Daily Current Affiars 8 April 2019 (चालू घडामोडी)


जागतिक बँक समुहाचे 13 वे अध्यक्ष : डेव्हिड मालपास
 • जागतिक बँक समुहाचे 13 वे अध्यक्ष म्हणून अमेरिकेचे डेव्हिड मालपास यांची नेमणूक करण्यात आली आहे.
 • मालपास यांनी दक्षिण कोरियाचे जिम यॉंग किम यांचे स्थान घेतले. किम यांनी आपला कार्यकाळ संपण्याच्या तीन वर्षे आधीच जागतिक बँकेचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा कार्यकाळ वर्ष 2022 साली संपणार होता.
 • वॉल स्ट्रीटचे माजी अर्थशास्त्रज्ञ राहिलेले मालपास हे पूर्वी अमेरिकेच्या सरकारच्या वित्त विभागात आंतरराष्ट्रीय प्रकरणांचे उप-सचिव होते.


प्रगत तंत्रज्ञानाच्या विकासासाठी भारतीय नौदल आणि CSIR यांच्यात सामंजस्य करार
 • भारतीय नौदलासाठी प्रगत तंत्रज्ञानाच्या संयुक्त संशोधन व विकासासाठी, भारतीय नौदल आणि वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) यांच्यात एक सामंजस्य करार झाला आहे.
 • या करारामुळे यांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स, संगणकशास्त्र, प्रपल्शन प्रणाली, धातूशास्त्र आणि नॅनो-तंत्रज्ञान आदी प्रगत क्षेत्रांमध्ये संशोधन आणि विकास कार्याला चालना मिळेल.
 • वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) ही भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत विज्ञानाच्या क्षेत्रात संशोधनात्मक कार्ये करणारी एक स्वायत्त संस्था आहे. त्याची स्थापना दिनांक 26 सप्टेंबर 1942 रोजी करण्यात आली. 
 • त्याच्या देशभरात 39 प्रयोगशाळा (ज्यात 5 क्षेत्रीय संशोधन प्रयोगशाळा) आणि 50 क्षेत्रीय केंद्रे आहेत.


नवी दिल्लीत ‘हरित आणि भूदृष्य’ याविषयक राष्ट्रीय परिसंवाद संपन्न
 • केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे (CPWD) नवी दिल्लीत ‘हरित आणि भूदृष्य’ याविषयक राष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आले होते.
 • शहरी भागातले हरित क्षेत्र सामाजिक आणि नैसर्गिक स्थिरता आणि जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. हरित आणि स्वच्छ शाश्वत विकासाच्या सतत प्रयत्नांचा एक भाग म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला गेला होता.
 • या कार्यक्रमात पाणी, वायू, ऊर्जा, भूमी, जैवविविधता आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर, अक्षय ऊर्जा, पाण्याचे संवर्धन, सांडपाण्यावरील पुनर्प्रक्रिया अश्या विविध पैलूंवर उजाळा टाकण्यात आला.
 • यादरम्यान केल्या गेलेल्या शिफारसी – बांधकामासाठी लाकूडाला पर्याय स्वीकारण्याची गरज आहे. बांबूसारख्या पर्यायी सामग्रीचा वापर करणे आवश्यक आहे. भूदृष्य आणि फलोत्पादन या क्षेत्रामध्ये गुंतलेल्या व्यक्तींना नवीन तंत्रज्ञानाविषयी योग्य प्रशिक्षण देण्यात यावे. निरोगी आणि पौष्टिक आहारासाठी सेंद्रिय खतांचा वापर केला पाहिजे.


ADBचा 'एशियन डेव्हलपमेंट आऊटलुक 2019' अहवाल प्रसिद्ध
 • मनिला येथील आशियाई विकास बँकेनी (ADB) 'एशियन डेव्हलपमेंट आऊटलुक (ADO) 2019' या शीर्षकाखाली त्याचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
 • कमकुवत जागतिक मागणी आणि महसुलातल्या तूटीतली वाढ त्यामुळे 2019-20 या आर्थिक वर्षासाठी भारताचा वृद्धीदर पूर्वीच्या 7.6% यावरून 7.2% एवढा अंदाजित केला आहे.


मर्सर संस्थेचा ‘क्वालिटी ऑफ लिव्हिंग (इंडिया) रॅंकिंग 2019’ अहवाल...
 • मर्सर संस्थेचा ‘क्वालिटी ऑफ लिव्हिंग (इंडिया) रॅंकिंग 2019’ अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
 • अहवालानुसार, सलग सातव्यांदा हैदराबाद (तेलंगणा) आणि पुणे (महाराष्ट्र) या शहरांनी भारतामधल्या शहरांच्या यादीत अग्रस्थान (संयुक्त) पटकावले आहे. व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) हे जगातले सर्वात जगण्यायोग्य शहर ठरले आहे. 
 • सलग दहाव्यांदाया शहराचे जीवनमान उच्च कोटीचे राहिले आहे.जागतिक पातळीवर हैदराबाद आणि पुणे या शहरांचा एकत्र 143 वा क्रमांक लागतो आहे.
 • वैयक्तिक सुरक्षेच्या बाबतीत, चेन्नई हे भारतासोबतच संपूर्ण आग्नेय आशियातले सर्वात सुरक्षित शहर ठरले. जगात त्याचा 105 वा क्रमांक आहे.
 • यंदाच्या अहवालाच्या 21 व्या आवृत्तीत जगभरातल्या शहरांच्या सर्वेक्षणात 231 शहरांचा समावेश करण्यात आला, ज्यात भारताच्या सात शहरांचा समावेश आहे.

Post a Comment

0 Comments