(चालू घडामोडी) Daily Current Affiars 16 April 2019


जपानला मागे टाकत हाँगकाँग बनले जगातले तिसरे सर्वात मोठे स्टॉक मार्केट.
 • जपानला मागे टाकत हाँगकाँग हे एकूण मूल्याच्या बाबतीत जगातले तिसरे सर्वात मोठे स्टॉक मार्केट म्हणून तयार झाले आहे.
 • तर अमेरिका आणि चीन (मुख्य भूभाग) हे जगातल्या सर्वात मोठ्या स्टॉक मार्केटच्या यादीत अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय स्थानी आहे.
 • संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, हाँगकाँगचे एकूण भागभांडवल 5.78 लक्ष कोटी डॉलर तर जपानचे भागभांडवल 5.76 लक्ष कोटी डॉलर होते.


‘उत्कर्ष बांगला’ आणि ‘साबुज साथी’ योजनांना UNचा WSIS पुरस्कार मिळाला
 • कौशल्य विकासासाठी आणि शालेय विद्यार्थ्यांना सायकल वितरणासाठी, पश्चिम बंगाल राज्य सरकाराद्वारे चालविण्यात येणार्‍या दोन योजनांना प्रतिष्ठित ‘वर्ल्ड समिट ऑन द इन्फॉर्मेशन सोसायटी (WSIS) अवॉर्ड’ हा पुरस्कार देऊन राज्याचा गौरव केला आहे. त्या योजना म्हणजे - "उत्कर्ष बांगला" आणि "साबुज साथी".
 • “उत्कर्ष बांगला” योजनेला क्षमता बांधणी श्रेणीमध्ये तर "साबुज साथी" योजनेला ‘माहिती तंत्रज्ञान व दळणवळण (ICT) अप्लिकेशन: ई-गव्हर्नमेंट’ श्रेणीत हा पुरस्कार दिला गेला.
 • प्रतिष्ठित ‘वर्ल्ड समिट ऑन द इन्फॉर्मेशन सोसायटी (WSIS) अवॉर्ड’ ही एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे, ज्यामध्ये विकासात्मक कृतींसाठी मूल्यांकनासाठी तयार केल्या जाणार्‍या प्रभावी यंत्रणेचा गौरव करण्याच्या उद्देशाने एखादी व्यक्ती, सरकार आणि खासगी संस्थांना पुरस्कार दिला जातो.


एलिस जी. वैद्यन ह्यांना ‘फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन’ सन्मान मिळाला
 • एलिस जी. वैद्यन ह्यांना ब्रिटनच्या सरकारकडून तेराव्या शतकापासून दिला जाणारा ‘फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन’ हा सन्मान देऊन गौरविण्यात आले आहे.
 • लंडनमध्ये झालेल्या प्रथम ‘भारत-यूके विमा शिखर परिषद’मध्ये हा सन्मान वैद्यन यांना दिला गेला. भारत आणि ब्रिटन या दोन देशांमधील विमा संदर्भात संबंधांचा प्रचार करण्यासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला. 
 • एलिस वैद्यन कोण आहेत? एलिस जी. वैद्यन ह्या भारताच्या जनरल इन्शुरेन्से कॉर्पोरेशन (GIC) या देशातल्या एकमेव पुनर्विमा कंपनीच्या प्रथम महिला अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्याशिवाय त्या भारताच्या राजदूत आहेत. 
 • भारतीय विमा व्यवसाय अधिकृत आकडेवारीनुसार, भारतात 500 ​​पेक्षा अधिक दलालांसह 34 सर्वसाधारण विमा कंपन्या, 24 जीवन विमा कंपन्या, 10 जागतिक पुनर्विमा विक्रेत्यांच्या शाखा आणि 45 परदेशी पुनर्विमा कंपन्या कार्यरत आहेत. 
 • गेल्या वर्षी विमा उद्योगाने भरावयाच्या प्रिमीयमची एकूण रक्कम सुमारे 100 अब्ज डॉलर एवढी नोंदवली होती, जी 2022 सालापर्यंत 280 अब्ज डॉलरपर्यंत वाढण्याचे अपेक्षित आहे.


बॅडमिंटनपटू लिन डॅन ह्याने क्वालालम्पूर येथे खेळल्या गेलेल्या ‘मलेशियन ओपन 2019’
या स्पर्धेत पुरुष एकल गटाचे जेतेपद पटकावले आहे. स्पर्धेच्या अंतिम लढतीत चीनच्या लिन डॅनने चीनी चेन लाँगला पराभूत केले.
 
स्पर्धेच्या इतर गटाचे विजेते :
 • महिला एकल - तेई तेजु यिंग (तैपेई).
 • पुरुष दुहेरी - युचेन ल्यू व जुहेन ली (चीन)
 • महिला दुहेरी - चेन-जिया (चीन)

स्पर्धेविषयी :
 • मलेशिया ओपन ही एक वार्षिक बॅडमिंटन स्पर्धा आहे, जी 1937 सालापासून मलेशिया या आशियाई देशात खेळवली जात आहे. 
 • जागतिक बॅडमिंटन महासंघाने (BWF) 2018 सालापासून नव्या कार्यक्रमावलीनुसार या स्पर्धेला BWF वर्ल्ड टूर सुपर 750 याच्या पाच कार्यक्रमांच्या यादीत स्थान दिले गेले आहे.


2019 सालासाठी NIRF आणि ARIIA क्रमवारी प्रसिद्ध.
 • भारतातल्या संस्थांची गुणवत्ता वृद्धींगत करण्याच्या उद्देशाने ‘राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी कार्यचौकट-2019’ (NIRF) हे दस्तऐवज तयार करण्यात आले आहे आणि संस्थांना दिलेली क्रमवारी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.
 • 8 एप्रिलला राष्ट्रपतींच्या हस्ते विविध श्रेणीत आठ संस्थांना भारतीय क्रमवारी पुरस्कार दिले गेलेत. ‘IIT मद्रास’ या संस्थेनी NIRF-2019 मध्ये एकूणच सर्व श्रेणींमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.
 • याशिवाय, अटल रॅंकिंग ऑफ इंस्टीट्यूशन्स ऑन इनोव्हेशन अचीवमेंट्स (ARIIA) ही क्रमवारी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि त्यात अग्र ठरलेल्या दोन संस्थांना ‘ARIIA पुरस्कार’ देण्यात आला. ARIIA या क्रमवारीमध्ये मिरंडा हाऊस कॉलेज (दिल्ली विद्यापीठ) या संस्थेनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.
 • भारतातल्या प्रथम पाच अभियांत्रिकी संस्था – IIT मद्रास, IIT दिल्ली, IIT बॉम्बे, IIT खडगपूर, IIT कानपूर.
 • भारतातली प्रथम पाच विद्यापीठे – IISc बेंगळुरू, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (नवी दिल्ली), बनारस हिंदू विद्यापीठ (वाराणशी), हैदराबाद विद्यापीठ, कलकत्ता विद्यापीठ (कोलकाता).
 • भारतातली प्रथम पाच महाविद्यालये - मिरंडा हाऊस (दिल्ली), हिंदू कॉलेज (दिल्ली), प्रेसीडेंसी कॉलेज (चेन्नई), सेंट स्टीफेन्स कॉलेज (दिल्ली), लेडी श्रीराम कॉलेज फॉर विमेन (नवी दिल्ली).

Post a Comment

0 Comments