loading...

चालू घडामोडी 12 फेब्रुवारी 2019

loading...


गव्हर्नमेंट ई मार्केटप्लेस (GeM) आणि भारतीय स्पर्धा आयोग (CCI) यांच्यात करार

प्रतिस्पर्धा-विरोधी पद्धतींचा शोध घेण्यासाठी सार्वजनिक खरेदी मंचाचे ज्ञान प्राप्त करण्यासाठीच्या उद्देशाने हा करार केला गेला आहे.
 
गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (GeM)
  • हा वाणिज्य मंत्रालयाचा एक ऑनलाइन मंच आहे, जेथे सरकारी विभाग, सार्वजनिक क्षेत्रातल्या संस्था आणि इतर विभागांकडून वस्तू व सेवांची खरेदी केली जाते. सन 2016 पासून वस्तू व सेवांची भारत सरकारच्या सार्वजनिक खरेदी प्रक्रिया मंत्रालयाच्या ई-मार्केट व्यासपीठाद्वारे (GeM) व्यवस्थापित केली जात आहे. CII प्रादेशिक कार्यालयांमध्ये GeM संसाधन केंद्रे स्थापन केली गेली आहेत.

भारतीय प्रतिस्पर्धा आयोग (CCI)
  • प्रतिस्पर्धा अधिनियम-2002 अंतर्गत स्थापित भारतीय प्रतिस्पर्धा आयोग (CCI) ही भारताची एक विनियामक संस्था आहे, ज्याचा उद्देश भारतीय औद्योगिक व व्यापार क्षेत्रात भ्रष्टाचार विरहित स्पर्धेला प्रोत्साहन देणे हा आहे. याची 14 ऑक्टोबर 2003 रोजी स्थापना करण्यात आली. गेल्या 9 वर्षांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची वेगाने वृद्धी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रतिस्पर्धा कायदा मजबूत करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.


EGAT चषक 2019’ या आंतरराष्ट्रीय भारोत्तोलन स्पर्धेत रौप्यपदक

जेरेमी लालरिन्नुंगाने 67 किलो वजन गटातून खेळताना 288 किलो वजन उचलत रौप्यपदक मिळविले आहे. त्याने स्नॅचमध्ये 131 किलो तर क्लीन व जर्कमध्ये 157 किलो वजन उचलत दुसरे स्थान पटकावले. या गटात सुवर्णपदक इंडोनेशियाच्या डेनीने (303 किलो) जिंकले आणि किरीबातीच्या रूबेन काताएतोने (285 किलो) कांस्यपदक जिंकले


सॉलिड फ्युएल डक्टेड रामजेट (SFDR) क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

देशाच्या संरक्षण संशोधन व विकास संघटनेने (DRDO) तयार केलेल्या सॉलिड फ्युएल डक्टेड रामजेट (SFDR) तंत्रावर आधारित क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीपणे घेण्यात आली आहे.

दिनांक 8 फेब्रुवारी 2019 रोजी ओडिशामध्ये ही चाचणी घेण्यात आली. DRDOने देशातच विकसित केलेल्या सॉलिड फ्युएल डक्टेड रामजेट (SFDR) या घन-इंधनावर चालणार्या प्रोपल्शन तंत्राने क्षेपणास्त्र उड्डाण घेण्यास सक्षम आहे.

त्यामुळे देशात दीर्घ पल्ल्याचे हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र विकसित करण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.

संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO)
  • संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) ही भारताच्या संरक्षण क्षेत्रात संशोधनासाठी असलेली मुख्य संघटना आहे. याची स्थापना 1958 साली करण्यात आली आणि याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे.


BAFTA 2019
लंडनमध्ये पार पडलेल्या ब्रिटीश अॅकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स (BAFTA) कडून दिल्या जाणार्या 72 व्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात ब्रिटीश चित्रपटसृष्टीतल्या सर्वोत्कृष्ट कामगिरींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे.

● ‘द फेवरेट’ या चित्रपटाने विविध श्रेणीत सात पुरस्कार जिंकलेत, तर ‘रोमा’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासह आणखी तीन पुरस्कार प्राप्त झालेत.

● पुरस्कार विजेते
  • ‘रोमा’ चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपट, इंग्रजी भाषेत नसलेला सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (अल्फोंसो क्युरॉन) हे चार सर्वोच्च पुरस्कार प्राप्त केले आहेत.
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीः ओलिव्हिया कोलामन (द फेवरेट)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेताः रामी मलेक (बोहेमियन रॅपसोडी)
  • उल्लेखनीय ब्रिटिश चित्रपट: द फेवरेट
  • सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपट: स्पायडर-मॅन: इनटू द स्पायडर-व्हर्सEE राइझिंग 
  • स्टार अवॉर्ड: लेटीशिया राईटBAFTA
  • फेलोशीप: थेल्मा शूनमेकर

Post a Comment

0 Comments