Daily Current Affiars 1 April 2019 (चालू घडामोडी)


'हिकिकोमोरी': चर्चेत असलेला जपानी शब्द
 • जपानच्या सरकारच्या अहवालानुसार, देशात 40 ते 64 या वयोगटातले 6,13,000 'हिकिकोमोरी' आहेत. एका सर्वेक्षणानुसार लोकसंख्येच्या 2.4% तरुण जपानी लोकांमध्ये ही स्थिती उद्भवलेली आहे, त्यात स्त्रियांच्या संख्येच्या चौपट पुरुषांचा समावेश आहे. 
 • 'हिकिकोमोरी' याचा अर्थ काय? वयोवृद्ध होत चाललेल्या जपानमध्ये एकलकोंडेपणा बळावत चालला आहे. एकलकोंडेपणा या शब्दाला जपानी भाषेत “हिकिकोमोरी” हा शब्द दिला गेला आहे.
 • या शब्दाचा असा अर्थ होतो की “अशी व्यक्ती जी कुठल्याही शाळेत जात नाही किंवा सहा महिने किंवा अधिक कोणतेही काम करीत नाही आणि त्या काळात ती व्यक्ती कुटुंबाच्या बाहेर कोणाशीही कुठल्याहीप्रकारे संवाद साधत नाही”. दीर्घकाळ सामाजिक संबंधापासून दूर राहणारी व्यक्ती म्हणजे हिकिकोमोरी होय.
 • हा शब्द पहिल्यांदा तामीकी सैटो ह्यांनी आपल्या “शाकैतेकी हिकिकोमोरी: ओवारानै शिशून्की” हे शीर्षक असलेल्या पुस्तकात वापरला होता. हे पुस्तक ‘सोशल विदड्रॉवल: ए नेव्हरएंडिंग अडॉलेसेन्स” म्हणून भाषांतरित करण्यात आले आहे.
 • जपान प्रशांत महासागर प्रदेशातला एक बेट राष्ट्र आहे. या देशाची राजधानी टोकियो हे शहर आहे आणि


WEF ग्लोबल एनर्जी ट्रांझिशन इंडेक्समध्ये भारत 76 व्या स्थानावर
 • जागतिक आर्थिक मंच (डब्ल्यूईएफ) च्या ग्लोबल एनर्जी ट्रांझिशन इंडेक्समध्ये भारत 76 व्या स्थानावर आहे. 
 • तथापि, मागील निर्देशांकाच्या तुलनेत भारताने दोन स्थानांची उडी घेतली आहे.
 • वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF), ने जाहीर केलेल्या वार्षिक निर्देशांकच्या नवीन आवृत्तीत स्वीडन देखील यावर्षी आघाडीवर राहिले आहेत. 
 • जेनेव्हा-आधारित जागतिक आर्थिक मंचाने संकलित केलेल्या या वार्षिक यादीमध्ये ऊर्जा सुरक्षितता आणि पर्यावरणीय स्थिरता आणि क्षमतेसह प्रवेश संतुलित करण्यास ते किती सक्षम आहेत यावर 115 अर्थव्यवस्थांना जागा देण्यात आली आहे.


भारताचे बोलिव्हियासोबत 8 सामंजस्य करार झालेत
 • भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद ह्यांनी दिनांक 30 मार्च 2019 रोजी बोलिव्हिया या देशाला भेट दिली. बोलिव्हियाचे राष्ट्रपती इवो मोरालेस ह्यांनी राष्ट्रपती कोविंद ह्यांना बोलिव्हियाचा सर्वोच्च नागरी सन्मान (ग्रँड कॉलर) देऊन गौरव केला.
 • या भेटीत दोन्ही देशांमधील संबंध बळकट करण्याच्या उद्देशाने विविध क्षेत्रात आठ सामंजस्य करार केले गेलेत. सांस्कृतिक, राजकीय मुस्तद्दींसाठी व्हिसा सवलत व्यवस्था, राजकीय प्रशिक्षण संस्था, खनिकर्म, अंतराळ, पारंपारिक औषधी या क्षेत्रांमध्ये तसेच माहिती तंत्रज्ञान व बाय-ओशनिक रेल्वे प्रकल्प विषयक उत्कृष्टता केंद्र याच्या स्थापनेसाठी हे करार करण्यात आले.
 • सोबतच बोलिव्हिया आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) याचा भागीदार बनण्यासाठी त्यासंबंधी कार्यचौकटीच्या दस्तऐवजावर स्वाक्षरी करण्यात आली. 
 • बोलिव्हिया हा दक्षिण अमेरिका खंडाच्या मध्य भागातला एक भूपरिवेष्ठित देश आहे. ला पाझ ही देशाची राजधानी आहे आणि बोलिव्हियाई बोलिव्हियानो हे राष्ट्रीय चलन आहे.


IUCNच्या रेड लिस्टमध्ये भारतीय ‘महासीर’ मासा समाविष्ट
 • आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ (IUCN) याच्या ‘रेड लिस्ट ऑफ थ्रेटंड स्पेसीज’ या यादीत कुबड असलेला भारतीय ‘महासीर’ मासा समाविष्ट करण्यात आला आहे. 
 • या यादीत सूचीबद्ध होणे म्हणजे "लुप्त होत असलेली प्रजाती" असा अर्थ होतो.
 • ‘महासीर’ मासा ताज्या पाण्यात आढळणारा मोठ्या आकाराचा मासा आहे. त्याला पाण्यातला वाघ म्हणतात. 
 • हा मासा केवळ कावेरी नदीच्या खोर्‍यात (केरळच्या पंबर, काबीनी आणि भवानी नद्यांमध्येही) आढळतो.
 • नोव्हेंबर 2018 मध्ये ग्रेट हॉर्नबिल या मास्यासह अन्य 12 भारतीय प्रजातींना देखील या यादीत समाविष्ट केले गेले.


वाय. व्ही. रेड्डी लिखित “इंडियन फिस्कल फेडरॅलीझम” पुस्तक
 • सहलेखक जी. आर. रेड्डी सोबत वाय. व्ही. रेड्डी याचे “इंडियन फिस्कल फेडरॅलीझम” हे शीर्षक असलेले नवे पुस्तक प्रकाशित झाले. ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटी प्रेस हे या पुस्तकाचे प्रकाशक आहेत.
 • वाय. व्ही. रेड्डी भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि चौदाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. तसेच त्यांनी केंद्रीय आणि राज्य सरकार अश्या दोन्हीमध्ये विविध पदांवर भूमिका बजावविलेली आहे.

Post a Comment

0 Comments