चालू घडामोडी 12 जानेवारी 2019


पंतप्रधानांच्या हस्ते ‘गंगाजल’ प्रकल्पाचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. 9 जानेवारी 2019 रोजी उत्तरप्रदेशाच्या आग्रा शहरात ‘गंगाजल’ प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे.

‘गंगाजल’ प्रकल्पासाठी 2880 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. या प्रकल्पामार्फत आग्रा शहराला चांगल्याप्रकारे आणि अधिक आश्वासक पाणी पुरवठा करण्यासाठी मदत होणार.

गंगाजल प्रकल्प : या प्रकल्पामार्फत गंगा नदीचे पाणी पलरा हेडवर्क्सपासून 150 क्यूसेक पाणी आग्रा शहराकडे आणले जाणार, जे आग्रा आणि मथुरा शहरांना दिले जाणार. त्यासाठी पालडा फाल बुलंदशहर ते कैलाश मंदिर (आग्रा) पर्यंत 130 किलोमीटरची पाइपलाइन तयार केली गेली.


मेघालयाच्या पहिल्या स्वदेश दर्शन प्रकल्पाचे उद्घाटन

मेघालयमध्ये भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या स्वदेश दर्शन योजनेच्या अंतर्गत पूर्ण करण्यात आलेल्या राज्यामधील पहिल्या प्रकल्पाचे दि. 9 जानेवारी 2019 रोजी उद्घाटन करण्यात आले आहे.

"ईशान्य परिक्रमाचा विकास: उमियाम (सरोवराचे दृश्य) - यू लुम सोहपेटबिनेंग - माउदिआंगडियांग - ऑर्चिड लेक रिसॉर्ट" प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. हा प्रकल्प 99.13 कोटी रुपये खर्चून पूर्ण करण्यात आला आहे.

योजनेविषयी :

भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने देशात पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रसाद (Pilgrimage Rejuvenation and Spiritual Augmentation Drive -PRASAD) आणि स्वदेश दर्शन योजना सन 2014-15 मध्ये सुरू केली. देशात विषय आधारित पर्यटन परिक्रमा प्रकल्प विकसित करण्याच्या उद्देशाने ‘स्वदेश दर्शन’ योजना सुरू केली गेली आहे. या योजनेच्या अंतर्गत विकासासाठी 13 पर्यटन परिक्रमांची ओळख पटविण्यात आलेली आहे.

ते आहेत - बुद्धीष्ट परिक्रमा, ईशान्य भारत परिक्रमा, सागरकिनारा परिक्रमा, हिमालय परिक्रमा, कृष्ण परिक्रमा, वाळवंट परिक्रमा, पर्यावरणीय परिक्रमा, वन्यजीव परिक्रमा, आदिवासी परिक्रमा, ग्रामीण परिक्रमा, धार्मिक परिक्रमा, रामायण परिक्रमा आणि वारसा परिक्रमा.

आतापर्यंत मंत्रालयाने 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 73 प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.


इक्वाइन इन्फेक्षीयस अॅनिमीया या पशुरोगासाठी रिकॉम्बिनंट ‘ELISA’ तपासणी किट सादर

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून ‘इक्वाइन इन्फेक्षीयस अॅनिमीया’ या रोगासाठी रिकॉम्बिनंट ‘ELISA (Enzyme-linked immune sorbent assay)’ तपासणी किट सादर करण्यात आली आहे.

ग्लॅंडर्स (घोडा, गाढव यासारखा पशूंना होणारा आजार) आणि इक्वाइन संक्रामक अॅनिमीया (घोड्याला होणारा आजार) या दोन रोगांसाठी ही किट आहे.

नॅशनल रिसर्च सेंटर ऑन इक्वाइन्स (NRCE) ने ही तपासणी किट तयार केली आहे. भारतात लक्षणीय प्रमाणात आढळून येणार्या या रोगांचे नियंत्रण आणि उन्मूलन करण्यासाठी विशेष निदान आवश्यक आहे.


जागतिक बँक (WB)

ही भांडवल पुरविण्यासाठी विकसनशील देशांना कर्ज देणारी एक आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहे. जागतिक बँक हा संयुक्त राष्ट्रसंघ प्रणालीचा एक भाग आहे.

अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन, डी.सी. येथे जागतिक बँकेचे मुख्यालय आहे.

यामध्ये आंतरराष्ट्रीय पुनर्रचना आणि विकास बँक (International Bank for Reconstruction and Development- IBRD) आणि आंतरराष्ट्रीय विकास महामंडळ (International Development Association -IDA), अश्या दोन संस्थांचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि तीन इतर संस्थांसह जागतिक बँकेची स्थापना 1944 सालच्या ब्रेटोन वूड्स परिषदेत करण्यात आली.