चालू घडामोडी : Daily Current Affiars 10 May 2019

लॉरेंटिनो कॉर्टिझो : पनामा देशाचे नवे राष्ट्राध्यक्ष बनले

 • पनामा देशात झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत लॉरेंटिनो कॉर्टिझो यांनी विजय मिळवलेला आहे.
 • 66 वर्षीय कॉर्टिझो हे डेमोक्रॅटिक रेव्होल्यूशनरी पार्टी (PRD) याचे प्रमुख आहेत. ते वर्तमान राष्ट्राध्यक्ष जुआन कार्लोस वेरेला यांच्याकडून पदभार स्वीकारतील. 
 • पनामा हा मध्य अमेरिका उपखंडातला एक देश आहे. पनामा सिटी हे त्याचे राजधानी शहर आहे आणि बाल्बोआ व यूनायटेड स्टेट्‍स डॉलर ही राष्ट्रीय चलने आहेत.


भारतीय संशोधकांच्या चमूने अल्ट्रासेन्सिटीव्ह क्वांटम थर्मामीटर विकसित केले
 • जामिया मिलिया इस्लामिया (नवी दिल्ली) येथील संशोधकांच्या चमूने ग्रॅफेन क्वांटम डॉट्सचा (3-6 नॅनोमीटर एवढ्या आकाराचे) वापर करून अल्ट्रासेन्सिटीव्ह क्वांटम थर्मामीटर विकसित केले आहे.
 • नॅनोसायन्स आणि नॅनोटेक्नॉलॉजी केंद्राचे शेख एस. इस्लाम यांच्या नेतृत्वात एका चमूने हे उपकरण विकसित केले आहे.
 • हे तापमानदर्शक उपकरण 27 डिग्री सेल्सियस ते उणे 196 डिग्री सेल्सियस या दरम्यानच्या तापमानाचे मोजमाप करण्यास सक्षम आहे. ते तापमानातले सूक्ष्म बदल मोजू शकते आणि त्वरित (300 मिलीसेकंद) प्रतिसाद देतो.


परदेशी सर्व्हरपासून दूर ठेवण्यासाठी रशियाने सार्वभौमिक इंटरनेट कायदा तयार केला
 • रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी देशातल्या नागरिकांच्या हितासाठी एक सार्वभौमिक इंटरनेट कायदा मंजुर केला आहे.
 • हा कायदा अधिकृत प्राधिकरणांना देशाच्या इंटरनेटला (महाजाल) वेगळे करीत त्यावर देखरेख ठेवण्यास परवानगी देईल. हा कायदा नोव्हेंबरपासून प्रभावी होणार.
 • हा कायदा अधिकार्‍यांना रशियामध्ये इंटरनेटच्या काही भागांना प्रवेश अवरोधित करण्याची क्षमता देतो. नवीन कायद्याच्या अंतर्गत संभाव्य धोक्यांपासून दूर राहण्यासाठी 'केंद्रीकृत रहदारी नियंत्रण' पद्धत अवलंबली जाणार आहे. परदेशी सर्व्हरपासून दूर ठेवले जाईल.


RBIने RRB आणि SFB बँकांसाठी गृहकर्जाची मर्यादा वाढवली
 • भारतीय रिझर्व्ह बँकेनी (RBI) प्राधान्यकृत क्षेत्र कर्ज पुरवठा अंतर्गत पात्रतेसाठी प्रादेशिक ग्रामीण बँका (RRBs) आणि लघू वित्त बँका (SFBs) यांच्यासाठी गृहकर्जाची मर्यादा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
 • RRB बँकांसाठीच्या वाढीव गृहकर्ज मर्यादेनुसार महानगर क्षेत्रात (10 लक्ष आणि त्यापेक्षा अधिकची लोकसंख्या) व्यक्तीला 35 लक्ष रुपये तर इतर क्षेत्रासाठी ही मर्यादा 25 लक्ष रुपये आहे. पात्रतेसाठी घराची एकूण किंमत महानगर आणि इतर क्षेत्रासाठी अनुक्रमे 45 लक्ष रुपये आणि 30 लक्ष रुपयांपेक्षा अधिक नसावी.
 • SFB बँकांसाठी ही मर्यादा महानगर क्षेत्रासाठी 28 लक्ष रुपये तर इतर क्षेत्रासाठी 20 लक्ष रुपये आहे. पात्रतेसाठी घराची किंमत महानगर आणि इतर क्षेत्रासाठी अनुक्रमे 35 लक्ष रुपये आणि 25 लक्ष रुपयांपेक्षा अधिक नसावी.


चीनमधील ‘चार मे’ चळवळीचे 100 वे वर्ष
चीनच्या हाँगकाँग विशेष प्रशासकीय क्षेत्रात ‘चार मे’ चळवळीचे 100वे वर्धापन वर्ष साजरा करण्यासाठी एक प्रदर्शनी 4 मे 2019 रोजी भरविण्यात आली. हे वर्ष नव्या चीनच्या स्थापनेचे 70 वे वर्धापन वर्ष देखील आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव शी चिनफिंग यांनी आंदोलनाच्या वर्धापन दिनानिमित्त UN महासभेत महत्वपूर्ण भाषण देखील केले. भाषणात त्यांनी चार मे चळवळीचे ऐतिहासिक महत्त्वाचे उच्च मूल्यांकन केले आणि स्पष्ट रूपाने नव्या युगात चार मेच्या भावनेचा विकास करण्याचे आवाहन केले.

✍‘चार मे’ चळवळ
 • 1919 साली साम्राज्यवादाच्या विरोधात विद्यार्थ्यांनी प्रदर्शने केली होती, जो देशाच्या इतिहासातला एक महत्त्वाचा क्षण होता.
 • बिजींग विद्यापीठाचे सुमारे 3,000 विद्यार्थी तियानमेन चौकामध्ये एकत्र जमले आणि प्रदर्शने केली. ईशान्य चीनमधील जर्मनीच्या अधिपत्याखाली असलेला प्रदेश चीनला परत करण्याऐवजी जपानला सोपविण्याच्या उद्देशाने असलेल्या व्हर्साय शांती संधीच्या विरोधात हे आंदोलन चालवले गेले होते.
 • चार मे चळवळ चीनच्या आधुनिक इतिहासातली एक महत्वपूर्ण घटना आहे. यादरम्यान देशभक्ती, प्रगटी, लोकतंत्र व विज्ञानाची महान भावना निर्माण झाली आणि चीनच्या आधुनिक इतिहासात या घटनेला महत्त्वाचे स्थान आहे.

Post a Comment

0 Comments