loading...

चालू घडामोडी 9 जून 2018

loading...
✓एअर इंडियाच्या भारत-ब्रिटन संपर्काला 70 वर्षे पूर्ण :
1948 साली मुंबई ते लंडन या दोन शहरांना जोडणारे पहिले उड्डाण एअर इंडियाने केले होते. यावर्षी एअर इंडियाच्या भारत-ब्रिटन हवाई संपर्काला 70 वर्षे पूर्ण झालीत.

शासकीय एअर इंडियाने ब्रिटनमधील भारतीय प्रवाश्यांना त्यांच्या विमानाच्या प्रारंभिक दिवसांच्या आठवणी वाटून घेण्यासाठी आमंत्रित करीत आहे. ‘सुपर कॉन्स्टिलेशन’ या विमानाचे 42 प्रवाश्यांसह प्रथम उड्डाण मुंबई येथून 8 जून रोजी झाले आणि कैरो आणि जिनेवामार्गे प्रवास करत 10 जून 1948 रोजी लंडनमध्ये उतरले.
✓ऑपरेशन निस्तार: सोकोट्रा (येमेन)मध्ये संकटात अडकलेल्या भारतीय नागरिकांना सोडविण्याची मोहीम :
DG शिपिंग आणि इंडियन सेलिंग वेसल्स असोसिएशन यांच्याकडून मदतीची मागणी करणार्‍या संपर्कानंतर भारतीय नौदलाचे ‘INS सुनैना’ जहाज आदेनच्या खाडीमध्ये 'ऑपरेशन निस्तार' या मोहिमेसाठी तैनात करण्यात आले आहे.

24 मे 2018 रोजी अत्यंत तीव्र अश्या ‘मेकेनू’ चक्रीवादळानंतर येमेनच्या खाडीत सोकोट्रा येथे संकटात अडकलेल्या 38 भारतीय नागरिकांना सोडविण्यासाठी ही मोहीम चालवली जात आहे. सर्व 38 सुरक्षित असल्याचे नोंदवले गेले आहेत. त्यांना पोरबंदरला उतरवले जाईल.

✓आशियातील प्रथम 13 'ब्लू फ्लॅग' सागरकिनारे भारतात विकसित होणार :
पर्यावरण अनुकूल, स्वच्छ आणि पर्यटकांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची सुविधा असलेल्या 13 भारतीय किनारपट्ट्यांना लवकरच ‘ब्लू फ्लॅग’ प्रमाणन मिळणार आहे. भारताच्या ओडिशा, महाराष्ट्र आणि इतर तटीय राज्यांतील किनारपट्ट्या संपूर्ण आशियामध्ये ‘ब्लू फ्लॅग’ प्रमाणन मिळविणारे प्रथम ठरणार आहेत.

‘ब्ल्यू फ्लॅग’ प्रमाणन मानदंडांनुसार, सागरी किनारपट्टीच्या क्षेत्रांच्या व्यवस्थापनासाठी कार्यरत असलेल्या पर्यावरण मंत्रालयाच्या सोसायटी फॉर इंटिग्रेटेड कोस्टल मॅनेजमेंट (SCOM) या संस्थेनी भारतीय किनारे विकसित केले आहेत.

1985 साली कोपनहेगन येथील फाऊंडेशन फॉर एन्व्हायरनमेंटल एज्युकेशन (FEE) ने ‘ब्लू फ्लॅग बीच’ मानदंडांची स्थापना केली. पर्यावरण अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी ‘ब्लू फ्लॅग प्रोग्राम’, ज्यास चार श्रेणींमध्ये 33 मानदंडांची आवश्यकता आहे, याची प्रथम पॅरिसपासून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर दोन वर्षांत युरोपमधील सर्वच सागरी किनारपट्ट्यांना ब्लू फ्लॅग प्रमाणन देण्यात आले. ही मोहीम युरोपच्या बाहेर 2001 साली दक्षिण आफ्रिकेत पसरली. डिसेंबर 2017 मध्ये ब्लू फ्लॅग मानदंडांनुसार भारतीय किनारे विकसित करण्यासाठी पर्यावरण मंत्रालयाने एक पायलट प्रकल्प सुरू केला.

ब्लू फ्लॅग मानदंडांनुसार समुद्रकिनार्‍यांना पर्यावरण आणि पर्यटन-अनुकूल बनविण्यासाठी, समुद्रकिनाऱ्यावर प्लॅस्टिकमुक्त असणे आणि कचरा व्यवस्थापन प्रणाली असणे आवश्यक आहे. पर्यटकांसाठी स्वच्छ पाणी उपलब्धता, पर्यटकांसाठी आंतरराष्ट्रीय मानदंडांच्या सोयी-सुविधा आणि समुद्रकिनाऱ्यावरील पर्यावरणीय प्रभावाचा अभ्यास करणं आवश्यक आहे.

