loading...

चालू घडामोडी 1 डिसेंबर 2018

loading...


१ डिसेंबर :- जागतिक एड्स दिन

एड्स सारख्या महाभयंकर रोगाबद्दल आणि त्याच्या संक्रमणाबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी हा दिवस पाळला जातो.

ऑगस्ट १९८७ मध्ये जेम्स डब्लु. बन् आणि थॉमस नेटर यां दोघांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशच्या, जिनेवा येथिल जागतिक कार्यक्रमात यांचा संकल्पना मांडली. डॉ. मन् यांचा सहमती नंतर १ डिसेंबर १९८८ पासुन हा दिवस पाळण्यात येऊ लागला.

जागतिक एड्स दिन प्रथम जेम्स डब्लू बून व थॉमस नेटर यांनी जिनिव्हा स्वित्झर्लड मध्ये १९८८ मध्ये साजरा केला.


भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त - सुनील अरोरा :

1961 सालच्या प्राप्तीकर कायद्याचा आढावा घेण्यासाठी आणि नवा प्रत्यक्ष कर कायद्याचा मसूदा तयार करण्यासाठी असलेल्या भारताच्या कृती दलाचे प्रमुख - अखिलेश रंजन.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC)अध्यक्षपदी अरविंद सक्सेना यांची नियुक्ती.


अरविंद सक्सेना यांची UPSCचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती :

भारताचे राष्ट्रपती, रामनाथ कोविंद यांनी 28 नोव्हेंबर 2018 रोजी अरविंद सक्सेना यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (UPSC) नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्त केले.

त्यांच्या नियुक्तीचा कार्यकाळ कार्यालयात प्रवेश करण्याच्या तारखेपासून 7 ऑगस्ट, 2020 पर्यंत जेव्हा ते वयाचे 65 वर्ष पूर्ण करतील किंवा पुढील आदेशपर्यंत जे आधी असेल तो पर्यंत असेल.

जून 2018 मध्ये सरकारने सक्सेना यांना UPSCचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त केले होते. त्यांनी निवृत्त होत असलेल्या विनय मित्तल यांच्याकडून प्रभार आपल्या हातात घेतला.


सौभाग्य (प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना) :

भारत सरकारच्या केंद्रीय ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने सप्टेंबर 2017 मध्ये सौभाग्य (प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना)

या योजनेचा शुभारंभ केला. योजनेमधून देशातल्या सर्व भागांमध्ये प्रत्येक घराचे विद्युतीकरण करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

आतापर्यंत 2.1 कोटी घरांना वीज जोडणी दिली गेली आहे. दि. 31 मार्च 2019 पर्यंत सर्व घरांचे विद्युतीकरण करून 24x7 म्हणजेच पूर्णवेळ वीज उपलब्ध करून देण्याचे सुनिश्चित करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे.


भारत आणि ब्रिटन यांच्या नौदलांचा “कोंकण-18” नामक संयुक्त सराव :

सरावाविषयी दि. 28 नोव्हेंबर ते 06 डिसेंबर 2018 या कालावधीत चालवला जात आहे.

भारत आणि ब्रिटन यांच्या नौदलांचा “कोंकण” नावाने संयुक्त सरावाची मालिका सन 2004 मध्ये सुरू झाली. भारतीय नौदल आणि ब्रिटनचे रॉयल नेव्ही यांच्यात हा सराव चालतो.

यादरम्यान दोन्ही देशांमधील दीर्घकालीन धोरणात्मक सागरी संबंधांना अधिक बळकट करण्याच्या हेतूने प्रशिक्षण, अनुभवांच्या आदानप्रदानाच्या माध्यमातून आणि तांत्रिक सहकार्यामधून द्वैपक्षीय कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.


लंडनमध्ये नॉर्वेचा ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसन :

सलग चौथ्यांदा ‘जागतिक बुद्धिबळ’ स्पर्धेचा जगज्जेता ठरला आहे.

स्पर्धेत शेवटच्या सामन्यात अमेरिकेच्या फॅबिआनो कारुआनाचा पराभव करीत  कार्लसनने जेतेपद पटकावले. कार्लसनला साडेपाच लक्ष युरो व चषकासह गौरवले गेले.

जलद बुद्धिबळमध्ये वरचढ समजल्या जाणाऱ्या कार्लसनने ‘टाय-ब्रेकर’वर पूर्णपणे वर्चस्व गाजवले.


शरद पवार यांना महात्मा फुले समता पुरस्कार जाहीर :

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना यंदाचा महात्मा फुले समता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे महात्मा फुले यांच्या १२८व्या स्मृतीदिनानिमित्त बुधवारी २८ नोव्हेंबर रोजी 'समता दिन' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Post a Comment

0 Comments