loading...

चालू घडामोडी १ जुलै २०१८

loading...

राज्याच्या पोलीस महासंचालकपदी दत्ता पडसलगीकर :

महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर सेवाज्येष्ठतेनुसार जून अखेरीस निवृत्त होत असून, त्यानंतर या पदावर दत्ता पडसलगीकर यांची नियुक्ती होणार आहे.
दत्ता पडसलगीकर यांच्याकडे सध्या मुंबईचे आयुक्तपद आहे. ते महासंचालक झाल्यावर मुंबईच्या आयुक्तपदी संजय बर्वे यांना संधी मिळणार आहे.

सेवाज्येष्ठतेनुसार पडसलगीकरदेखील ऑगस्टअखेरीस निवृत्त होतील. मात्र त्यांची 36 वर्षांची निष्कलंक सेवा लक्षात घेऊन, त्यांना 6 महिन्यांची मुदतवाढ दिली जाईल. त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत ते महासंचालकपदी राहतील.
भारत आणि क्युबामध्ये व्दिपक्षीय करार :
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या दौऱ्यादरम्यान भारत आणि क्युबामध्ये जैवतंत्रज्ञान, अपारंपरिक ऊर्जा, पारंपरिक औषधे आदी क्षेत्रात व्दिपक्षीय करार झाले आहेत.

तीन दिवसांच्या परदेश दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपती कोविंद यांनी ग्रीस आणि सुरिनाम या देशांचा दौरा संपवून क्युबात दाखल होत क्युबाचे राष्ट्रपती मिगुएल डियाज-कैनेल यांच्याशी व्दिपक्षीय चर्चा केली.

उभय नेत्यांनी व्दिपक्षीय संबध मजबूत करण्यासाठी सहमती व्यक्त केली. कोविंद यांनी फिडेल क्रॉस्ट्रो आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला श्रद्धांजली अर्पण केली.

चर्चेदरम्यान क्युबाने भारताच्या सुरक्षा परिषदेतील कायमस्वरूपी सदस्यत्वाच्या मागणीला पाठिंबा दिला. कोविंद यांनी हवाना विद्यापीठात 'भारत आणि जागतिक दक्षिण' या विषयावर व्याख्यान दिले. आपल्या व्याख्यानात त्यांनी विकसनशील देशांसाठी उभय देशांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज व्यक्त केली.

'रियुनाइट' हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी मोबाईल अॅप :
• हरवलेल्या आणि सोडून दिलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी साहाय्यकारी ठरणाऱ्या “रियुनाइट” या नव्या मोबाइल ॲप्लिकेशनचा शुभारंभ करण्यात आला आहे. याचे उद्घाटन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले.

• हे ॲप कैलाश सत्यार्थी यांच्या ‘बचपन बचाव आंदोलन’ या सामाजिक संस्थेनी कॅपजेमिनी कंपनीच्या मदतीने विकसित केले आहे. बेपत्ता मुलांची छायाचित्रे, नाव-पत्ता यासह संपूर्ण माहिती, पोलीस ठाण्यातली नोंद या ॲपवर पालक आणि नागरिक देऊ शकतात.

22 हजार ग्रामीण बाजारपेठांना E-NAM ला जोडण्याचा सरकारचा विचार :
केंद्राने घोषित केले आहे की 22,000 ग्रामीण बाजारांना 2020 पर्यंत इलेक्ट्रॉनिक राष्ट्रीय कृषी बाजार ( E - NAM ) शी जोडण्यात येणार आहे ज्यायोगे शेतकर्यांच्या उत्पन्नाच्या दुप्पट होण्याच्या मार्गावर चालतील.

उद्देश : ग्रामीण बाजारांना ग्रामीण कृषी बाजारपेठेत अपग्रेड केले जाईल आणि ई-एनएएम शेतक-यांना थेट संभाव्य खरेदीदारांना विकण्यास सक्षम बनविणे.

NAM ही कृषी उत्पादनांसाठी इलेक्ट्रॉनिक युनिफाइड राष्ट्रीय बाजारपेठ आहे.

