Daily Current Affiars 29 March 2019 (चालू घडामोडी)


UNDP चा “जागतिक बहुआयामी दारिद्य निर्देशांक 2018”
 • वित्त वर्ष 2005-06 ते वित्त वर्ष 2015-16 या काळात भारतात 27.1 कोटी (271 दशलक्ष) लोक दारिद्र्यरेषेच्या बाहेर आले आहेत, असे 'जागतिक बहु-आयामी दारिद्य निर्देशांक 2018' यामध्ये दिसून आले आहे.
 • 'जागतिक बहुआयामी दारिद्य निर्देशांक 2018' (Global MPI 2018) या शीर्षकाखाली एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा अहवाल संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम (UNDP) आणि ऑक्सफोर्ड पॉव्हर्टी अँड ह्यूमन डेव्हलपमेंट इनिशिएटीव्ह (OPHI) यांनी संयुक्तपणे तयार केला.
 • भारतात दरिद्री लोकांची संख्या घटून अर्धी राहिली आहे, जी 55% वरून घटून 28% झाली आहे.
 • भारतात वर्ष 2015-16 मध्ये 364 दशलक्ष लोक अजूनही दरिद्री आहेत, जे कोणत्याही देशाच्या तुलनेत सर्वाधिक आहे.
 • भारतात सर्वाधिक प्रमाणात दारिद्र्य चार राज्यांमध्ये आहे. बिहार, झारखंड, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये दरिद्री लोकांची संख्या (जवळपास 19.6 कोटी) जास्त आहे, जेथे अर्ध्याहून अधिक दरिद्री लोक राहतात.


अंतराळातला उपग्रह पाडणार्या देशांमध्ये भारत सामील
 • 27 मार्च 2019 रोजी भारताने आपल्या महत्त्वाकांक्षी 'मिशन शक्ती' या मोहिमेच्या अंतर्गत क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह पाडण्यात यश मिळवले आहे. ही मोहीम फक्त 3 मिनिटांत फत्ते झाली.
 • अशी कामगिरी करणारा भारत हा अमेरिका, चीन, रशियानंतर जगातला चौथा देश ठरला आहे.
 • अंतराळात पृथ्वीच्या खालच्या कक्षेत 300 किलोमीटर अंतरावर असलेल्या उपग्रहाला लक्ष्य करून तो पाडण्याच्या या मोहिमेला भारताने 'मिशन शक्ती' असे नाव दिले. उपग्रह भारतातच तयार करण्यात आलेल्या ‘ए-सॅट’ (अॅंटी-सॅटलाइट) क्षेपणास्त्राद्वारे नष्ट करण्यात आला.
 • मोहिमेसाठी भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संस्थेनी (DRDO) उच्चकोटीची तांत्रिक प्रणाली विकसित केली. प्रामुख्याने DRDO आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) या दोन प्रमुख संस्थांनी या प्रकल्पावर गेली काही वर्षे काम केले आहे.


क्षार तयार करणारे कुटुंब - हॅलोजन
 • हॅलोजन हे मूलद्रव्यांचे कुटुंब क्षारांच्या निर्मितीत आघाडीवर आहे. 
 • या कुटुंबाचा सदस्य असणाऱ्या क्लोरिनपासून बनलेला, अगदी प्राचीन काळापासूनचा सुपरिचित क्षार म्हणजे नेहमीचे  ‘मीठ’ - सोडियम क्लोराइड! 
 • हॅलोजन गटातील सर्वात प्रथम शोधले गेलेले मूलद्रव्य हेसुद्धा क्लोरिनच. 
 • हे मूलद्रव्य १७७४ साली कार्ल शील या स्वीडिश वैज्ञानिकाने शोधले. 
 • पायरोल्युझाइट (मँगेनीज डायऑक्साइड) या खनिजावर म्युरिअॅटिक (हायड्रोक्लोरिक) आम्लाची क्रिया झाल्यानंतर त्यातून एक हिरवट वायू बाहेर पडल्याचे कार्ल शीलला दिसून आले. 
 • आम्लधर्मी असणारा हा वायू, वस्तूचा रंग घालवीत असल्याचे निरीक्षण शीलने नोंदवले. 
 • आम्लधर्मी पदार्थात ऑक्सिजनच्या अणूचा समावेश असलाच पाहिजे, या तत्कालीन समजुतीपायी हा वायू म्हणजे एखादे ऑक्सिजनयुक्त आम्ल असण्याची शक्यता त्याने व्यक्त केली.


ब्रेक्झीट
 • युरोपिय संघामधून ब्रिटनने बाहेर पडण्याचा निर्णय तीन वर्षांपूर्वीच्या सार्वमतातूनच झाला आहे. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी कधी आणि कशी करायची, याबाबत अजूनही अनिश्चितता कायम आहे. 
 • युरोपियन युनियन मधून बाहेर पडण्यासाठी थेरेसा मे यांच्या नेतृत्वाखाली जे ब्रेक्झीट डील मांडले गेले. विरोधी पक्षांसह सत्ताधारी पक्षातील काही खासदारांनी ही विरोध दर्शविल्याने दोन वेळा ब्रिटिश संसदेत नामंजूर झालं. 
 • ब्रेक्झिटची नियोजित वेळ 29 मार्च होती. परंतु ब्रिटन मधील सध्याचे वातावरण पाहता ठरलेल्या वेळेत ब्रेक्झिट होईल असे वाटत नाही. 
 • सध्या युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्यासाठी ब्रिटनाला मुदतवाढ देण्यात आली आहे.
 • जर पुन्हा मांडण्यात आलेला ठराव ब्रिटनच्या संसदेने ठराव मान्य केला तर ब्रिटन 22 मे रोजी युरोपिय संघातून बाहेर पडू शकेल.अन्यथा 'कोणत्याही ठरावाशिवाय' 12 एप्रिलला ब्रिटनला युरोपिय संघातून बाहेर पडावे लागेल, असे युरोपिय संघाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.


राष्ट्रपती राम नाथ कोविंद ह्यांना क्रोएशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान दिला गेला
 • दिनांक 27 मार्च 2019 रोजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद ह्यांनी क्रोएशिया या देशाला भेट दिली. ते क्रोएशिया, बोलिव्हिया आणि चिली या तीन युरोपीय देशांच्या दौऱ्यावर आहेत.
 • या भेटीदरम्यान क्रोएशियाचे राष्ट्राध्यक्ष कोलिंदा ग्रबर-कित्रोव्हिक ह्यांनी राष्ट्रपती राम नाथ कोविंद ह्यांना क्रोएशियाचा ‘ग्रँड ऑर्डर ऑफ द किंग ऑफ टॉमस्लाव्ह’ हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन सन्मानित केले.
 • याशिवाय, संस्कृती, पर्यटन, क्रिडा या क्षेत्रांमध्ये तसेच संस्कृत आणि हिंदी या भाषेसाठी जागा तयार करण्यासाठी भारताने क्रोएशियासोबत चार सामंजस्य करार केले.
 • क्रोएशिया हा पूर्व युरोपीय देश आहे, ज्याला एड्रियाटिक समुद्राची दीर्घ किनारपट्टी लाभलेली आहे. 
 • झगरेब ही देशाची राजधानी आहे आणि क्रोएशियाई कुना हे राष्ट्रीय चलन आहे.

Post a Comment

0 Comments