loading...

तेजिंदरपाल सिंग टूर सुवर्णपदक : आशियाई क्रिडा स्पर्धा 2018

loading...
जकार्ता – तेजींदर पालसिंगने नव्या आशियाई विक्रमालादेखील गवसणी घातली. त्याने आपल्या पाचव्या फेकीत 20.75 मीटर दूर गोळा फेकून नवा आशियाई विक्रम साजरा केला आणि आपले सुवर्णपदकदेखील पक्के केले. या स्पर्धेतील भारताचे हे सातवे सुवर्णपदक होते. आशियाई क्रीडा स्पर्धेत गोळाफेकमध्ये भारताने सर्वात जास्त 9 सुवर्ण, 7 रौप्य आणि 7 कास्य पदके जिंकली आहेत. तेजींदरने पहिल्याच प्रयत्नात 19.96 मीटर दूर गोळा फेकून अव्वल क्रमांक पहिल्या फेरीत राखला. मग त्याने आपली आघाडी शेवटपर्यंत कायम राखली.

Asian Games 2018 Information in Marathi

 asian games 2018 latest image
आशियाई खेळांच्या स्पर्धेत शनिवारी भारताने एका सुवर्णपदकाची कमाई केली. सातव्या दिवसाच्या खेळात भारतीय गोळाफेकपटू तजिंदर पाल सिंग तूर याने भारताला ही सुवर्णकमाई करून दिली. त्याने २०.७५ मीटरची विक्रमी फेक केली. या स्पर्धेच्या इतिहासतील ही विक्रमी फेक ठरली. तजिंदर पाल याने सर्वप्रथम १९.९६ मीटरची फेक केली होती. त्या नंतर सर्व प्रतिस्पर्ध्यांनी त्याची ही फेक मोडून काढल्याचा प्रयत्न केला. पण ते कोणालाही शक्य होऊ शकले नाही. चीनच्या खेळाडूने १९ मीटरचा टप्पा ओलांडला होता. पण त्या नंतरच्या प्रयत्नात तजिंदरने २० मीटरचा टप्पा ओलांडत थेट २०. मीटरची विक्रमी फेक केली. त्याची ही फेकदेखील कोणीही मोडू शकले नाही.

पंतप्रधान मोदी यांनी त्याचे कौतुक केले आणि त्याला शुभेच्छा दिल्या. ‘ऐतिहासिक सुवर्ण पदक आणि नव्या विक्रमासाठी तुला शुभेच्छा!’, असा संदेशही त्यांनी आपल्या ट्विटमधून त्याला दिला. तसेच, नवा विक्रम केल्याबद्दल भारताला तुझा गर्व आहे, असेही त्यांनी नमूद केले.

भारताच्या तेजींदरपाल सिंग तूरने आशियाई स्पर्धेतील गोळाफेकीत भारताला सुवर्णपदक पटकावून दिले. त्याने पाचव्या प्रयत्नांत 20.75 मीटर गोळाफेक करून भारताला सुवर्णपदक जिंकून दिले. त्याने या कामगिरीसह आशियाई विक्रमही नावावर केला. आशियाई स्पर्धेत 1951 ते आत्तापर्यंत भारताला सर्वाधिक 9 सुवर्ण, 3 रौप्य आणि 7 कांस्यपदक गोळाफेकीत मिळालेली आहेत. ती परंपरा तेजींदरपालने कायम राखली.