चालू घडामोडी 3 फेब्रुवारी 2019

राजीव नयन चौबे: UPSC याचे नवे सदस्य
तामिळनाडू संवर्गामधील भारतीय प्रशासकीय सेवेमधील अधिकारी असलेले चौबे यांनी आपल्या 35 वर्षांहून अधिकच्या कारकिर्दीच्या काळात केंद्र सरकार आणि तामिळनाडू सरकारमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

राजीव नयन चौबे: UPSC याचे नवे सदस्य

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC)
 • भारत सरकारचे केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) याची स्थापना 1 ऑक्टोबर 1926 रोजी झाली. ही भारताची केंद्रीय निवड संस्था आहे.
 • आयोगामध्ये एक अध्यक्ष आणि दहा सदस्य असतात.
 • त्यांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती यांच्याकडून केली जाते. UPSC च्या अध्यक्ष पदाची नियुक्ती भारताच्या संविधानातील कलम 316 च्या उपखंड (1) अन्वये केली जाते.

ही संस्था अखिल भारतीय सेवा तसेच केंद्रीय सेवेच्या गट 'अ' व गट 'ब' कर्मचाऱ्यांच्या निवडीकरिता जबाबदार आहे. हा आयोग कर्मचारी, लोक तक्रारी आणि निर्वाहभत्ता मंत्रालयाच्या अखत्यारीत कर्मचारी व प्रशिक्षण विभागाच्या अंतर्गत कार्य करतो.


पंजाब राज्याने ‘स्मार्ट खेडे मोहीम’ या योजनेला मान्यता दिली
 • पंजाब राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यात ‘स्मार्ट खेडे मोहीम’ (Smart Village Campaign) राबविण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
 • राज्याच्या ग्रामीण भागात पायाभूत सुविधा आणि आवश्यक सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विकास कामे पूर्ण केली जात आहे. 
 • त्यासाठी मंत्रिमंडळाने 384.40 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. 14 वा वित्तीय आयोग आणि मनरेगा कार्यक्रमामधून या योजनेसाठी वित्तपुरवठा केला जाईल.
 • या योजनेच्या अंतर्गत उपायुक्त अधिकारी विभाग विकास, पंचायत अधिकारी व इतर प्रादेशिक विभागांकडून प्रस्ताव प्राप्त करतील. 
 • 25 लक्ष रुपयांपर्यंतच्या प्रकल्पांना उपायुक्त आणि अतिरिक्त उपायुक्त (विकास) यांच्याकडून मान्यता दिली जाईल आणि 25 लक्ष रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या प्रकल्पांना संयुक्त विकास आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समितीकडून मंजुरी देण्यात येईल.


शास्त्रज्ञांनी विचारांना भाष्यात बदलणारी AI आधारित प्रणाली विकसित केली
 • अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी मानवांच्या विचारांना ऐकण्यासाठी भाषेच्या स्वरुपात भाषांतरित करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित एक प्रणाली विकसित केली आहे.
 • शास्त्रज्ञांना असे करण्यात प्रथमच यश आले आहे. बाहेरच्या जगाशी संवाद साधण्याची क्षमता गमावलेल्या लोकांना संवाद साधण्यात या शोधामुळे मदत होऊ शकणार आहे.
 • मानवी मेंदुमध्ये विचार करताना एक प्रक्रिया चालते. मज्जातंतूमध्ये होणार्या या प्रकियेचे संकेत पकडून एका अल्गोरीदमच्या माध्यमातून त्यांचे भाषेत रूपांतरण केले जाते.


कामगारांसाठी सुरक्षा धोरण आणणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य
 • कामाच्या ठिकाणी सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण तयार व्हावे यासाठी कामगार व उद्योजकता विभाग आणि आरोग्य संचालनालयाच्या वतीने कामगारांसाठी पूरक वातावरण निर्माण करण्यासाठीचे धोरण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. 
 • कामगारांसाठी अशा प्रकारचे धोरण आणणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले असल्याची माहिती कामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी दिली.


लेफ्टनेंट जनरल राजीव चोप्रा: NCCचे नवे महासंचालक
 • लेफ्टनेंट जनरल राजीव चोप्रा यांची दिनांक 31 जानेवारी 2019 रोजी राष्ट्रीय विद्यार्थी सेना (NCC) याच्या महासंचालक पदी नेमणूक करण्यात आली आहे.
 • लेफ्टनेंट जनरल चोप्रा यांनी ऑपरेशन र्हायनो (आसाम) यामध्ये पायदळाच्या तुकडीचे नेतृत्व केले होते. तत्पूर्वी मणीपूरमध्ये पूर्व कमांडमध्ये तुकडीचे प्रमुख देखील होते. ते जून 2016 पासून मद्रास रेजिमेंटचे कर्नल देखील आहेत.
 • लेफ्टनेंट जनरल चोप्रा तांत्रिक कर्मचारी अधिकारी अभ्यासक्रमाचे पदवीधर आहेत. त्यांनी NDA खडकवासला, नॅशनल डिफेन्स युनिव्हर्सिटी (चीन) आणि नॅशनल डिफेन्स कॉलेज (नवी दिल्ली) येथे शिक्षण घेतले आहे. जानेवारी 2018 मध्ये त्यांच्या प्रतिष्ठित सेवेसाठी त्यांना अतिविशिष्ट सेवा पदक देऊन गौरविण्यात आले.

Post a Comment

0 Comments