चालू घडामोडी 1 फेब्रुवारी 2019

MPSC Current Affiars 2019 in Marathiपीयूष गोयल यांना कार्नाट पारितोषिक मिळाला

पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या ‘क्लेनमन सेंटर फॉर एनर्जी पॉलिसी’ कडून हा पुरस्कार दिला गेला. ऊर्जा धोरणाविषयीची समजूत विस्तारीत करण्यात आणि क्रांती घडविणार्या व्यक्तींनी हा पुरस्कार दिला जातो.

पियुष गोयल यांनी आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) ला हा निधी दिला. माजी ऊर्जा मंत्री गोयल यांच्या नेतृत्वात देशातील उर्वरित आणि दुर्गम भागात जवळपास 18,000 गावांचे विद्युतीकरण केले गेले होते. त्यांनी ऊर्जा क्षेत्रात व्यापक सुधारणा केल्या आणि जगातील सर्वात मोठा एलईडी दिव्यांचा वितरण कार्यक्रम राबवला.


​​दिपीका पदुकोणची ‘मामि’च्या अध्यक्षपदी निवड

मुंबई अॅकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेज
मुंबई शहराची सांस्कृतिक ओळख म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई अॅकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेजच्या (मामि) अध्यक्षपदी अभिनेत्री दिपीका पदुकोणची निवड करण्यात आली आहे.

तर यापूर्वी अभिनेता आमिर खान यांची पत्नी किरण राव ही ‘मामि’ची अध्यक्ष होती. त्यानंतर आता दिपीका या पदाची जबाबदारी पार पाडणार आहे.

किरण राव सध्या तिच्या आगामी चित्रपटांमध्ये व्यस्त असल्यामुळे तिला अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला. किरणच्या राजीनाम्यामुळे काही दिवसांपूर्वी मुंबई अॅकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेजच्या सदस्य मंडळाची बैठक पार पडली.

तसेच या बैठकीमध्ये अध्यक्षपदासाठीच्या उमेदवारांसाठी वोटिंग करण्यात आली. यामध्ये दिपीका सर्वाधिक मत मिळवून विजयी झाली. दिपीकाची या पदी निवड झाल्यानंतर किरणने तिला शुभेच्छाही दिल्या आहेत.


‘अॅस्ट्रो टर्फ फुटबॉल पिच’: नागालँड राज्याचे पहिले फुटबॉल मैदान

नागालँड राज्याचे मुख्यमंत्री निफिओ रियो यांच्या हस्ते कोहिमा शहरात ‘अॅस्ट्रो टर्फ फुटबॉल पिच’ या नावाने राज्याच्या पहिल्या फुटबॉल मैदानाचे उद्घाटन करण्यात आले आहे.

महान फुटबॉलपटू डॉ. टी. आओ यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त कोहिमाच्या इंदिरा गांधी क्रिडामैदानाच्या परिसरात हे फुटबॉल मैदान तयार करण्यात आले.

2013-14 या वर्षी बांधकामाला सुरुवात करण्यात आलेल्या या प्रकल्पाला एकूण 498 लक्ष रुपयांचा खर्च आला आहे. या मैदानाचा आकार 105x66 मीटर एवढा आहे. राज्यात क्रिडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी या पायाभूत सुविधेची मदत होणार.


​​डॉ. हद्दाड आणि डाॅ. नॅबार्रो यांना २०१८ चा जागतिक अन्न पुरस्कार

अर्थतज्ज्ञ डॉ. लॉरेंन्स हद्दाड आणि भौतिकशास्त्रज्ञ डॉ. डेव्हिड नॅबार्रो यांचा ‘जागतिक अन्न पुरस्कार-२०१८’ ने गौरव

जगभरातील कुपोषित माता आणि बालकांना कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी आयुष्यभर कार्य

डॉ. हद्दाड आणि डाॅ. नॅबार्रो यांच्या नेतृत्वाखालील मोहिमेत २०१२ ते २०१७ या काळात जगभरातील अतिकुपोषित बालकांची संख्या एक कोटीने कमी

जागतिक अन्न पुरस्कार सुरुवात - प्रसिद्ध कृषितज्ज्ञ नॉर्मन बोरलॉग यांच्याद्वारे

जागतिक अन्न पुरस्कार 'अन्न आणि कृषी क्षेत्रातील नोबल पुरस्कार’ म्हणून ओळखला जातो.

पुरस्कार विजेत्यास अडीच लाख डॉलर रक्कम

आज दिनांक १ फेब्रुवारी रोजी डॉ कल्पना चावला यांचा स्मृति दिन असून १६ वर्षांपूर्वी त्यांच्या कोलंबिया या यानाला पृथ्वीवर परत येत असताना अपघात होऊन दुर्दैवी मृत्यु झाला.

राजस्थानातील बेरोजगारांना 1 मार्चपासून भत्ता मिळेल, अशी घोषणा मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली 

Post a Comment

0 Comments