loading...

चालू घडामोडी 29 नोव्हेंबर 2018

loading...
तितली चक्रिवादळ


जेष्ठ राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय - भवानी देवी :

भारताच्या भवानी देवीने ऑस्ट्रेलियाच्या कॅनबेरा येथे झालेल्या ‘जेष्ठ राष्ट्रकुल तलवारबाजी अजिंक्यपद 2018’ (Senior Commonwealth Fencing Championship) या स्पर्धेच्या सब्रे प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे.
अंतिम सामन्यात भवानी देवीने इंग्लंडच्या एमिली रुऑक्सचा पराभव केला.


ऑस्ट्रेलिया - - टी-20 महिला विश्वचषकचा विजेता :

अँटीगुआ आणि बारबूडा या कॅरेबियन राष्ट्राच्या अँटीगुआ बेटावर खेळल्या गेलेल्या ‘ICC टी-20 महिला विश्वचषक 2018’ या स्पर्धेचे विजेतेपद ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने पटकावले आहे.

ऑस्ट्रेलियाने चौथ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात इंग्लंडचा पराभव केला.

या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाच्या अलिसा हेली हिला मालिकेतला सर्वोकृष्ट खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. तर आपल्या पत्नीप्रमाणेच पती मिशेल स्टार्कनेही 2015 सालच्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या मालिकेतला सर्वोकृष्ट खेळाडूचा पुरस्कार पटकावला होता.
भारतीय शास्त्रीय संगीतकार उस्ताद इमरत खान यांचे निधन :

जगभरात सीतार आणि सूरबाहर यांचा प्रसार करणेसाठी आपले जीवन समर्पित करणारे प्रसिद्ध शास्त्रीय संगीतकार उस्ताद इमरत खान यांचे प्रदिर्घ आजाराने अमेरिका येथे वयाच्या 83 व्या वर्षी निधन झाले.

ते इटावा घराणे किंवा इमादखानी घराण्याशी संबंधित होते. त्यांनी 1970 च्या कान फिल्म फेस्टिवल मध्ये काम केले होते.


तितली चक्रीवादळ

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले एक चक्रीवादळ

ऑक्टोबर 2018 मध्ये ते ओडिशा व आंध्र प्रदेश या भारताच्या किनारपट्टीवर धडकले

आफ्रिका आणि आशियासाठी असलेल्या 'राईम्स' या पूर्व चेतावणी व्यवस्थेने या चक्रीवादळला 'सर्वांत दुर्मिळ चक्रीवादळ' ही संज्ञा दिली आहे.

भारतीय हवामान विभागाने यापूर्वी या वादळाला 'दुर्मिळातील दुर्मिळ' ही संज्ञा दिली.


भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान 5 सामंजस्य करार :

भारतीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 21 ते 24 नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियाचा दौरा केला.

तसेच ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्याशी परस्पर सामरिक संबंध वाढविण्याबाबत व्यापक चर्चा केली व परस्पर सहकार्य वाढविण्याबाबत ऑस्ट्रेलियाशी 5 करारही केले.

पाच सामंजस्य करार :
  • अशक्ततेसाठी झालेल्या करारांतर्गत दिव्यांगांसाठीच्या सेवांमध्ये सुधारणा करण्यात येणार.
    दोन्ही देशांमधील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी इन्व्हेस्ट इंडिया आणि ऑस्ट्रेड यांच्यात करार करण्यात आला.
  • रांचीतील सेंट्रल माइन प्लानिंग अँड डिझाइन इन्स्टिट्यूट आणि कॅनबेरातील कॉमनवेल्थ सायण्टिफिक अँड रीसर्च ऑर्गनायझेशन यांच्यात परस्पर सहकार्य वाढविण्यासाठी करार झाला.
  • कृषी क्षेत्रातील संशोधनात सहकार्यासाठीचा गुंटूर येथील आचार्य एन. जी. रंगा कृषी विद्यापीठ आणि पर्थ येथील वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ यांच्यात करार झाला.
  • दिल्लीतील इंद्रप्रस्थ माहिती तंत्रज्ञान संस्था आणि ब्रिस्बेनमधील क्वीन्सलॅण्ड तंत्रज्ञान विद्यापीठ यांच्यात संयुक्त पीएचडीबाबत करार करण्यात आला.


