चालू घडामोडी 5 जून 2018

भारत रशियाकडून घेणार २०० कामोव हेलिकॉप्टर :
रशियाकडून २०० कामोव -२२६ टी सैन्य हेलिकॉप्टर खरेदी करण्याच्या व्यवहाराला सरकार आॅक्टोबरपर्यंत अंतिम स्वरुप देऊ शकते. हा व्यवहार रशियन हेलिकॉप्टर्स आणि भारताची सरकारी कंपनी हिंदुस्थान एयरोनॉटिक्स लिमिटेडचा एक संयुक्त उपक्रम असणार आहे.

रशियाकडून २०० कामोव -२२६ टी सैन्य हेलिकॉप्टर खरेदी करण्याच्या व्यवहाराला सरकार आॅक्टोबरपर्यंत अंतिम स्वरुप देऊ शकते. हा व्यवहार रशियन हेलिकॉप्टर्स आणि भारताची सरकारी कंपनी हिंदुस्थान एयरोनॉटिक्स लिमिटेडचा एक संयुक्त उपक्रम असणार आहे.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेशी संबंधित पायाभूत तयारी करण्यात आली आहे. सरकारकडून आगामी चार महिन्यात या योजनेवर शिक्कामोर्तब होऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिसेंबर २०१५ च्या मॉस्को दौऱ्यात या व्यवहाराबाबत दोन्ही देशात करारावर स्वाक्षºया झाल्या होत्या. आॅक्टोबर २०१६ मध्ये भारत आणि रशिया यांनी यासाठी दोन्ही कंपन्यांचा एक संयुक्त उपक्रम स्थापन करुन कराराला अंतिमत स्वरुप दिले. हा उपक्रम या हेलिकॉप्टरची निर्मिती करेल. हे हेलिकॉप्टर भारतात चीता आणि चेतक हेलिकॉप्टरची जागा घेतील.

मागील महिन्यात संरक्षण मंत्रालयाने या योजनेसाठी भारत- रशियाच्या संयुक्त उपक्रमासाठी रिक्वेस्ट फॉर प्रपोजल (आरएफपी) फॉर्म जारी केला होता. अधिकाºयांनी सांगितले की, संयुक्त उपक्रम या आरएफसीवर आॅगस्टपर्यंत विस्तृत उत्तर देऊ शकतो. त्यानंतर आॅक्टोबरमध्ये या व्यवहारावर शिक्कामोर्तब होऊ शकते. कमोव हेलिकॉप्टर हवाई दल आणि सैन्यासाठी दिले जाणार आहेत. वर्ष २०१५ मध्ये झालेल्या करारानुसार, ६० कमोव २२६ हेलिकॉप्टर रशियातून तयार येणार असून उर्वरित १४० हेलिकॉप्टरची निर्मिती भारतात होणार आहे. बंगळुरुजवळ तुमकूर येथे हेलिकॉप्टर निर्मितीसाठी जागाही निश्चित करण्यात आली आहे

पेद्रो संचेझ: स्पेनचे नवे पंतप्रधन :
पेद्रो संचेझ यांनी स्पेनचे पंतप्रधान पद सांभाळलेले आहे. ते पहिलेच पंतप्रधान आहेत, की ज्यांनी पदाची शपथ बायबल विना घेतली. 46 वर्षीय संचेझ हे स्पेनचे सातवे पंतप्रधान आहेत.मारियानो रखॉय यांच्या जागी संचेझ यांनी पंतप्रधान पदाचा भार सांभाळला आहे. संचेझ स्पेनच्या सोशलिस्ट पार्टीचे प्रमुख आहेत.स्पेन हा एक युरोपीय देश आणि युरोपीय संघाचा एक सदस्य राष्ट्र आहे. हा युरोपच्या आग्नेय दिशेला इबेरियन द्वीपकल्पावर आहे. या देशाची राजधानी माद्रिद हे शहर आहे आणि युरो हे राष्ट्रीय चलन आहे.