✓कॅटालोनियातले स्पेन सरकारचे राज्य संपुष्टात आले; नव्या सरकारची निवड झाली :
स्पेनच्या केंद्रीय सरकारच्या माद्रिदमधून 7 महिन्यांपासून थेट अधिपत्त्याखाली असलेल्या कॅटालोनियाच्या प्रादेशिक सरकारने 3 जून 2018 रोजी क्विम टोरा यांच्या नेतृत्वाखाली नवे केंद्रीय मंत्रिमंडळ म्हणून शपथ घेत स्पेन सरकारचे राज्य संपुष्टात आणले आहे आणि हा प्रदेश आपल्या ताब्यात घेतला.

स्पेनपासून कॅटालोनिया प्रदेशाला स्वतंत्र करण्याच्या समर्थनार्थ 27 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान झाले होते. कॅटालोनियाच्या प्रादेशिक सरकारने आपल्या स्वातंत्र्याची घोषणा केली होती. मात्र या वादग्रस्त निर्णयाला स्पेनच्या सरकारचा विरोध असून आंतरराष्ट्रीय समुदायांकडून याला अजून मान्यता मिळालेली नाही.

कॅटालोनिया हा स्पेनच्या 17 स्वायत्त समुदायांपैकी एक आहे. स्वायत्त समुदाय म्हणजे स्पेनचा सर्वाधिक उच्च-स्तरीय प्रशासकीय विभाग असतो. कॅटालोनिया हा स्पेनच्या उत्तर-पूर्व दिशेला आहे आणि उत्तरेकडे याची सीमा फ्रान्स आणि अण्डोरा देशाला मिळते. कॅटालोनियाची लोकसंख्या 75 लाख आहे आणि याची राजधानी बार्सिलोना शहर आहे.
✓रशियाच्या LNG ची पहिली खेप भारताकडे पोहचती झाली :
भारतात रशियाकडून प्रथमच द्रव नैसर्गिक वायूची (LNG) आयात करण्यात आली आहे. याची पहिली खेप 4 जून 2018 रोजी गुजरातच्या दहेज येथे पोहचती झाली. ही आयात दहेज येथील पेट्रोनेट LNG लिमिटेड इम्पोर्ट टर्मिनलवर उतरवली जात आहे.

गझप्रॉम या रशियाच्या पुरवठादाराशी GAIL चा 20 वर्षांचा करार झालेला आहे. याअंतर्गत वर्षाला 25 दशलक्ष टन LNG आयात केले जाईल. आज भारत जगातला चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा LNG खरेदीदार देश आहे.

✓आग्रामध्ये प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी ‘ताज घोषणापत्र’ अंगिकारले :
भारतीय सरकारने आग्रामध्ये प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी ‘ताज घोषणापत्र’ अंगिकारले आहे.

सरकारने ऐतिहासिक स्मारकाच्या सुमारे 500 मीटर परिसराच्या आत डिस्पोजेबल किंवा एकदाच वापरले जाणारे प्लास्टिक समाप्त करण्याचे वचन दिले आहे. जाहीरनाम्यात प्लास्टिक प्रदूषणाचा सामना करण्यासाठी ताजमहालच्या जवळपासचा परिसर पुर्णपणे प्लास्टिक आणि सांडपाणी मुक्त करण्यास प्रयत्न केले जाणार आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांत आता ई-व्होटिंग :
राज्यातील ग्रामपंचायतींसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी 'ई-व्होटिंग'चा प्रकल्प राबवण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा मानस आहे.

या निवडणुकीत मतदानासाठी 'इलेक्ट्रॉनिक्स व्होटिंग मशिन'च्या (इव्हीएम-मतदान यंत्र) ऐवजी आधारकार्डशी जोडलेली संगणक प्रणाली वापरली जाणार आहे. ही संगणक प्रणाली मतदान केंद्रावरील लॉपटॉपला जोडलेली असेल. त्यावरच अंगठय़ाचा ठसा जुळवून मतदानाची प्रक्रिया राबवली जाणार आहे.

तसेच ही संगणक प्रणाली विकसित करण्यासाठी 4 कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक कंपनीकडे राज्यातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार किंवा अव्वल कारकून अशा चौघांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयोगाचे उपायुक्त अविनाश सणस यांनी प्रकल्पासाठी नियुक्त केलेले 12 अधिकारी तसेच कंपन्यांचे तंत्रज्ञ प्रतिनिधी यांच्याशी 2 जून रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत

