loading...

Daily Current Affiars 27 February 2019 in Marathi

loading...

नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी विश्वास नांगरे पाटील
 • कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांची नाशिक पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून रवींद्र सिंघल यांच्या जागी विश्वास नागरे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 • रवींद्र सिंघल आणि विश्वास नांगरे पाटील हे दोन्हीही कर्तव्यनिष्ठ आणि धडाडीचे आयपीएस अधिकारी म्हणून ओळखले जातात.


99 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आजपासून, सलग 60 तास चालणार संमेलन
 • आज संध्याकाळी 6.30 वाजता संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ नाटककार आणि लेखक महेश एलकुंचवार यांच्या हस्ते होणार आहे.
 • या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उदघाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत.


UN सुरक्षा परिषदेत पुलवामा हल्ल्याचा निषेध, चीनने भारताला समर्थन दिल्याने पाकिस्तानची कोंडी
 • पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत असल्याचं दिसत आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) हा दहशतवादी हल्ला अत्यंत भयानक आणि भ्याड असल्याचं सांगत कडक शब्दांत निषेध नोंदवला आहे.
 • संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत १५ देशांचा समावेश असून यामध्येही चीनदेखील आहे. सुरक्षा परिषदेने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा उल्लेख करत अशा हल्ल्यांसाठी जबाबदार दोषींना कडक शिक्षा झाली पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. हा पाकिस्तानसाठी मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे.
 • महत्त्वाचं म्हणजे, संयुक्त राष्ट्राकडून जारी करण्यात आलेल्या प्रेस स्टेटमेंटमध्ये मसूद अझहर म्होरक्या असणाऱ्या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा उल्लेख केला आहे. 
 • संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत चीनदेखील समाविष्ट आहे. चीनने नेहमीच मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या मागणीला विरोध केला आहे. सुरक्षा परिषदेने यावेळी दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी भारताला शक्य ती मदत करण्याचं आवाहन केलं आहे.


देशातील पहिला रोबो पोलीस कार्यरत
 • केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी त्रिवेंद्रम पोलीस मुख्यालयात देशातील पहिला मानवी रोबो पोलिस 'केपी-बॉट'चे उद्घाटन केले.
 • केपी-बॉटला पोलीस उपनिरीक्षकाचा दर्जा देण्यात आला आहे. 
 • हा भारतातील पहिला ह्यूमनॉइड, तर जगातील चौथा रोबो आहे. डेटा गोळा करणे, तसेच पोलिसांच्या कामगिरीत सुधारणा घडवून आणणे ही कामे केपी-बॉट करणार आहे..


राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरण 2019
केंद्रीय मंत्रिमंडळाने इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने प्रस्तावित केलेल्या ‘राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरण 2019’ याला मंजुरी दिली आहे.

धोरणाची उद्दिष्टे :
 • ESDM क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची उपलब्धता वाढविण्यासाठी समर्थन देणे.
 • देशात देशातच संरचित मायक्रोचिपचे उत्पादन देण्यास तसेच त्यांचा धोरणात्मक आणि महत्त्वपूर्ण आधारभूत संरचना क्षेत्रांमध्ये वापर करण्यास प्रोत्साहन देणे.
 • पर्यावरणाला अनुकूल अश्या पद्धतीने ई-कचर्याची सुरक्षितपणे विल्हेवाट, ई-कचर्याचे पुनरुत्पादन घेणारे उद्योग आणि ई-कचर्याचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्वोत्तम पद्धतींचा विकास करण्यासाठी उद्योगांना संशोधन, अभिनवतेला प्रोत्साहन आणि समर्थन देणे.
 • जागतिक स्पर्धात्मक ESDM क्षेत्रासाठी पर्यावरण-प्रणाली तयार करणे. स्थानिक उत्पादन आणि निर्यात वाढीला प्रोत्साहन देणे.
 • मोठ्या प्रकल्पांसाठी प्रोत्साहनपर विशेष पॅकेज प्रदान करणे आणि सेमिकंडक्टर सुविधा, डिसप्ले उत्पादन इत्यादी क्षेत्रात मोठी गुंतवणूक करणे.
 • नवीन आणि सध्याच्या उद्योगांच्या विस्तारास प्रोत्साहन देण्यासाठी योग्य योजना आणि प्रोत्साहन पद्धती तयार करणे.
 • 5G, loT/संवेदक, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), मशीन लर्निंग, व्हर्च्युअल रिअलिटी, ड्रोन, रोबोटिक्स, फोटोनिक्स, नॅनो डिव्हाइस इ. उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संशोधन व विकास आणि नवकल्पना क्षेत्रात उद्योगांना प्रोत्साहन देणे.
 • ESDM क्षेत्रामध्ये बौद्धिक संपदेचा विकास आणि अधिग्रहणाला प्रोत्साहन देण्यासाठी सार्वभौम पेटंट निधी (SPF) तयार करणे.
  राष्ट्रीय सायबर सुरक्षा प्रोफाइल सुधारण्यासाठी विश्वसनीय इलेक्ट्रॉनिक्स मूल्य शृंखला पुढाकाराची जाहिरात करणे.

Post a Comment

0 Comments