इस्राएल-पॅलेस्टाईन संघर्ष :
आंतरराष्ट्रीय शांततेच्या दृष्टीने नेहमीच चर्चित असलेल्या इस्राएल-पॅलेस्टाईन संघर्ष मुद्द्यावरून अलीकडच्या काळात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या.
:pushpin:2 जून 2018 रोजी अमेरिकाने संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेच्या (UNSC) एका ठरावाच्या विरोधात त्याचा व्हीटो कौल (निषेध/अमान्य करणे) दिला. कुवैतने तयार केलेला हा प्रस्ताव पॅलेस्टीन नागरिकांना संरक्षण देण्याची मागणी करतो आहे आणि हा एकतर्फी प्रस्ताव असल्याचे अमेरिकाचे म्हणणे आहे. मात्र रशिया, फ्रान्स ब्रिटन, पोलंड, नेदरलँड्स आणि इथिओपिया यांनी ठरावाला मान्य केले.

इस्राएल आणि पॅलेस्टाईन हे मध्य-पूर्व प्रांतातील स्वायत्त देश आहेत. गाझा पट्टीसह कब्जा केलेल्या पॅलेस्टिनी प्रदेशातील पॅलेस्टीन नागरिकांची सुरक्षितता आणि संरक्षणाची हमी देण्यासाठी उपाययोजना करण्याविषयी हा ठराव होता. यावेळी तिसर्यांदा हा ठराव सुधारित करण्यात आला होता.

संघर्षामागील इतिहास :
ब्रिटनच्या बॅल्फोर घोषणापत्राला या आठवड्यात 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. इस्राएलच्या निर्माणासाठी मदत करण्याकरितासंबंधी या घोषणापत्रात वक्तव्य होते. 2 नोव्हेंबर 1917 रोजी ब्रिटिश मंत्री आर्थर बॅल्फोर यांनी या पत्रात ही घोषणा केली होती, की त्यांचे सरकार मध्य-पूर्व प्रदेशात पॅलेस्टीनी भूमीवर यहूदी (Jewish) लोकांसाठी राष्ट्राची स्थापना करण्याच्या पक्षात आहे.
1922 सालापासून ते दुसरे महायुद्ध संपेपर्यंत ब्रिटनने पॅलेस्टाईन भूमीवर राज्य केले होते आणि ते ओट्टोमन तुर्की साम्राज्याखाली चालवले होते. 1947 साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने दिलेल्या समर्थनाने इस्रायलने 1948 साली ब्रिटीश अनिवार्य नियमांच्या अंमलाखाली आपले स्वातंत्र्य घोषित केले. मात्र हा प्रस्ताव पॅलेस्टाईन प्रतिनिधींनी नाकारला. त्यांचे म्हणणे असे होते की, पॅलेस्टाईनला एक अरब राष्ट्रात आणि एक यहुदी राष्ट्रात विभाजीत करण्यासाठी हा प्रस्ताव आहे.

इस्रायल आणि पॅलेस्टीनी भूमीवरून अजूनही चालू असलेल्या वादाची पार्श्वभूमी या घोषणेशी संबंधित आहे. आजही पॅलेस्टाईन भूमीचा प्रश्न सोडवला गेला नाही आहे. या विषयावर गांभीर्याने विचार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय एकात्मतेच्या आंतरराष्ट्रीय परंपरेमधून आंतरराष्ट्रीय समुदायांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि पॅलेस्टिनी लोकांना अद्याप त्यांचे न मिळालेले अधिकार मिळवून देण्याच्या दिशेने कृती करण्यास वचनबद्धता दर्शविण्यासाठी दरवर्षी 29 नोव्हेंबरला पॅलेस्टिनी लोकांबरोबर आंतरराष्ट्रीय एकता दिन या दिवशी जागृती निर्माण केली जाते.

वीज मंत्रालयाचे ‘प्राप्ती’ संकेतस्थळ व मोबाइल अॅप :
वीज मंत्रालयाकडून ‘प्राप्ती’ (पेमेंट रेक्टीफिकेशन अँड अनॅलिसिस इन पॉवर प्रोकुअरमेंट फॉर ब्रिंगींग ट्रान्सपीरंसी इन इनवॉइसींग ऑफ जनरेटर्स) या नावाने एक नवे संकेतस्थळ आधारित व्यासपीठ आणि मोबाइल अॅप सुरू करण्यात आले आहे.

