loading...

चालू घडामोडी 10 जानेवारी 2019124 वी घटनादुरुस्ती विधेयक-2019’ लोकसभेत संमत झाली

लोकसभेत ‘124 वी घटनादुरुस्ती विधेयक-2019’ याला मंजुरी देण्यात आली आहे. सवर्णांना आरक्षण देण्यासाठी भारतीय घटनेच्या अनुच्छेद 15 आणि 16 मध्ये बदल केला जाणार आहे.

खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या मागासांना शिक्षण व सरकारी नोकर्‍यांमध्ये 10% आरक्षण देण्याचा मार्ग सुकर झाला आहे. यामुळे सर्व धर्मातील आर्थिक मागासांना लाभ मिळणार.

प्रस्तावित सवर्ण आरक्षणाचे निकष पुढीलप्रमाणे आहेत - वार्षिक उत्पन्न 8 लक्ष रुपयांपेक्षा कमी असावे; 5 हेक्‍टरपेक्षा कमी शेती असावी; स्वमालकीचे घर असल्यास 1000 चौरस फुटांपेक्षा कमी क्षेत्रफळाचे असावे; महापालिका क्षेत्राच्या बाहेर भूखंड असल्यास 209 यार्डापेक्षा कमी क्षेत्रफळाचा असावा.

घटनेतील तरतुदींनुसार सर्वोच्च न्यायालयाने जातीनिहाय आरक्षणासाठी 50 टक्क्यांची कमाल मर्यादा घालून दिली आहे. आरक्षणात संतुलन राखण्यासाठी तो आदेश होता. मात्र, खुल्या प्रवर्गाला 10% आरक्षण निव्वळ आर्थिक निकषावर दिले जाणार आहे. या विधेयकामुळे सर्वोच्च न्यायालयातही हे आरक्षण टिकेल, असा विश्‍वास व्यक्त करण्यात आला आहे.


नासाच्या ‘टेस’ मोहिमेत नव्या ग्रहाचा शोध

नासाने अलिकडेच सौरमालेबाहेर एक ग्रह शोधूनकाढला असून तो ५३ प्रकाशवर्षे दूर असलेल्या बटू ताऱ्याभोवती फिरत आहे. ट्रान्सिटिंग एक्सोप्लॅनेट सव्‌र्हे सॅटेलाइट म्हणजे टेस अंतर्गत एप्रिलपासून शोधण्यात आलेला हातिसरा ग्रह आहे. या ग्रहाचे नाव एचडी २१७४९ बी असे आहे. तो बटू ताऱ्याभोवती फिरत असून हा तारा ५३ प्रकाशवर्षे दूर आहे.

ग्रहाचा कक्षा काळ हा आतापर्यंत शोधलेल्या तीन ग्रहात सर्वाधिक आहे. एचडी २१७४९ बी ग्रह हा ताऱ्याभोवती ३६ दिवसांत प्रदक्षिणापूर्ण करतो. आधीच्या पाय मेन्सा बी या महापृथ्वी मानल्या जाणाऱ्या ग्रहाचा प्रदक्षिणा काळ ६.३ दिवस असून एलएचएस ३८४४ बी या खडकाळ ग्रहाचा प्रदक्षिणा काळ ११ तासांचा आहे.

सर्व तीन ग्रह टेस निरीक्षणांच्या पहिल्या तीन महिन्यांत शोधले आङेत. नव्या ग्रहावरचे तपमान ३०० अंश फॅरनहीट असण्याची शक्यता असून तो तुलनेने थंड आहे. सूर्याइतक्या तप्तताऱ्याच्या जवळ असूनही त्याचे हे तपमान तुलनेने कमी मानले जाते.


अखिल भारतीय स्तरावरील भव्य पशू-पक्षी प्रदर्शन २ फेब्रुवारीला जालन्यात

पशूपालनाविषयी जनजागृती व्हावी आणि पशूपालकांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी जालना येथे 2 ते 4 फेब्रुवारीला अखिल भारतीय स्तरावरील भव्य पशू-पक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.


RBIकडून विविध कार्डच्या व्यवहारांमध्ये टोकन प्रणालीबाबत नवी मार्गदर्शके जाहीर

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) कडून डेबिट आणि क्रेडिट कार्डसारख्या विविध कार्डद्वारे होणार्या व्यवहारांना अधिक सुरक्षित करण्यासाठी त्यामधील टोकन प्रणालीच्या संदर्भात (tokenisation) मार्गदर्शके प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

टोकनायझेशन म्हणजे काय?

देयके प्रणालीच्या सुरक्षिततेत सुधारणा करण्याच्या उद्देशाने असणारी ‘टोकनायझेशन’ प्रक्रिया म्हणजे कार्डचा मूळ तपशील वापरण्याच्या जागी प्रदान करण्यात येणारा एक विशिष्ट पर्यायी कोड, ज्याला आपण 'टोकन' म्हणतो.

या सुविधेमुळे कार्डचा मूळ तपशील गुप्त राहतो आणि त्याऐवजी दिले जाणारे टोकन ‘विक्री केंद्र (PoS), क्विक रिस्पोन्स (QR) कोड मार्फत देयके अश्या संपर्क-विरहित पद्धतीत कार्डमार्फत व्यवहार करण्यासाठी वापरले जाते.


नवी दिल्लीत ‘रायसिना संवाद’ची बैठक पार पडली


नॉर्वेचे पंतप्रधान एर्ना सोलबर्ग हे भारताच्या दौर्यावर आले आहेत. यानिमित्त  दि. 8 जानेवारी 2019 रोजी नवी दिल्लीत ‘रायसिना संवाद’ची चौथी बैठक पार पडली.

"ए वर्ल्ड रिऑर्डर: न्यू जियोमेट्रीज; फ्लुईड पार्टनरशिप्स; अनसर्टेन आऊटकम्स" या संकल्पनेखाली हा कार्यक्रम आयोजित केला गेला.

या बैठकीचे आयोजन ऑब्जर्व्हर रिसर्च फाऊंडेशन या संस्थेच्या सहकार्याने भारत सरकारच्या परराष्ट्र कल्याण मंत्रालयाने केले. हा कार्यक्रम एक वार्षिक भौगोलिक आणि धोरणात्मक परिषद आहे. या कार्यक्रमात 93 देशांमधून 600 प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता.


संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये 6 नवीन सदस्य देश सहभागी

संयुक्‍त राष्‍ट्र सुरक्षा परिषदने इक्वेटोरियल गिनी, आयव्हरी कोस्ट, कुवेत, नेदरलँड्स, पेरू आणि पोलंड या सहा नविन देशांचा अस्थायी सदस्य देश म्हणून सहभागी होण्यास मान्यता दिली.

या सहा नविन देशांना 193 सदस्यांच्या आमसभेने दोन वर्षांसाठी निवड केली.

संयुक्‍त राष्‍ट्र सुरक्षा परिषदेमध्ये 15 सदस्य आहेत, ज्यापैकी पाच (चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका) स्थायी सदस्य देश आहेत.

Post a Comment

0 Comments