फोर्ट प्रेसिंक्ट, मरिन ड्राईव्ह प्रेसिंक्ट म्हणजे काय?
प्रेसिंक्ट या शब्दाचा अर्थ होतो परिसर, मुंबईतील ज्या इमारतींना जागतिक वारसा स्थान देण्यात आले आहे त्या वास्तूंची दोन प्रकारात विभागणी होते. एक म्हणजे व्हिक्टोरियन स्थापत्य शैलीच्या इमारती ज्या मुख्यत्त्वे करून मुंबईतील फोर्ट भागात आहेत. तिथे सध्या सरकारी कार्यालये किंवा विद्यापीठ आहे. तर मरिन ड्राइव्ह परिसरातल्या इमारतींचा समावेश हा आर्ट डेको इमारतींमध्ये होतो. या इमारती रहिवासी इमारतींच्या प्रकारांमध्ये येतात. या इमारतींची शैली ठरलेली आहे जी मुंबईतील सध्याच्या बांधकामांपेक्षा निश्चितच वेगळी आहे. त्याचमुळे त्याचा समावेश आर्ट डेको इमारतींमध्ये होतो.

रॉ चा अधिकारी होणार मुंबईचा पोलीस आयुक्त ?
मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी सुबोध जयस्वाल यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. सध्या ते भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉ मध्ये कार्यरत आहेत.

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी सुबोध जयस्वाल यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. सध्या ते भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉ मध्ये कार्यरत आहेत. दत्ता पडसलगीकर सध्या मुंबईचे पोलीस आयुक्त आहेत. आज दुपारपर्यंत सुबोध जयस्वाल मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाचा कार्यभार हाती घेण्याची शक्यता आहे. वादग्रस्त अधिकारी म्हणून जयस्वाल यांची ओळख आहे.

तेलगी प्रकरणात त्यांच्या कामाबद्दल संशय व्यक्त करण्यात आला होता. सुप्रीम कोर्टाने आर एस शर्मा यांना क्लीन चिट दिली तेव्हा जयस्वाल यांच्यावर ताशेरे ओढले होते. आर एस शर्मा, प्रदीप सावंत यासह काही अधिकाऱ्यांना जयस्वाल यांनी अटक केली होती. डीजी संजीव दयाळ जयस्वाल यांच्यासाठी आग्रही असल्याची सूत्रांची माहिती आहे.

सुबोध कुमार जयस्वाल मुंबईत दाखल झाले असून ते पोलीस महासंचालक यांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्राचे पोलीस प्रमुख सतीश माथूर आज निवृत्त होत असून त्यांच्या जागी दत्ता पडसलगीकर यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

FATF च्या 'ग्रे लिस्ट'मध्ये पाकिस्तानचा समावेश करण्यात आला :
वित्तीय कृती कार्यदलाने (FATF) पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय सहकार्य आढावा समूहाद्वारे प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी त्याच्या 'ग्रे लिस्ट' मध्येपुढेही ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

अहवालानुसार, पाकिस्तानी सरकार वर्तमान कायद्यांना कठोर बनवून दहशतवाद्यांसाठी आर्थिक मदत रोखण्यासाठी कार्य करीत आहे आणि या नियमांची अंमलबजावणी होण्याची खात्री घेत आहे.

पॅरीस (फ्रान्स) स्थित वित्तीय कृती कार्यदल (Financial Action Task Force -FATF) ही अग्रगण्य आंतर-सरकारी वित्तीय तपास संस्था आहे. बेकायदेशीर कृत्यांना वित्तीय सहाय्य बंद करण्यासाठी कायदेशीर, नियामक आणि क्रियान्वयन उपायांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ही संस्था कार्य करते आणि जागतिक स्तरावर बॅंकांसाठी मानदंड निश्चित करते. FATF ची स्थापना सन 1989 मध्ये करण्यात आली.

