(चालू घडामोडी) Daily Current Affiars 21 April 2019


कर्मचाऱ्यांना तंत्रज्ञानाविषयी ज्ञान देण्यासाठी  (IMF) याचे ‘लर्निंग कॉईन’
 • जागतिक बँकेच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) त्यांच्या कर्मचार्यांना तंत्रज्ञानाविषयी अधिक ज्ञान देण्यासाठी ‘लर्निंग कॉईन’ नावाचे त्याचे टोकन जाहीर केले आहे.
 • हे टोकन केवळ जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) या दोन संस्थांमध्ये कार्य करणार्या व्यक्तींसाठी उपलब्ध केले गेले आहेत म्हणूनच या टोकनचे कोणतेही मूल्य नाही.
 • आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) कॉईनचे समर्थन करण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित नेटवर्क देखील तयार केले. 
 • ब्लॉकचेन तंत्रज्ञांनाविषयी संशोधन चालविण्यासाठी आणि विकासासाठी कामगारांना शिक्षण देण्याच्या हेतूने हे कॉईन सादर करण्यात आले आहे.
 • ‘लर्निंग कॉईन’ अ‍ॅप हे एक अनुप्रयोग आहे, जे त्याच्या वापरकर्त्यांना ब्लॉकचेनशी संबंधित अधिक सामग्रीला प्रवेश मिळविण्याची अनुमती देते. हे फोरमसारख्या पोर्टलचा मंच प्रदान करते, जेथे कर्मचारी ब्लॉकचेन बद्दल शिकू शकतात.


जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या क्रमवारीत भारत 140 वी स्थानी
 • जगभरातल्या 180 देशांच्या ‘जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक 2019’ यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या क्रमवारीत भारत 140 व्या स्थानावर आह़े. 
 • यावेळी जगातली सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाचे म्हणजेच भारताचे स्थान गेल्या निर्देशांकाच्या तुलनेत दोन स्थानाने घसरले आह़े.
 •  या मानांकनात नॉर्वे हा देश अग्र स्थानी आहे. या यादीत नॉर्वेच्या पाठोपाठ फिनलँड, स्वीडन, नेदरलँड, डेन्मार्क (पाचवा) या देशांचा क्रम लागतो आहे.
  तुर्कमेनिस्तान (180) या यादीत सर्वात तळाशी आहे. उत्तर कोरिया 179 व्या स्थानी आहे.


भारतीय नौदलाचे पहिलेच व्हिज्युअल रिॲलिटी सेंटर दिल्लीत उभारले
 • पहिलेच अत्याधुनिक व्हिज्युअल रिॲलिटी सेंटर (म्हणजेच आभासी वास्तव केंद्र) याचे नौदल प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा यांनी उद्‌घाटन केले.
 • भारतीय नौदलाच्या स्वदेशी बनावटीच्या युद्धनौका संरचना क्षमतांना त्यामुळे मोठे प्रोत्साहन मिळणार आहे.
 • नौदल संरचना महासंचालनालय 1960 साली सुरू करण्यात आले. तेव्हापासून युद्धनौका संरचना आणि निर्मितीत स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने युद्धनौका संरचना क्षमतेत महासंचालनालयाने मोलाचे योगदान दिले आहे.


एलिस जी. वैद्यन ह्यांना ‘फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन’ सन्मान
 • एलिस जी. वैद्यन ह्यांना ब्रिटनच्या सरकारकडून तेराव्या शतकापासून दिला जाणारा ‘फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन’ हा सन्मान देऊन गौरविण्यात आले आहे. 
 • लंडनमध्ये झालेल्या प्रथम ‘भारत-यूके विमा शिखर परिषद’मध्ये हा सन्मान वैद्यन यांना दिला गेला. 
 • भारत आणि ब्रिटन या दोन देशांमधील विमा संदर्भात संबंधांचा प्रचार करण्यासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला.


जागतिक बँक समुहाचे 13 वे अध्यक्ष : डेव्हिड मालपास
 • जागतिक बँक समुहाचे 13 वे अध्यक्ष म्हणून अमेरिकेचे डेव्हिड मालपास यांची नेमणूक करण्यात आली आहे.
 • मालपास यांनी दक्षिण कोरियाचे जिम यॉंग किम यांचे स्थान घेतले. किम यांनी आपला कार्यकाळ संपण्याच्या तीन वर्षे आधीच जागतिक बँकेचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा कार्यकाळ वर्ष 2022 साली संपणार होता. 
 • वॉल स्ट्रीटचे माजी अर्थशास्त्रज्ञ राहिलेले मालपास हे पूर्वी अमेरिकेच्या सरकारच्या वित्त विभागात आंतरराष्ट्रीय प्रकरणांचे उप-सचिव होते.

Post a Comment

0 Comments