वीज निर्माते आणि वीज प्रेषण कंपन्यांमध्ये होणार्‍या वीज खरेदी व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी ही नवी सुविधा सुरू करण्यात आली आहे.

बंगालच्या छौ मुखवट्याला GI टॅग मिळाले :
पश्चिम बंगालच्या पुरुलिया येथील प्रसिद्ध छौ (Chhau) मुखवट्याला भौगोलिक संकेतक (GI) टॅग प्राप्त झाले आहे. GI नोंदणी आणि बौद्धिक संपदा भारत यांच्याकडून याबाबत प्रमाणपत्र मिळालेले आहे.

कुशमंडीचा लाकडी मुखवटा, पट्टचित्र, बंगालचे डोक्रास आणि मधुरकाठी (चटईचा प्रकारचा) या मुखवटा आणि त्यांच्या सजावटीशी संबंधित कलाकृतींना GI टॅग दिले गेले आहे. आता या कलाकृतींच्या सादरीकरणाचे अधिकार पश्चिम बंगालकडे आले आहे.

आतापर्यंत 25 उत्पादनांना GI टॅग प्राप्त झाले आहेत, त्यापैकी नऊ उत्पादने केवळ पश्चिम बंगालमधील आहेत. वस्तूंचे भौगोलिक संकेतक (नोंद व संरक्षण) अधिनियम-1999 च्या आधारावर GI टॅग दिले जातात. GI टॅगच्या यादीमध्ये समाविष्ट होणारे प्रथम उत्पादन म्हणजे - दार्जिलिंग चहा.

✓भारत-सिंगापूर संबंध दृढ करण्यासाठी आठ करार झालेत :
आग्नेय आशियातल्या इंडोनेशिया, सिंगापूर आणि मलेशिया या तीन देशांचा दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत. इंडोनेशियाच्या दौर्यानंतर 31 मे ते 2 जून 2018 या काळात पंतप्रधान सिंगापूरमध्ये होते. सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग यांच्या निमंत्रणावरून त्यांनी भेट दिली.

या दरम्यान सिंगापूरमध्ये "इंडिया अँड सिंगापूर: स्टेपींग इंटू द फ्युचर – पार्टनरशीप फॉर एंटरप्राइज अँड इनोव्हेशन" या शीर्षकाखाली एक कार्यक्रम आयोजित केला गेला.

या भेटीत दोन्ही देशांमध्ये विविध विषयांमध्ये एकूण आठ करार/सामंजस्य करार/निवेदन यांच्यावर स्वाक्षर्या करण्यात आल्या आहेत. ते पुढीलप्रमाणे आहेत -

CECA च्या दुसर्या आढाव्याच्या निष्कर्षावर संयुक्त वक्तव्य

परिचारिका शिक्षण विषयात समान आवड असणार्या विषयांमध्ये करार :
परस्पर सहकार्य, नौदलांच्या जहाजांसाठी मालाची वाहतूक आणि सेवा यास पाठबळ तसेच पाणबुड्या आणि नौदलाचे विमान यांच्या भेटी याच्या संदर्भात भारत आणि सिंगापूर यांच्या नौदलांमध्ये अंमलबजावणी करार

भारताचे संगणक आपत्कालीन प्रतिसाद चमू (CERT-IN) आणि सिंगापूर कंप्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (SINGCERT) यांच्यातील सायबर सुरक्षा क्षेत्रात सहकार्यासंदर्भात सामंजस्य कराराचा विस्तार

अंमली पदार्थ, मानसिक अवस्थेवर परिणाम करणारे पदार्थ आणि संबंधित पदार्थ यांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी दोन्ही देशांच्या अंमली पदार्थ नियंत्रण विभागांमध्ये सहकार्यासंदर्भात सामंजस्य करार