संजय कुमार सेठ मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे 24 वे मुख्य न्यायाधीश:

मध्य प्रदेशच्या राज्यपाल आनंदबेन पटेल यांनी त्यांना शपथ दिली. जून 2019 मध्ये ते निवृत्त होतील.त्यांनी हेमंत गुप्ता यांची जागा घेतली.

यापूर्वी ते मध्य प्रदेशचे अतिरिक्त महाअधिवक्ता होते

जबलपुर येथे या न्यायालयाचे मुख्य पीठ आहे.

1 नोव्हेंबर 1956 मध्ये या हे न्यायालय स्थापन झाले.


वन लाईनर चालू घडामोडी :

आदिवासी भाषांना लुप्त पावण्यापासून वाचविण्यासाठी ओडिशा राज्य सरकारने इतक्या आदिवासी भाषांचे शब्दकोष तयार केलेत - 21.

ब्रिटन आणि भारत या देशांच्या संशोधकांनी बकरीमध्ये आढळून येणार्या या आजारावर एक 'स्मार्ट' लस विकसित केली - गोट प्लेग.

हार्वर्ड विद्यापीठाच्या एका अभ्यासानुसार हे भू-अभियांत्रिकी तंत्र सूर्यप्रकाशाला रोखणारी रसायने फवारूण हवामानातील बदलांमुळे वाढत्या तापमानाला मर्यादित करण्यास मदत करू शकते - स्ट्रॅटोस्फेरिक एरोसोल इंजेक्शन (SAI).

भारतीय क्षेत्रात उत्तर हिंद महासागरात आढळून आलेली शार्कची नवीन प्रजाती - पिग्मी फॉल्स कॅटशार्क(वैज्ञानिक नाव ‘प्लॅनोनासूस इंडिकस’).

‘AIBA महिलांची विश्व मुष्टियुद्ध अजिंक्यपद 2018’ स्पर्धेत 48 किलो वजन गटातली सुवर्णपदक विजेता -एम.सी. मेरी कोम.

सहा सुवर्णपदके जिंकणार्या एकमेव महिला मुष्टियोद्धा - एम.सी. मेरी कोम.


‘FIG तालबद्ध (कलात्मक) जिम्नॅस्टिक विश्वचषक 2018’ स्पर्धेत व्हॉल्ट प्रकारात भारताची कांस्यपदक विजेता - दिपा कर्मकार.

‘FIG तालबद्ध (कलात्मक) जिम्नॅस्टिक विश्वचषक 2018’ स्पर्धेत व्हॉल्ट प्रकारात सुवर्णपदक विजेता -रेबेका अँड्राडे (ब्राझील).

जम्मू-काश्मीर राज्याचे वर्तमान राज्यपाल - सत्य पाल मलिक.

पृथ्वीच्या स्थितांबरातील (stratosphere) हा वायू सूर्यकिरणांतील अतिनील किरणांपासून बचाव करतो -ओझोन.

चीनचे राष्ट्रीय चलन - रेन्मिन्बी (CNY).

जम्मू-काश्मीर बँक लिमिटेड याचे स्थापना वर्ष - सन1938.

भारताचे केंद्रीय दक्षता आयोग (CVC) याचे स्थापना वर्ष - सन 1964.

आंतरराष्ट्रीय आर्मेचर मुष्टियुद्ध संघटना (AIBA) याचे स्थापना वर्ष – सन 1946.

आंतरराष्ट्रीय आर्मेचर मुष्टियुद्ध संघटना (AIBA) याचे मुख्यालय - लॉंसेन (स्वित्झर्लंड).

आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक महासंघ (FIG) याचे मुख्यालय - लॉंसेन (स्वित्झर्लंड)

आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक महासंघ (FIG) याचे स्थापना वर्ष - सन 1881.

Post a Comment

1 Comments