चालू घडामोडी 15 जानेवारी 2019


अरुनिमा 4,892 मीटरचा शिखर सर करणारी जगातील पहिली अपंग महिला

अरुनिमाला धावत्या रेल्वेतून ढकलून देण्यात आले होते. त्यानंतर तिला तिचा एक पाय गमवावा लागला होता. हा अपघात 12 एप्रिल 2011 मध्ये झाला होता. मात्र, असे असतानाही तिने आपले ध्येय डोळ्यासमोर ठेऊन त्यादृष्टीने काम करण्याचे ठरविले.
 
जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर अरुनिमाने 21 मे, 2013 मध्ये माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केले. त्यानंतर आता अरुनिमाने अंटार्क्टिकातील शिखर माऊंट विन्सर सर केले. त्यामुळे ती हे शिखर सर करणारी ती जगातील पहिली अपंग महिला ठरली आहे.


‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेची व्याप्ती देशभर

२०१५ मध्ये सुरु झालेली ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजना ही 1) महिला आणि बाल कल्याण मंत्रालय (2) आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (3) मनुष्यबळ विकास मंत्रालय या तीन मंत्रालयांमार्फत राबवली जाते. 

या मार्फत गर्भ लिंग निदान कायद्याची अंमलबजावणी, महिलांची प्रसुती पूर्व आणि प्रसुती पश्चात देखभाल, मुलींचे शिक्षण, सामाजिक सहभाग आणि त्यांचे प्रशिक्षण आदी क्षेत्रात काम केले जाते. 

2018 -19 पासून ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजना देशातील सर्व 640 जिल्ह्यांमध्ये राबवली जात आहे.

बाल लिंग गुणोत्तर हे रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्या मार्फत दशकातून एकदा मोजले जाते.ताज्या माहितीनुसार ही योजना सुरु असलेल्या 161 जिल्ह्यांपैकी 104 जिल्ह्यांमध्ये गुणोत्तरात सुधार आढळून आला आहे. 146 जिल्ह्यांमध्ये रुग्णालयात होणाऱ्या प्रसुतींमध्ये वाढ झाली आहे.


अरुणाचल प्रदेशात भारतातला सर्वात दीर्घ एकपदरी स्टील केबल ब्रिज उभारले

अरुणाचल प्रदेशात भारतामधील 300 मीटर लांबीचा सर्वात दीर्घ असा एकपदरी स्टील केबल सस्पेंशन ब्रिज (पूल) उभारण्यात आले आहे.

हा पूल चीनजवळ सियांग जिल्ह्यात सियांग नदीवर उभारण्यात आला आहे. या पूलाला ‘ब्योरुंग पूल’ म्हणून देखील ओळखले जाते.

हा पूल ईशान्य प्रदेश विकास मंत्रालयाच्या एका योजनेच्या अंतर्गत 4,843 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आला आहे. या पुलामुळे यिंगकिओनग ते तुतींग या शहरांमधील रस्त्यावाटे आधीचे 192 किलोमीटरचे अंतर जवळ जवळ 40 किलोमीटरने कमी होते.


​​अशोक चावला यांनी TERIच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) याच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर दि. 13 जानेवारी 2019 रोजी अशोक चावला यांनी दिल्लीच्या ‘ऊर्जा व स्त्रोत संस्था’ (TERI) या ना-नफा संस्थेच्या अध्यक्ष पदाचा देखील राजीनामा दिला आहे.

केंद्र सरकारकडून CBIला ‘एयरसेल-मॅक्सिस’ प्रकरणामध्ये चावला यांच्याविरोधात खटला दाखल करण्याला परवानगी मिळालेली आहे. आर्थिक घोटाळा आणि सुरक्षेचे उल्लंघन केल्याप्रकरणी चावला अडकले आहेत.


​​भारताच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर 7.3% असेल: भारत बॅरोमीटर अहवाल 2019

PwC संस्थेच्या सहकार्याने भारतीय वाणिज्य व उद्योग महासंघ (Federation of Indian Chambers of Commerce and Industry -FICCI) कडून ‘भारत बॅरोमीटर अहवाल 2019’ प्रसिद्ध करण्यात आला आहे.

भारताच्या उत्पादन निर्मिती क्षेत्रामध्ये केल्या गेलेल्या सर्वेक्षणात अर्थव्यवस्थेच्या संदर्भात उत्पादकांचा दृष्टीकोन, पुढील 12 महिन्यांसाठी व्यवसायाचे वातावरण आणि व्यापारामधील स्पर्धात्मकता निर्धारित करणारे घटक समाविष्ट करण्यात आले आहेत.

Post a Comment

0 Comments