कार्मिक व्यवस्थापन आणि लोक प्रशासन क्षेत्रात सहकार्यासंदर्भात सामंजस्य करार

भारत आणि सिंगापूर यांच्यात फायनॅनष्यल टेक्नॉलॉजी संदर्भात संयुक्त कार्यगटाच्या (JWG) स्थापनेबाबत सामंजस्य करार

नियोजन क्षेत्रात सहकार्यासाठी NITI आयोग आणि सिंगापूर को-ऑपरेशन एंटरप्राईझ (SCE) यांच्यात सामंजस्य करार

अन्य बाबी :
दोन्ही पंतप्रधानांनी SIMBEX या द्वैपक्षीय वार्षिक नौदल सरावाच्या 25 व्या आणि सुधारित आवृत्ती संदर्भात चर्चा केली.

हिंद महासागरात भारताची महत्त्वाची भुमिका ओळखून दोन्ही बाजूंनी क्षेत्रीय / ASEAN भागीदार देशांसोबत सागरी सराव आयोजित करण्यासह सामायिक सागरी क्षेत्रांमध्ये सतत आणि संस्थात्मक नौदल कार्यक्रमांसाठीच्या भारताच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.

आंतरराष्ट्रीय सुरक्षाविषयक समस्यांना सामोरे जाण्यासाठी आणि विशिष्ट उपाययोजना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या महत्त्वावर भर दिला गेला.

सिंगापूरमध्ये रुपे कार्डच्या शुभारंभासह NETS आणि नॅशनल पेमेंट्स कॉपोर्रेशन ऑफ इंडिया (NPCI) यांच्यातील भागीदारीची घोषणा करण्यात आली.

सिंगापूरमध्ये देयकांसाठी SGQR ला मान्यता देण्यासाठी भारत इंटरफेस फॉर मनी (BHIM) ला विस्तारित करण्यासाठी NETS आणि NPCI यांच्यातील कराराचे स्वागत केले गेले आणि सीमापार देयकांसाठी व्यवस्था तयार करण्यासाठी चर्चा केली गेली.

सांस्कृतिक मंत्रालयाची 'सेवा भोज योजना' :
भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने 'सेवा भोज योजना' ही नवीन योजना  सुरू केली आहे. योजनेसाठी वित्त वर्ष 2018-19 आणि 2019-20 साठी एकूण 325 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

धर्मदाय आस्थापनांमध्ये दिल्या जाणार्‍या अन्न/प्रसाद/लंगर यासाठी लागणार्‍या वस्तूंवर CGST आणि IGST लादला जाणार नाही आणि त्याला परत केले जाईल. हे अनुदान प्राप्त करण्यासाठी आस्थापने कमीतकमी पाच वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेली असावीत आणि महिन्याला कमीत कमी 5000 लोकांना मोफत अन्न पुरवित असावी.

IMD कडून उच्च पृथक्करण समूह अवलोकन अंदाज प्रणाली कार्यान्वित :
भारत सरकारच्या भू-शास्त्र मंत्रालयाअंतर्गत भारत हवामानशास्त्र विभाग (IMD) कडून 12 किलोमीटर ग्रिड स्केल एवढी उच्च पृथक्करण (High Resolution) क्षमता असलेल्या दोन समूह अवलोकन अंदाज प्रणाली (Ensemble Prediction System -EPS) कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

अत्याधुनिक वैश्विक EPS हवामानाचा 10-दिवसांचा संभाव्य अंदाज तयार करण्यास उपयोगात आणली जाणार आहे. सध्याच्या जगातील सर्वोत्तम हवामान अंदाज प्रणालींपैकी एक अशी नवी EPS IITM पुणे, NCMRWF नोएडा आणि IMD येथील शास्त्रज्ञांनी तयार केली आहे.

प्राप्तीकर विभागाची नवी ‘बेनामी व्यवहारांबाबत माहिती देणाऱ्याला बक्षीस देणारी योजना’ :
प्राप्तीकर विभागाने ‘बेनामी व्यवहारांबाबत माहिती देणाऱ्याला बक्षीस देणारी योजना-2018’ सुरू केली आहे.