'ई-व्होटिंग' या पथदर्शी प्रकल्पाची माहिती दिली. नगर जिल्ह्य़ातून या प्रकल्पासाठी समन्वय अधिकारी म्हणून अव्वल कारकून निता कदम-देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भारत जगातला पाचवा सर्वाधिक ई-कचरा निर्माता देश :
ASSOCHAM-NEC च्या ‘इलेक्ट्रिकल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग इन इंडिया’ या संयुक्त अभ्यासानुसार, भारत हा जगातला पाचवा सर्वाधिक ई-कचरा निर्माता देश आहे.
सर्वाधिक ई-कचरा निर्माण करणारे पाच देश (अनुक्रमे) –चीन (प्रथम),
संयुक्त राज्य अमेरिका, जपान आणि जर्मनी.
अन्य बाबी :
● ई-कचरा निर्मितीचे जागतिक प्रमाण 20% च्या वृद्धीदराने 2016 सालच्या 44.7 दशलक्ष टन वरून 2021 साली 52.2 दशलक्ष टनपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे.
●भारतामध्ये ई-कचरा निर्मितीत महाराष्ट्राचा वाटा 19.8% (सर्वाधिक) आहे, परंतु केवळ प्रति वर्ष 47,810 टन (TPA) कचरा पुनर्नवीनीकरण केला जातो. त्यानंतर तमिळनाडू (13% आणि 52,427 TPA चे पुनर्नवीनीकरण), उत्तर प्रदेश (10.1% आणि 86,130 TPA चे पुनर्नवीनीकरण), पश्चिम बंगाल (9.8%), दिल्ली (9.5%), कर्नाटक (8.9%), गुजरात (8.8%) आणि मध्यप्रदेश (7.6%) यांचा याबाबतीत क्रमांक लागतो.
●भारतामध्ये सुमारे 2 दशलक्ष TPA ई-कचरा तयार होतो, त्यापैकी पुनर्नवीनीकरण होण्याचे प्रमाण सुमारे 4,38,085 TPA आहे.

✓राफेल विमान खरेदी व्यवहार कॅगच्या रडारवर :
विरोधी पक्षांच्या आरोपानंतर आता राफेल लढाऊ विमान व्यवहाराची नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग) चौकशी केली जाणार आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कॅगबरोबरच जीएसटीएनवरही सरकारी लेखापालांची नजर असेल. भारतीय वायूदलासाठी राफेलच्या खरेदी व्यवहाराशी निगडीत एका सूत्राने सांगितले की, राफेल व्यवहाराची कॅगकडून तपासणी केली जाणार आहे. आमच्यासाठी हे नियमित लेखापरीक्षण असेल. राफेल व्यवहार हा मुख्य विरोधी पक्ष काँग्रेस आणि केंद्र सरकारमधील राजकीय वादाच्या केंद्रस्थानी राहिला आहे.

रालोआने संपुआ सरकारने केलेल्या व्यवहारापेक्षा जास्त पैसे मोजल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की, आम्हाला राफेल सौद्याचे लेखापरीक्षण करायचे आहे. कोणत्याही मोठ्या व्यवहाराचे लेखापरीक्षण करणे आवश्यक असते. परंतु, सध्या याची पूर्तता करण्याचा निश्चित कालावधी जाहीर करण्यात आलेला नाही.

रालोआ सरकारने फ्रान्सकडून 36 विमानांच्या खरेदी व्यवहारावर चर्चा केल्याचे वृत्त याचवर्षी 'इंडियन एक्स्प्रेस'ने अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने दिले होते.

✓ जॉर्डनचे पंतप्रधान हनी मुल्की यांचा राजीनामा :

जॉर्डनचे पंतप्रधान हनी मल्की यांनी आपला राजीनामा राजा अब्दुल्ला दोन यांच्याकडे सोपवला आहे. सरकारच्या कडकपणाच्या उपायांच्या विरोधात वाढत्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला.

जॉर्डन हे जॉर्डन नदीच्या पूर्वेकडील किनार्‍यावर वसलेले एक अरब राष्ट्र आहे. याची राजधानी अम्मान हे शहर आहे आणि जॉर्डन दिनार हे राष्ट्रीय चलन आहे.

✓ मलेशियामध्ये अॅटर्नी जनरल म्हणून एका भारतीय वंशाच्या वकीलाची नियुक्ती :
मलेशियामध्ये अॅटर्नी जनरल (महान्यायवादी) पदावर टॉमी थॉमस या भारतीय वंश असलेल्या वकीलाची नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नियुक्ती मोहम्मद अपंदी अली यांच्या जागी करण्यात आली आहे. 55 वर्षांमध्ये या पदावर प्रथमच अल्पसंख्याक समुदायातील एका व्यक्तीची नेमणूक करण्यात आली आहे.

मलेशिया हा आग्नेय आशियामधील एक देश आहे. मलेशियाची राजधानी क्वालालंपूर हे शहर आहे आणि ‎मलेशियन रिंगिट (MYR) हे राष्ट्रीय चलन आहे.

