loading...

Daily Current Affiars 13 February 2019 in Marathi

loading...
India's civilian agreement to combat marine pollution


सागरी प्रदूषणाशी लढा देण्यासाठी भारताचा नॉर्वेशी करार झाला
 • ‘भारत-नॉर्वे महासागर संवाद’ याची स्थापना करण्यासाठी जानेवारी 2019 मध्ये भारताचा नॉर्वेसोबत एक करार झाला होता. त्याला साथ म्हणून हा पुढाकार घेतला जात आहे. 
 • सागरामधील वाढते प्रदूषण ही चिंतेची बाब आहे आणि याला आळा घालण्यासाठी प्रयत्न करण्याच्या दृष्टीने एकत्र कार्य करण्याच्या उद्देशाने हा करार केला गेला आहे.
 • पहिल्यांदाच अश्या भागीदारीमधून दोन्ही देश आपले ज्ञान, अनुभव आणि क्षमता सामायिक करतील. स्वच्छ आणि निरोगी महासागर बनविण्यासाठी, सागरी संसाधनांचा सतत वापर व्हावा आणि निळ्या अर्थव्यवस्थेत वाढ करण्याच्या प्रयत्नांच्या संदर्भात सहयोग करतील.
 • नॉर्वे हा उत्तर-पश्चिम युरोपच्या द्वीपकल्पामधील एक देश आहे. या देशाची राजधानी ओस्लो शहर असून नॉर्वेजियन क्रोन हे देशाचे चलन आहे.


पी. चिदंबरम लिखित "अनडॉन्टेड: सेव्हिंग द आयडिया ऑफ इंडिया" पुस्तक
 • पी. चिदंबरम यांनी "अनडॉन्टेड: सेव्हिंग द आयडिया ऑफ इंडिया" या शीर्षकाखाली लिहिलेले पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
 • रूपा पब्लिकेशन्स कडून हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. या पुस्तकात त्यांनी देशाच्या वर्तमान स्थितीबाबत लिखाणकाम केले आहे. देशाच्या संविधानाविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.


राष्ट्रीय उत्पादकता आठवडा: 12 ते 18 फेब्रुवारी
 • “प्रोस्पेरिटी थ्रू प्रॉडक्टिव्हिटी” (उत्पादकतेच्या माध्यमातून समृद्धी) या संकल्पनेखाली ‘राष्ट्रीय उत्पादकता आठवडा 2019’ पाळला जात आहे.
 • सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजक आणि शेतकर्यांना प्रोत्साहन देण्यासाठी देशांतर्गत आणि परदेशी बाजारपेठेत त्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी ‘राष्ट्रीय उत्पादकता परिषद’ कडून 1982 साली राष्ट्रीय उत्पादकता पुरस्कारांची स्थापना केली गेली, जे या काळात एका पुरस्कार वितरण सोहळ्यात वितरीत केले जातात.
 • व्यापार आणि सेवा क्षेत्रात जागतिक व्यापारात भारताचा वाटा वाढत आहे. WTOने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2004 साली भारताचा हिस्सा 1.1% वरून 2006 साली 1.5% पर्यंत गेला आहे.


कुरुक्षेत्रात तृतीय ‘स्वच्छ शक्ती’ ही महिला सरपंचांची परिषद पार पडली
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हरियाणा राज्यातल्या कुरुक्षेत्र शहरात ‘स्वच्छ शक्ती 2019’ या महिला सरपंचांच्या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.
 • स्वच्छ शक्ती या राष्ट्रीय कार्यक्रमात, स्वच्छ भारत अभियानात ग्रामीण महिलांनी बजावलेली नेतृत्वपूर्ण भूमिका यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. देशभरातल्या महिला सरपंच आणि पंच या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
 • भारत सरकारच्या पेय जल आणि स्वच्छता मंत्रालयाने हरियाणा सरकारच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन केले. स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत ग्रामीण भागात अवलंबिलेल्या उत्तम प्रथा यावेळी प्रदर्शनास मांडण्यात आल्या.
 • याप्रसंगी स्वच्छ शक्ती पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. शिवाय स्वच्छ सुंदर शौचालय प्रदर्शनीही भरविण्यात आली. तसेच हरियाणातल्या विविध विकास प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि भूमिपूजन देखील करण्यात आले.


डेरा बाबा नानक भूमी तपास नाका हे भारतामधले अधिकृत इमिग्रेशन केंद्र बनले
 • पाकिस्तान देशातल्या कर्तारपूर साहिब गुरुद्वाराला भेट देण्यासाठी जाणार्या भारतीय नागरिकांसाठी म्हणून केंद्र सरकारने ‘डेरा बाबा नानक भूमी तपास नाका’ याला अधिकृत इमिग्रेशन केंद्र बनविले.
 • या ठिकाणी वैध प्रवासाच्या कागदपत्रांसह सर्व वर्गातले प्रवासी देशाबाहेर आणि देशात मार्गक्रमण करू शकतात. तसेच कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकारने मुख्य इमिग्रेशन अधिकारीची ‘नागरी प्राधिकरण’ म्हणून नेमणूक केली आहे.
 • दिनांक 26 नोव्हेंबर 2018 रोजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी गुरुदासपूर जिल्ह्यातील मान गावात एका कार्यक्रमात डेरा बाबा नानक-कर्तारपूर साहिब मार्गिका’ याचे भूमिपूजन केले होते. तर 28 नोव्हेंबरला पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानाच्या बाजूने चार किलोमीटरचा मार्ग तयार करण्यासाठी कोणशीला ठेवली होती.

Post a Comment

0 Comments