अशा व्यवहारांबाबत प्राप्तीकर विभागाच्या तपास संचालनालयाच्या बेनामी प्रतिबंधक विभागाच्या संयुक्त किंवा अतिरिक्त आयुक्तांना विशिष्ट माहिती देणाऱ्या व्यक्तीला 1 कोटी रुपयांपर्यंत बक्षीस मिळू शकेल. परदेशातील व्यक्तीही या बक्षीसासाठी पात्र आहेत. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव उघड केले जाणार नाही.

बेनामी मालमत्ता व्यवहार अधिनियम-1988 अनुसार बेनामी व्यवहार आणि मालमत्तेबाबत तसेच अशा मालमत्तांवर उत्पन्न मिळवणाऱ्यांची माहिती देण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु तपस भट्टाचार्य यांचा राजीनामा कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरुंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तपस भट्टाचार्य हे कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु आहेत. तपस भट्टाचार्य यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आहे.

रत्नागिरी : कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरुंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तपस भट्टाचार्य हे कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु आहेत. तपस भट्टाचार्य यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आहे.

तपस भट्टाचार्य यांनी राजीनामा देण्यामागचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. तसेच त्यांच्या राजीनाम्याने कोकण कृषीविद्यापीठात एकच खळबळ उडाली आहे. सिंगापूरच्या बगिचातील ऑर्किडला मोदींचे नाव.


अमेरिकी संरक्षणमंत्र्यांशी मोदींची चर्चा :
नॅशनल ऑर्किड गार्डन ऑफ सिंगापूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली त्या वेळी येथील एका ऑर्किडला त्यांचे नाव देण्यात आले. डेन्ड्रोबियम नरेंद्र मोदी असे आर्किडचे नामकरण करण्यात आले आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी म्हटले आहे. हे ऑर्किड मोठे व उष्णकटिबंधीय भागातील असून त्यात ३८ से.मी. लांब फुलांचा समुच्चय असतो. त्यात १४ ते २० फुले सुंदर रचनेत साकारलेली असतात. त्यात काही पाकळय़ा वेगळय़ा पद्धतीने वळलेल्या असतात. यात वेगवेगळी रंगसंगती असते. पंतप्रधान मोदी यांनी नंतर सिंगापूरमधील श्री मरियाम्मन हिंदू मंदिरास भेट देऊन प्रार्थना केली. हे मंदिर १८२७ मध्ये नागपट्टणम व कडलोर येथून आलेल्या स्थलांतरितांसाठी बांधलेले असून ते मरियाम्मन देवतेचे आहे. संसर्गजन्य व इतर रोग बरी करणारी ही देवता मानली जाते. यातून सिंगापूर बरोबरचे सांस्कृतिक संबंध वृद्धिंगत होत आहेत असे सांगण्यात आले. चायनाटाऊन भागात मध्यवर्ती ठिकाणी हे मंदिर आहे.

अमेरिकी संरक्षणमंत्र्यांशी मोदींची चर्चा :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी अमेरिकेचे संरक्षणमंत्री जिम मॅटिस यांची सिंगापूर येथे भेट घेऊन चर्चा केली. पेंटॅगॉनने अलीकडेच पॅसिफिक कमांडचे नाव बदलून इंडो-पॅसिफिक कमांड असे केले आहे, त्या पाश्र्वभूमीवर सुरक्षा प्रश्नावंर चर्चा झाल्याचे समजते. मोदी हे तीन देशांच्या दौऱ्यातील अखेरच्या टप्प्यात सिंगापूर येथे आले असताना त्यांची मॅटिस यांच्या समवेत गोपनीय बैठक झाली. दोन्ही देशांच्या हितावर चर्चा झाली असून त्या वेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हल उपस्थित होते. ही बैठक तासभर चालली. शांग्रिला संवादाच्या पाश्र्वभूमीवर ही बैठक झाली असून त्यात आशियाचे सध्याच्या परिस्थितीत असलेले महत्त्व मोदी यांनी स्पष्ट केले. मोदी यांनी शांग्रिला संवाद कार्यक्रमात असे सांगितले, की भारत व चीन यांनी एकत्र काम करण्यातच जग व आशियाचेही भले आहे, पण तसे करताना एकमेकांच्या हिताच्या मुद्दय़ांवर संवेदनशीलता दाखवली पाहिजे. सागरी व हवाई मार्गाची आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार समान उपलब्धता असली पाहिजे. त्यासाठी सागरी संचार स्वातंत्र्य, अडथळे मुक्त व्यापार, वादांवर शांततामय तोडगा यांची