दारिद्र्यात लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये भारत अग्रस्थानी नाही, जागतिक बॅंक :
जागतिक बँकेच्या ब्रूकिंग्स इन्स्टिट्यूटच्या ‘द स्टार्ट ऑफ ए न्यू पॉव्हर्टी नॅरेटीव्ह’ या ताज्या अहवालानुसार, जागतिक दारिद्र्य संदर्भातल्या क्रमावरीत भारताच्या क्रमांकात घसरण होत आहे. 2016 साली 125 दशलक्ष दरिद्री (आर्थिकदृष्ट्या) लोकसंख्या मे 2018 पर्यंत अत्यंत दरिद्री लोकसंख्या केवळ 73 दशलक्ष एवढ्यावर आली आहे.

भारत आता दारिद्यात जगणार्‍या सर्वात जास्त लोकांचा देश नाही, तर नायजेरिया याबाबतीत भारताला मागे टाकून 87 दशलक्ष एवढ्या दरिद्री लोकसंख्येसह यादीत अग्रस्थानी आहे.

भारत जगातील सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे, परंतु जगातल्या सर्वात गरीब देशांपैकी एक आहे. 1.3 अब्जपेक्षा जास्त लोकसंख्या असलेला भारत दारिद्र्य निर्मूलनासाठी कठोर प्रयत्न करीत आहे.

दिनविशेष

काही महत्वाच्या घटना:
२००१ फेरारी संघाच्या मायकेल शूमाकरने जागतिक फॉर्मुला वन मालिकेतील फ्रेन्च ग्रां. प्री. शर्यत जिंकून फॉर्मुला वन मालिकेतील ५० वे विजेतेपद पटकावले.
१९९७ शतकातील सर्वोत्कृष्ट वेटलिफ्टर्सच्या यादीत भारताच्या कुंजरानी देवीचा समावेश करण्यात आला.
१९९१ सोविएत रशिया, अल्बानिया, बल्गेरिया, झेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, पोलंड, रुमानिया आणि पूर्व जर्मनी या कम्युनिस्ट राष्ट्रांत अस्तित्त्वात असलेला ’वॉर्सा करार’ संपुष्टात आला. परस्पर संरक्षणाचा हा करार ’नाटो करारा’ला प्रतिशह देण्यासाठी १४ मे १९५५ रोजी करण्यात आला होता.
१९६४ न. वि. गाडगीळ पुणे विद्यापीठाचे पाचवे कुलगुरू झाले.
१९६२ सोमालिया व घाना हे देश स्वतंत्र झाले.
१९६१ महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार पुणे विद्यापीठाचे चौथे कुलगुरू झाले.
१९६० रवांडा व बुरुंडी हे देश स्वतंत्र झाले.
१९५५ ’स्टेट बँक ऑफ इंडिया अ‍ॅक्ट १९५५’ अन्वये स्टेट बँक ऑफ इंडिया अस्तित्त्वात आली. याआधी ही बँक इंपिरिअल बँक या नावाने ओळखली जात होती.
१९४९ त्रावणकोर व कोचीन ही दोन संस्थाने एकत्र करुन ’थिरुकोची’ संस्थान निर्माण करण्यात आले. याचेच पुढे केरळ राज्य बनले.
१९४८ बाजारपेठेतील व्यापार्‍यांचे नेतृत्त्व करणार्‍या ’पूना मर्चंट्स चेंबर’ या संस्थेची स्थापना
१९४८ ’कायदेआझम’ मुहम्मद अली जीना यांच्या हस्ते ’स्टेट बँक ऑफ पाकिस्तान’ या पाकिस्तानच्या मध्यवर्ती बँकेचे उद्‍घाटन झाले.
१९४७ फिलिपाइन्सच्या वायूदलाची स्थापना झाली.
१९३४ मानवी शरीराचे सर्वप्रथम छायाचित्र घेण्यात अमेरिकन डॉक्टरांना यश
१९३३ नाट्यमन्वंतर संस्थेच्या ’आंधळ्यांची शाळा’ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
१९१९ कै. बाबूराव ठाकूर यांच्या ’तरुण भारत’ (बेळगाव) या वृत्तपत्राची सुरूवात झाली.
१९०९ क्रांतिकारक मदनलाल धिंग्राने भारतमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक कर्नल विल्यम कर्झन वायली यांची इंपिरिअल इन्स्टिट्युटच्या ’जहांगिर हाऊस’मधे इंडियन नॅशनल असोसिएशनच्या सभेच्या वेळी गोळ्या झाडून हत्या केली.
१८८१ कॅनडातुन अमेरिकेत जगातील पहिला आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल करण्यात आला.
१८३७ जन्म, मृत्यू व विवाह यांच्या सरकारी नोंदणीस इंग्लंडमधे सुरूवात झाली.
१६९३ संभाजीराजांच्या मृत्यूनंतर मोगलांकडे गेलेला सिंहगड नवजी बलकवडे यांनी पुन्हा स्वराज्यात आणला.
जन्म :
१९६६ उस्ताद राशिद खान – रामपूर-साहसवान घराण्याचे शास्त्रीय गायक
१९६१ कल्पना चावला – भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर (मृत्यू: १ फेब्रुवारी २००३)
१९४९ वेंकय्या नायडू – केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष
१९३८ पंडित हरिप्रसाद चौरसिया – बासरीवादक, पद्मविभूषण
१९१३ वसंतराव जाईक – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, रोजगार हमी योजनेचे जनक (मृत्यू: १८ ऑगस्ट १९७९)
१८८२ डॉ. बिधनचंद्र रॉय – भारतरत्‍न (१९६१), आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर, आधुनिक बंगालचे शिल्पकार, पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते, कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरु, ब्राम्हो समाजाचे सदस्य (मृत्यू: १ जुलै १९६२ - कलकत्ता, पश्चिम बंगाल)
१८८७ कविवर्य एकनाथ पांडुरंग रेंदाळकर (मृत्यू: ? ? १९२०)

