलेल्या एका व्यक्तीमध्ये दिसून आला आहे.
 • ‘मँकीपॉक्स’ हा विषाणूजन्य रोग आहे. सामान्यत: बंदरांसारख्याच सस्तन व उभयचर संक्रमित जनावरांच्या संपर्कात आल्याने किंवा त्यांचे मांस खाल्यास या रोगाचा प्रसार होतो आणि हा लोकांपुरता मर्यादित आहे. हे सामान्यतः घातक नसले तरी दुर्मिळ आहे.
 • सामान्य तापाप्रमाणेच या रोगाची लक्षणे आहेत आणि अंगावर चटके दिसून येतात. मध्य आणि पश्चिम आफ्रिकेतल्या काही भागात हा रोग दिसून येतो. 
 • आफ्रिकेबाहेर, याचे संक्रमण केवळ अमेरिका, ब्रिटन आणि इस्राएलमध्ये दिसून आले आहे.


2023 सालापर्यंत तंत्रज्ञान क्षेत्रात भारतीय 3 दशलक्ष नोकर्या तयार होतील: ISF
 • इंडियन स्टाफिंग फेडरेशन (ISF) याच्या अहवालानुसार, पुढील पाच वर्षांत भारतीय तंत्रज्ञान उद्योगात आणखी तीन दशलक्ष नवीन नोकर्या तयार होतील.
 • डिजिटल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), डेटा सायन्स, अनालिटिक्स, बिग डेटा, ब्लॉकचेन यासारख्या प्रगत तंत्रज्ञानात होत असलेल्या विकासामधून नवीन जागा तयार होण्याचे अपेक्षित आहे.
 • त्यामुळे देशाच्या तंत्रज्ञान क्षेत्रातले मनुष्यबळ 2023 सालापर्यंत आकाराने 7 दशलक्ष होण्याचे अपेक्षित आहे.


व्हर्जिनिटी टेस्ट राज्याच्या वैद्यकीय अभ्यासक्रमातून वगळणार, निर्णय घेणारं महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य
 • सखोल चर्चेनंतर कौमार्य चाचणी अवैज्ञानिक तसेच अशास्त्रीय असल्याचा मुद्दा मान्य करीत अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय अभ्यास मंडळाच्या वतीनं घेण्यात आला. त्यामुळं लवकरच राज्याच्या वैद्यकीय अभ्यासक्रमातून या चाचणीचा भाग वगळला जाईल, असं डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी सांगितलं.
 • व्हर्जिनिटी टेस्ट म्हणजेच कौमार्य चाचणी आता राज्याच्या वैद्यकीय अभ्यासक्रमातून वगळण्यात येणार आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठानं कौमार्य चाचणी अवैज्ञानिक असल्याचं मान्य करत अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे असा निर्णय घेणारं महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य ठरलं आहे.
 • वैद्यकीय अभ्यासक्रमात कौमार्य चाचणीचा समावेश आहे. त्यात कौमार्य चाचणीची व्याख्या, लक्षण, न्यायवैद्यकीय महत्त्व, खरी कुमारी, खोटी कुमारी आदी बाबींचा समावेश आहे. टु फिंगर किंवा प्रोबद्वारे ही तपासणी केली जाते. ही कौमार्य चाचणी केवळ स्त्रियांपुरतीच मर्यादीत असून पुरुषांच्या कौमार्य तपासणीचा उल्लेख नाही.

Post a Comment

0 Comments