चालू घडामोडी 2 फेब्रुवारी 2019

मिताली राज: 200 ODI सामने खेळणारी पहिली महिला क्रिकेटपटू

मिताली राज: 200 ODI सामने खेळणारी पहिली महिला क्रिकेटपटू
 • मिताली राज हिने तिच्या 200व्या एकदिवसीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले. एकदिवसीय सामन्यात 200 एकदिवसीय सामने खेळणारी ती प्रथम महिला क्रिकेटपटू ठरली आहे.
 • 36 वर्षीय मिताली राज ही एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक धावा काढणारी फलंदाज देखील आहे. तिने 51.33 च्या सरासरीने आतापर्यंत 6622 धावा केल्या असून त्यात सात शतकांचा समावेश आहे.


कामगारांसाठी सुरक्षा धोरण आणणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य
 • कामाच्या ठिकाणी सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण तयार व्हावे यासाठी कामगार व उद्योजकता विभाग आणि आरोग्य संचालनालयाच्या वतीने कामगारांसाठी पूरक वातावरण निर्माण करण्यासाठीचे धोरण तयार करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. 
 • कामगारांसाठी अशा प्रकारचे धोरण आणणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले असल्याची माहिती कामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी दिली.


शास्त्रज्ञांनी विचारांना भाष्यात बदलणारी AI आधारित प्रणाली विकसित केली
 • अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी मानवांच्या विचारांना ऐकण्यासाठी भाषेच्या स्वरुपात भाषांतरित करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित एक प्रणाली विकसित केली आहे. 
 • शास्त्रज्ञांना असे करण्यात प्रथमच यश आले आहे. बाहेरच्या जगाशी संवाद साधण्याची क्षमता गमावलेल्या लोकांना संवाद साधण्यात या शोधामुळे मदत होऊ शकणार आहे.
 • मानवी मेंदुमध्ये विचार करताना एक प्रक्रिया चालते. मज्जातंतूमध्ये होणार्या या प्रकियेचे संकेत पकडून एका अल्गोरीदमच्या माध्यमातून त्यांचे भाषेत रूपांतरण केले जाते.


​मधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘iAPS’ नावाचे नवे स्मार्टफोन अॅप लॉन्च
 • अमेरिकेच्या हार्वर्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी मधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘इंटरऑपरेबल आर्टिफिशियल पॅन्क्रिया सिस्टम (iAPS)’ नावाचे एक नवे स्मार्टफोन अॅप विकसित केले आहे.
 • हे अॅप वायरलेसद्वारे ग्लूकोज मॉनिटर आणि इंसुलिन पम्प उपकरणाशी जोडले जाणार, ज्यामधून रक्तामधील साखरेची पातळी नियंत्रित करता येणार. 
 • हे अॅप ​​आव्हानात्मक परिस्थितीत शरीरामधील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी सुरक्षित आणि प्रभावी आहे तसेच अवांछित वातावरणात वापरण्यासही योग्य आहे.
 • मधुमेह असलेल्या व्यक्तिमध्ये लक्ष्यित साखरेची पातळी ही 70-180 मायक्रोग्राम प्रति डेसिलीटर या प्रमाणात असणे आवश्यक आहे. या अॅपमुळे ही पातळी राखण्यात यश आले आहे.


भारतात वर्ष 2017-18 मध्ये बेरोजगारीचा दर 6.1% होता: NSSO

राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय (NSSO) कडून केलेल्या नियतकालिक कामगार बळ सर्वेक्षण (PLFS) यानुसार, भारतामधील बेरोजगारीच्या दराने गेल्या 45 वर्षांचा विक्रम मोडला असून वित्त वर्ष 2017-18 मध्ये बेरोजगारीचा दर 6.1% होता.

NSSO च्या सर्वेक्षणानुसार, 
 • वर्ष 2017-18 मध्ये शहरी भागात बेरोजगारीचा दर 7.8% होता, तर ग्रामीण भागात 5.3% होता.
 • वर्ष 1972-73 नंतरचा 6.1% हा बेरोजगारीचा सर्वोच्च दर ठरला आहे आणि चालू वर्षात बेरोजगारीचे प्रमाण कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
 • सन 2018 मध्ये देशामधील बेरोजगारांची संख्या 1.86 कोटी होती आणि सन 2019 मध्ये 1.89 कोटींवर पोहोचेल, असा अंदाज आहे. सन 2017 मध्ये हे प्रमाण 1.83 कोटी होते.
 • वय वर्षे 15 ते 29 या वयोगटातील ग्रामीण तरुणांमध्ये बेरोजगारीचा दर 17.4 टक्क्यांवर इतका सर्वाधिक आहे, तर याच वयोगटातील ग्रामीण तरुणींमध्ये हा दर 13.6 टक्क्यांवर पोहचला आहे. शहरी भागातील बेरोजगारीचा दर पुरुषांसाठी 18.7% तर महिलांसाठी 27.2% आहे.
 • शिक्षण घेतलेल्या लोकांमध्ये बेरोजगारीचा दर वेगाने वाढत आहे. शिक्षित ग्रामीण महिलांसाठी बेरोजगारीचा दर 2017-18 या वर्षात 17.3% पर्यंत वाढला, तर ग्रामीण शिक्षित पुरुषांकरिता हा दर 10.5% होता.
 • आंतरराष्ट्रीय कर्मचारी संघटना (ILO) याने यापूर्वी अंदाजित केलेला 3.4% बेरोजगारीचा दर आता 3.5 टक्क्यांवर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सन 2017, सन 2018 आणि सन 2019 मध्ये बेरोजगारीचे प्रमाण 5.6 वरून 5.5 टक्क्यांवर आले.

Post a Comment

0 Comments