loading...

चालू घडामोडी 11 फेब्रुवारी 2019


सॉलिड फ्युएल डक्टेड रामजेट (SFDR) क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी
 • देशाच्या संरक्षण संशोधन व विकास संघटनेने (DRDO) तयार केलेल्या सॉलिड फ्युएल डक्टेड रामजेट (SFDR) तंत्रावर आधारित क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीपणे घेण्यात आली आहे. 
 • DRDOने देशातच विकसित केलेल्या सॉलिड फ्युएल डक्टेड रामजेट (SFDR) या घन-इंधनावर चालणार्या प्रोपल्शन तंत्राने क्षेपणास्त्र उड्डाण घेण्यास सक्षम आहे.
 • त्यामुळे देशात दीर्घ पल्ल्याचे हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र विकसित करण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.
 • संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) ही भारताच्या संरक्षण क्षेत्रात संशोधनासाठी असलेली मुख्य संघटना आहे. 
 • याची स्थापना 1958 साली करण्यात आली आणि याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे.


पी. चिदंबरम लिखित "अनडॉन्टेड: सेव्हिंग द आयडिया ऑफ इंडिया" पुस्तक

 • पी. चिदंबरम यांनी "अनडॉन्टेड: सेव्हिंग द आयडिया ऑफ इंडिया" या शीर्षकाखाली लिहिलेले पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
 • रूपा पब्लिकेशन्स कडून हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. या पुस्तकात त्यांनी देशाच्या वर्तमान स्थितीबाबत लिखाणकाम केले आहे. 
 • देशाच्या संविधानाविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.


ध्रुव पटेल यांना त्यांच्या सेवेसाठी ब्रिटनमध्ये शाही सन्मान प्राप्त झाला

 • भारतीय वंश असलेल्या ध्रुव पटेल यांना ब्रिटनमध्ये वास्तव्यास असलेल्या हिंदू समाजाच्या विकासासाठी आणि सामाजिक समाकलनासाठी त्यांनी दिलेल्या स्वैच्छिक सेवेचा सन्मान करण्यासाठी शाही सन्मान प्राप्त झाला आहे. 
 • बकिंघहम पॅलेसमध्ये एका समारंभात ध्रुव पटेल यांना प्रिन्स विलियम यांच्या हस्ते OBE (ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर) हा शाही सन्मान देण्यात आला आहे.
  35 वर्षीय पटेल मालमत्ता, किरकोळ फार्मसी आणि विमा हितसंबंध सांभाळणारे एक व्यावसायिक आहेत. ते ‘सिटी हिंदस नेटवर्क’ या नावाची एक ना-नफा संस्था चालवत आहेत. 
 • त्यांनी सामाजिक आरोग्य, शिक्षण, गृहनिर्माण, आरोग्य व कल्याण अश्या विषयांशी जुळलेल्या अनेक सार्वजनिक संस्थांमध्ये जबाबदार्या सांभाळलेल्या आहेत.


गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस (GeM) आणि भारतीय स्पर्धा आयोग (CCI) यांच्यात करार

ई-बाजारपेठमध्ये वाजवी आणि स्पर्धात्मक वातावरण तयार करण्यासाठी, गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस (GeM) आणि भारतीय स्पर्धा आयोग (CCI) यांच्यात 6 फेब्रुवारीला एक करार झाला.

प्रतिस्पर्धा-विरोधी पद्धतींचा शोध घेण्यासाठी सार्वजनिक खरेदी मंचाचे ज्ञान प्राप्त करण्यासाठीच्या उद्देशाने हा करार केला गेला आहे.
 
गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (GeM) : हा वाणिज्य मंत्रालयाचा एक ऑनलाइन मंच आहे, जेथे सरकारी विभाग, सार्वजनिक क्षेत्रातल्या संस्था आणि इतर विभागांकडून वस्तू व सेवांची खरेदी केली जाते. सन 2016 पासून वस्तू व सेवांची भारत सरकारच्या सार्वजनिक खरेदी प्रक्रिया मंत्रालयाच्या ई-मार्केट व्यासपीठाद्वारे (GeM) व्यवस्थापित केली जात आहे. CII प्रादेशिक कार्यालयांमध्ये GeM संसाधन केंद्रे स्थापन केली गेली आहेत.
 
भारतीय प्रतिस्पर्धा आयोग (CCI) : प्रतिस्पर्धा अधिनियम-2002 अंतर्गत स्थापित भारतीय प्रतिस्पर्धा आयोग (CCI) ही भारताची एक विनियामक संस्था आहे, ज्याचा उद्देश भारतीय औद्योगिक व व्यापार क्षेत्रात भ्रष्टाचार विरहित स्पर्धेला प्रोत्साहन देणे हा आहे. याची 14 ऑक्टोबर 2003 रोजी स्थापना करण्यात आली. गेल्या 9 वर्षांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची वेगाने वृद्धी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिस्पर्धा कायदा मजबूत करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.


जम्मू व काश्मीर राज्य सरकारने लद्दाख प्रदेशाला ‘विभागीय’ दर्जा दिला
जम्मू व काश्मीर राज्य सरकारने लद्दाख प्रदेशाला ‘विभागीय’ दर्जा प्रदान केल्याची घोषणा केली गेली आहे. लद्दाख प्रदेशाला ‘विभागीय’ दर्जा प्राप्त झाल्यामुळे तेथे आता स्वतंत्र प्रशासकीय व महसूल विभाग तयार करण्यात येणार. जम्मू विभाग आणि काश्मीर विभागानंतर हा राज्यातला तिसरा विभाग आहे.
 
लद्दाख :
 • हा जम्मू व काश्मीर राज्यातला सर्वात कमी लोकसंख्या असलेल्या प्रदेशांपैकी एक आहे आणि हे राज्यातले सर्वात उंच पठार आहे. 
 • प्रदेशाचा बहुतेक भाग समुद्रसपाटीपासून सुमारे 9800 फूट उंचीवर आहे. हा भौगोलिकदृष्ट्या एक अलिप्त भाग आहे आणि वर्षातले जवळपास सहा महिने हा भाग संपर्कात नसतो.
 • ‘जम्मू व काश्मीर लद्दाख स्वायत्त पर्वत विकास परिषद अधिनियम-1997’ अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. 
 • या कायद्यानुसार, लेह आणि कारगिल जिल्ह्यांकरिता पर्वत विकास परिषदा देखील स्थापन करण्यात आल्या आहेत.


4 सदस्यांची राज्यसभेवर नियुक्ती

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 4 सदस्यांची नियुक्ती केली.
 1. शेतकरी नेते - राम शकल
 2. शिल्पकार - रघुनाथ मोहपात्रा
 3. शास्त्रीय नृत्यांगना - सोनल मानसिंग
 4. 'इंडिया पॉलिसी फाऊंडेशन' चे संस्थापक - राकेश सिन्हा

Post a Comment

0 Comments