मृत्यू :
१९९४ राजाभाऊ नातू – दिग्दर्शक, नेपथ्यकार, प्रकाशयोजक व नाट्य संघटक (जन्म: ? ? ????)
१९८९ प्राचार्य ग. ह. पाटील – कवी व शिक्षणतज्ञ, ’माझ्या मामाची रंगीत गाडी हो’, ’देवा तुझे किती, सुंदर आकाश’, ’डराव डराव, डराव डराव, का ओरडता उगाच राव’ अशी त्यांची अनेक बालगीते लोकप्रिय आहेत. (जन्म: ? ? ????)
१९६९ मुरलीधरबुवा निजामपूरकर – कीर्तनकार
१९६२ डॉ. बिधनचंद्र रॉय – भारतरत्‍न (१९६१), आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर, आधुनिक बंगालचे शिल्पकार, पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते, कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरु, ब्राम्हो समाजाचे सदस्य (जन्म: १ जुलै १८८२ - पाटणा, बिहार)
१९६२ पुरुषोत्तम दास टंडन – स्वातंत्र्यसेनानी, भारतरत्‍न (१९६१), राष्ट्रभाषा हिन्दीचे समर्थक, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष (जन्म: १ ऑगस्ट १८८२)
१९४१ सर सी. वाय. चिंतामणी – स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रागतिक पक्षाचे नेते व श्रेष्ठ वृत्तपत्रकार, पहिल्या गोलमेज परिषदेचे विशेष अतिथी, उत्तरप्रदेशचे शिक्षणमंत्री (जन्म: १० एप्रिल १८८० - विजयनगरम, आंध्र प्रदेश)
१९३८ गणेश श्रीकृष्ण तथा 'दादासाहेब’ खापर्डे – प्रख्यात कायदेपंडित, विद्वान आणि राजकीय नेते, लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी, ’वर्‍हाडचे नबाब’ (जन्म: २७ ऑगस्ट १८५४)
१८६० चार्ल्स गुडईयर – रबरावरील व्हल्कनायझेशन ही प्रक्रिया शोधणारे अमेरिकन संशोधक (जन्म: २९ डिसेंबर १८००)

चालू घडामोडींच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटर वर आणि जी प्लस फाॅलो करा...