फौवादचे मिर्झा रौप्य - हिमा दास रौप्य : आशियाई क्रिडा स्पर्धा 2018

जकार्ता - इंडोनेशियामध्ये सुरू असलेल्या १८ व्या आशियाई स्पर्धेत आज रविवारी सकाळी घोडेस्वारीमध्ये भारताने दोन रौप्यपदक पटकाविले. त्याचबरोबर बॅडमिटंनमध्ये सायना नेहवाल आणि पी.व्ही. सिंधू यांनी भारतासाठी दोन पदके निश्चित केली आहेत. त्यानंतर आता अॅथलेटिक्समध्ये भारताला मोठे यश प्राप्त झाले आहे.

अॅथलेटिक्समध्ये महिलांच्या ४०० मी धावण्याच्या शर्यतीत हिमा दास हिने रौप्यपदक पटकाविले आहे. हे भारताचे आठवे रौप्यपदक ठरले. हिमा हिने ४०० मीटर धावण्याचे अंतर ५०.७९ सेंकद वेळ नोंदवत पूर्ण केले.

Asian Games 2018 

fouvad mirza
वैयक्तिक प्रकारात घोडेस्वार फौवादचे मिर्झा याने हे यश संपादन केले. महत्वाचे भारताला तब्बल ३६ वर्षांनंतर ‘इक्वेस्ट्रीयन’ या क्रीडाप्रकारात वैयक्तिक रौप्यपदक मिळाले. भारतीय घोडेस्वार फौवाद मिर्झा याने हे रौप्यपदक मिळवले. त्याने आणि त्याचा घोडा सिगनूर मेडिकोट याने २२.७० या वेळेत शर्यत पूर्ण केली. भारताला १९८२ साली नवी दिल्ली येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये वैयक्तिक पदक मिळाले होते. त्यानंतर ही कामगिरी प्रथमच करण्यात आली आहे. या स्पर्धेत जपानच्या ओइवा योशीआकी याला पहिला क्रमांक मिळाला. तो आणि त्याचा घोडा बार्ट एल ज्रा यांनी ही शर्यत २२.६० एवढ्या वेळेत पूर्ण केली.

याशिवाय, भारताने सांघिक प्रकारातही ‘इक्वेस्ट्रीयन जम्पिंग’मध्ये रौप्यपदक मिळवले. त्यामुळे भारताच्या खात्यात २ रौप्यपदकांची भर पडली.