Daily Current Affiars 9 March 2019 in Marathi


जगातील सर्वात वयोवृद्ध महिला भारतात, ११८ वर्षांच्या करतार कौर यांचा विक्रम
 • लुधियाना : जगातील सर्वात वयस्कर महिला ठरण्याचा मान भारतीय महिलेने पटकावला आहे. पंजाबच्या करतार कौर या हयात असलेल्या जगातल्या सर्वात वयोवृद्ध महिला ठरल्या आहेत. त्या 118 वर्षांच्या आहेत.
 • करतार कौर यांच्या नावाची नोंद 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये होणार आहे. आतापर्यंत जपानच्या काने तानाका सर्वात वयोवृद्ध महिला मानल्या जात होत्या. काने यांचं वय 116 वर्ष 63 दिवस इतकं आहे. मात्र करतार कौर त्यांच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठ्या आहेत.
 • भावाच्या वयावरुन करतार यांचं वय काढण्यात आलं. करतार यांचा जन्म 1901 साली झाला होता. आपली पणजी जगातील सर्वात वयोवृद्ध महिला असल्याची आपल्याला कल्पना होती, मात्र तिला दृष्ट लागू नये, यासाठी आपण ही गोष्ट लपवून ठेवल्याचं त्यांच्या पणतूने सांगितलं.
 • काही दिवसांपूर्वी करतार यांच्या ह्रदयात ब्लॉक असल्याने दवाखान्यात दाखल करण्यात आलं. त्यानंतर फिरोजपूरमधील वरिष्ठ कार्डिओलॉजिस्ट डॉ. रवींद्र सिंह कूका यांनी करतार यांच्यावर हार्ट सर्जरी केली. सध्या करतार यांची प्रकृती स्थिर आहे.
 • सर्वात वयोवृद्ध व्यक्तीवर पेसमेकर इम्प्लान्ट करण्याचा विक्रमही डॉक्टरांच्या टीमने केला आहे. करतार यांनी आपल्या नातवंडांची नातवंडं म्हणजेच पाच पिढ्या पाहिल्या आहेत. त्यांची मुलगी 88 वर्षांची आहे. करतार या पूर्णपणे शाकाहारी आहेत.


सलग तिसर्यांदा इंदूर हे सर्वात स्वच्छ शहर ठरले
 • दिनांक 6 मार्च 2019 रोजी दिल्लीत एका कार्यक्रमात भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते 2019 सालासाठी ‘स्वच्छ सर्वेक्षण’ पुरस्कारांचे वितरण केले गेले.
 • केंद्र सरकारच्या स्वच्छता पाहणीत लागोपाठ तिसऱ्या वर्षी मध्यप्रदेशाच्या इंदूर (ऊर्फ इंदौर) या शहराला राष्ट्रीय यादीत एकूणच प्रथम क्रमांक मिळाला आहे. द्वितीय क्रमांक छत्तीसगडमधील अंबिकापूरला, तर तृतीय कर्नाटकमधील म्हैसूरला मिळाला आहे.

अन्य पुरस्कार :
 • सर्वाधिक स्वच्छ मोठे (10 लक्षाहून अधिक लोकसंख्या) शहर
 • अहमदाबाद (गुजरात)
 • सर्वाधिक स्वच्छ मध्यम (3–10 लक्ष) शहर
 • उज्जैन (मध्यप्रदेश)
  सर्वाधिक स्वच्छ छोटे (1 - 3 लक्ष) शहर
 • नवी दिल्ली महापालिका
 • गंगाकाठचे सर्वात स्वच्छ शहर
 • भोपाळ (मध्यप्रदेश)
 • सर्वाधिक वेगाने वाढणारे मोठे शहर
 • रायपूर (छत्तीसगड)
 • सर्वाधिक वेगाने वाढणारे मध्यम शहर
 • मथुरा-वृंदावन (उत्तरप्रदेश)
 • क्षेत्र-निहाय भारताचा सर्वाधिक स्वच्छ शहर (<1 लक्ष)
 • उत्तर - नवाशहर (पंजाब)
 • पूर्व – नहरपूर (छत्तीसगड)


हरियाणा राज्य सरकारची ‘मुख्यमंत्री परिवार सम्मान निधी योजना’
 • हरियाणा राज्य सरकारने राज्यात ‘मुख्यमंत्री परिवार सम्मान निधी योजना’ लागू केली आहे.
 • या योजनेच्या अंतर्गत, कुटुंबाचे मासिक उत्पन्न 15,000 रुपयांपेक्षा कमी असलेल्या आणि 5 एकर क्षेत्रफळापर्यंत स्वमालकीचा भूखंड असलेल्या छोट्या व किरकोळ शेतकरी कुटुंबाला दरवर्षी 6000 रुपये अनुदान दिले जाणार. 
 • ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरित केली जाईल. 
 • या योजनेच्या अंतर्गत दोन श्रेणी असतील, त्या म्हणजे - (i) 18 ते 40 वर्षे वयोगटातील लाभार्थी (ii) 40 ते 60 वर्षे वयोगटातील लाभार्थी.
 • या योजनेमध्ये विमा समाविष्ट करण्यात आला आहे, ज्यामार्फत नैसर्गिक मृत्यू झाल्यास 2 लक्ष रूपयांचा विमा दिला जाईल. 
 • तसेच अपघाती मृत्यूसाठी 2 लक्ष रुपये, कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास 2 लक्ष रुपये आणि आंशिक अपंगत्व आल्यास 1 लक्ष रुपयांचा विमा दिला जाईल.


केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाची 'वेब वंडर विमेन' मोहीम
 • दिनांक 6 मार्च 2019 रोजी नवी दिल्लीत भारत सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्यावतीने ‘वेब वंडर विमेन’ या मोहिमेसाठीचा सत्कार समारंभ पार पडला. 30 जणांना याप्रसंगी पुरस्कृत करण्यात आले.
 • सामाजिक माध्यमांद्वारे सकारात्मक सामाजिक बदल घडवून आणण्यात मिळविलेल्या असाधारण यशासाठी महिलांचा सन्मान करण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. 
 • 'वेब वंडर विमेन' हा मंत्रालयाच्या 'विमेन अचीव्हर्स' नावाच्या मोहिमेचा तिसरा घटक आहे.
 • असामान्य क्षेत्रात प्रवेश करणार्या महिलेचा सन्मान करण्यासाठी सन 2018 मध्ये 'फर्स्ट लेडीज' नावाचा उपक्रम मंत्रालय राबवत आहे.

Post a Comment

0 Comments