✓ RBI ने आर्थिक साक्षरता सप्ताहाचे आयोजन केले :
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) 4-8 जून 2018 या काळात जम्मू आणि काश्मीरमध्ये ‘ग्राहक संरक्षण’ या विषयाखाली "आर्थिक साक्षरता सप्ताह" पाळत आहे.

जम्मू आणि काश्मीर प्रदेशात डिजिटल बँकिंग अनुभव देण्यासाठी चांगल्या पद्धती अवलंबण्याच्या उद्देशाने हा सप्ताह पाळला जात आहे. यादरम्यान चार ग्राहक संरक्षण संदेशांवर लक्ष केंद्रित केले जात आहे, जसे की अनधिकृत इलेक्ट्रॉनिक बँकिंग व्यवहार, सुरक्षित डिजिटल बँकिंगसाठी चांगल्या पद्धती, ग्राहकांचे दायित्व.

काही महत्वाच्या घटना:
२००६ १८ वी फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धा जर्मनीच्या म्युनिक शहरात सुरू झाली.
२००१ भारताच्या लिअँडर पेस व महेश भूपतीने फ्रेन्च टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटाचे विजेतेपद मिळवले.
१९७५ ब्रिटनमधील लोकसभेच्या (House of Commons) कामकाजाचे दूरचित्रवाणीवरुन थेट प्रसारण सुरू झाले.
१९७४ सोविएत रशिया आणि पोर्तुगाल यांच्यात राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित झाले.
१९६४ भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून लाल बहादुर शास्त्री यांनी सूत्रे हाती घेतली.
१९४६ राजे भूमिबोल अतुल्यतेज थायलंडच्या राजसिंहासनावर विराजमान झाले. कोणत्याही देशावर सर्वात दीर्घकाळ राज्य करणारे हे राजे आहेत.
१९३१ रॉबर्ट गोडार्ड या शास्त्रज्ञाला अंतराळ प्रक्षेपणासाठी वापरल्या जाणार्‍या रॉकेटचे पेटंट मिळाले.
१९२३ बल्गेरियात लष्करी उठाव झाला.
१९०६ स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे लंडनला प्रयाण
१७०० दख्खन स्वारीवर असलेल्या औरंगजेबाने सज्जनगड जिंकला.
१६९६ छत्रपती राजाराम आणि महाराणी ताराबाई यांना तामिळनाडुतील जिंजी किल्ल्यावर पुत्ररत्‍न झाले. मुलाचे नाव ’शिवाजी’ असे ठेवले.
६८ रोमन सम्राट नीरो याने आत्महत्या केली.

जन्म :
१९८५ सोनम कपूर – अभिनेत्री
१९७७ अमिशा पटेल – अभिनेत्री
१९४९ किरण बेदी – सामाजिक कार्यकर्त्या व भारतातील पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी
१९१२ वसंत देसाई – संगीतकार (मृत्यू: २२ डिसेंबर १९७५)
१६७२ पीटर द ग्रेट (पहिला) – रशियाचा झार (मृत्यू: ८ फेब्रुवारी १७२५)

मृत्यू :
२०११ मकबूल फिदा हुसेन – चित्रकार व दिग्दर्शक (जन्म: १७ सप्टेंबर १९१५)
१९९५ प्रा. गोगिनेनी रंगा नायकुलू ऊर्फ ’एन. जी. रंगा’ – स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, शेतकरी चळवळीतील नेते आणि काँग्रेसचे पुढारी (जन्म: ७ नोव्हेंबर १९००)
१९९३ सत्येन बोस – बंगाली व हिन्दी चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक, चलती का नाम गाडी [१९५८], दोस्ती [१९६४], रात और दिन [१९६७], आंसू बन गये फूल [१९६९], जीवन मृत्यू [१९७०] हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. (जन्म: २२ जानेवारी १९१६)
१९८८ गणेश भास्कर अभ्यंकर ऊर्फ ’विवेक’ – अभिनेते (जन्म: ? ? ????)
१९४६ आनंद महिडोल तथा राम (सातवा) – थायलँडचा राजा (जन्म: २० सप्टेंबर १९२५)
१९०० आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांचा ब्रिटिशांच्या कैदेत संशयास्पदरित्या मृत्यू (जन्म: १५ नोव्हेंबर १८७५)
१८७० चार्ल्स डिकन्स – इंग्लिश कादंबरीकार व लेखक (जन्म: ७ फेब्रुवारी १८१२)
१८३४ पं. विल्यम केरी – अर्वाचीन बंगाली व मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारे धर्मप्रसारक (जन्म: १७ ऑगस्ट १७६१)
१७१६ बंदा सिंग बहादूर – शिख सेनापती (जन्म: १६ आक्टोबर १६७०)
६८ नीरो – रोमन सम्राट (जन्म: १५ डिसेंबर ३७)

Post a Comment

0 Comments