Daily Current Affiars 5 March 2019 in Marathi


आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या चेअरमनपदी अनिल कुंबळेची निवड
 • भारताचा माजी दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळेची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या चेअरमनपदी निवड झाली आहे. आयसीसी क्रिकेट बोर्डने शनिवारी ही घोषणा केली.
 • अनिल कुंबळे 3 वर्षांपर्यंत हे पद सांभाळणार आहे. आयसीसीची दुबई येथे बैठक झाली. त्या बैठकीत कुंबळेंना चेअरमन बनवण्याचा निर्णय घेण्यात आला.
 • अनिल कुंबळे यापूर्वीही आयसीसीच्या चेअरमनपदी कार्यरत होता. 2012 मध्ये त्याला आयसीसीच्या सदस्यपदी नियुक्त करण्यात आले होते.
 • दरम्यान, आयसीसीचा सदस्य आणि चेअरमन झाल्यानंतर कुंबळे यांने 2016 ला भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे.


लोकसभा निवडणूक आचारसंहिता ८ मार्चला
 • लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ८ मार्चपासून लागू होण्याची शक्यता आहे. 
 • हे लक्षात घेता एकामागून एक निर्णय घेण्याचा सपाटा राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने लावला आहे.
 • ५ मार्च आणि ७ मार्च रोजी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. 
 • निवडणुकीवर नजर ठेवून आणखी काही निर्णय घेतले जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काही विकास प्रकल्पांचे भूमिपूजन ५ तारखेला होईल.
 •  त्यात समृद्धी महामार्गाचाही समावेश असेल, असे सूत्रांनी सांगितले.
 • ग्रामपंचायतींसाठी समिती : राज्यातील सरपंचांच्या समस्या सोडविण्यात येतील आणि ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यासाठी शासनाची समिती स्थापन केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणीवस यांनी दिले.


डॅन कोलोव्ह निकोला पेट्रोव्ह कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी 4 पदक जिंकले
 • बल्गेरियात खेळल्या गेलेल्या ‘डॅन कोलोव्ह निकोला पेट्रोव्ह स्पर्धा 2019’ या कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी दोन सुवर्णपदकांसह चार पदके जिंकली आहेत.
 • पुरुष गटात बजरंग पुनिया (65 किलो) तर महिलांमध्ये पूजा धांडा (59 किलो) यांनी सुवर्णपदक पटकावले आहे. बजरंगने 65 किलो फ्रीस्टाईल गटाच्या अंतिम लढतीत अमेरिकेच्या जॉर्डन ऑलिव्हरचा पराभव केला.
 • साक्षी मलिक (65 किलो फ्रीस्टाईल), संदीप तोमर (पुरुषांमध्ये 61 किलो फ्रीस्टाईल गटात) यांनी स्पर्धेत रौप्यपदक मिळवले.


तृतीयक आरोग्य सेवा कार्यक्रमांना आर्थिक पाठिंबा देण्यास मंजुरी मिळाली
आर्थिक विषयक मंत्रिमंडळ समितीने (CCEA) 2020 सालापर्यंत असंक्रामक रोग आणि ई-आरोग्यासाठी तृतीयक आरोग्य सेवा कार्यक्रमांची (Tertiary HealthCare Programs) अंमलबजावणी पुढेही चालू ठेवण्यास त्यांची मंजुरी दिली आहे, ज्यासाठी 2551.15 कोटी रुपयांचा खर्च देखील मंजूर करण्यात आला आहे.
या कार्यक्रमांमध्ये पुढील घटकांचा समावेश आहे.
 • तृतीयक कर्करोग निगा सुविधा योजना (Tertiary Care Cancer facilities Scheme) भक्कम करणे.
 • वृद्धांच्या आरोग्य सेवेसाठी राष्ट्रीय कार्यक्रम
 • आघात आणि जळण्याच्या जखमा याविषयक राष्ट्रीय प्रतिबंधक आणि व्यवस्थापन कार्यक्रम
 • तंबाखू नियंत्रण आणि व्यसनावरील उपचारांसाठीचा राष्ट्रीय कार्यक्रम
 • राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम
 • अंधत्व आणि अर्ध-अंधत्वाच्या नियंत्रणासाठी राष्ट्रीय कार्यक्रम
 • ई-आरोग्य आणि टेलीमेडिसिन सेवा सुदृढ करण्यासाठी कार्यक्रम
 • तृतीयक पातळीवर आवश्यक पायाभूत संरचना तयार करण्यासाठी, या क्षेत्रात संशोधनास प्रोत्साहन देण्यासाठी, याबाबत प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्याच्या हेतूने हा कार्यक्रम आहे.
 • कर्करोगाचे निदान आणि उपचार, वयोवृद्धांची काळजी, आघात आणि जळण्याच्या जखमा, अंमली पदार्थांचे अवलंबित्व, मानसिक आरोग्य आणि अंधत्व या क्षेत्रांचा तृतीयक आरोग्यामध्ये समावेश होतो.


भारत आणि ब्रुनेई यांच्यात कर माहिती व विनिमय करार (TIEA) झाला
 • भारताचा ब्रुनेईसोबत कर माहिती आणि विनिमय करार (TIEA) झाला.
 • दोन देशांदरम्यान करविषयक बाबींच्या माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी हा करार केला जातो, ज्यामुळे कर चोरी टाळण्यास मदत होते. 
 • हा करार दोन्ही देशांमधील बँकिंग आणि मालकी संबंधी माहितीचे विनिमय करण्यास सक्षमता प्रदान करते.
 • ब्रुनेई दरुसलेम हा आग्नेय आशियातील बोर्निओ बेटाच्या उत्तर किनाऱ्यावर वसलेला देश आहे. मलेशियाच्या सारावाक राज्यामधील लिंबांग प्रदेशामुळे ब्रुनेई भूराजकीयदृष्ट्या दोन भागांमध्ये विभागला गेला आहे. 
 • बंदर सेरी बेगवान ही देशाची राजधानी असून ब्रुनेई डॉलर हे राष्ट्रीय चलन आहे.

Post a Comment

0 Comments