शांग्रिला संवादात मॅटिस यांनी सांगितले, की नियमांवर आधारित व्यवस्थेला महत्त्व असले पाहिजे.

मॅटिस यांनी मोदी यांच्या समवेत झालेल्या बैठकीत असे सांगितले, की दोन्ही देश इतर देशांच्या मदतीने इंडो पॅसिफिक भागात शांतता व सुरक्षा प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सागरी मार्ग सर्व देशांना खुले असावेत असे मतही त्यांनी व्यक्त केले. चीनबरोबर दक्षिण चीन सागरातील तणावाच्या वातावरणामुळे पेंटॅगॉनने पॅसिफिक कमांडचे नाव इंडो-पॅसिफिक कमांड असे केले आहे.

चांगी नौदल तळास मोदी यांची भेट :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगी नौदल तळाला भेट देऊन भारतीय व रॉयल सिंगापूर नौदलाचे खलाशी व अधिकारी यांच्याशी चर्चा केली. पंतप्रधानांच्या समवेत सिंगापूरचे वरिष्ठ मंत्री महंमद मलिकी ओस्मान होते. भारत व सिंगापूर यांच्यात सागरी क्षेत्रातही सहकार्य आहे, ते चांगी नौदल तळाला भेट दिली असता दिसून आले. गेली पंचवीस वर्षे नौदल दोन्ही देशांत अखंडपणे नौदल कवायती सुरू आहेत, पंतप्रधान मोदी यांनी आरएसएस फॉर्मिडेबल या सागरी युद्धनौकेला भेट दिली असे परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी म्हटले आहे. मोदी यांनी भारतीय नौदलाच्या आयएनएस सातपुडा या नौकेतील खलाशी व अधिकाऱ्यांशी संवाद साधला. हा संवाद साधता आला याचा आनंद वाटतो असे मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. आयएनएस सातपुडा सध्या चांगी नौदल तळावर तैनात आहे. भारत व सिंगापूर यांच्या नौदलांमध्ये सहकार्याचा करार झाला असून त्यात पाणबुडय़ा, नौदल विमाने, जहाजे या बाबतच्या सेवा एकमेकांना पुरवण्याचा समावेश आहे. इंडो-पॅसिफिक भागात आपली लष्करी दले ही मोठी भागीदारी उभी करत असून त्यातून मानवी मदत, आपत्कालीन मदत, शांतता व सुरक्षितता ही उद्दिष्टे साध्य होत आहेत असे मोदी यांनी म्हटले आहे.

काही महत्वाच्या घटना:
पर्यावरणाची हानी करुन मानवाची होणारी प्रगती यासंबंधी स्वीडनमधील स्टॉकहोम येथे ५ जून १९७२ रोजी एक परिषद भरली होती. आता हा दिवस ’जागतिक पर्यावरण दिवस’ (World Environment Day) म्हणून साजरा केला जातो.  

९९४ वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराने इंग्लिश कौटी क्रिकेट स्पर्धेत वॉरविकशायरकडून खेळताना नाबाद ५०१ धावा करून प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला.
१९८० नारायण मल्हार जोशीभारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे (AITUC) एक संस्थापक नारायण मल्हार जोशी यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीटाचे अनावरण करण्यात आले.
१९७७ सेशेल्समधे उठाव झाला.
१९७५ सुएझ कालवा पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. १९६७ पासून ८ वर्षे हा कालवा वापरण्यास मनाई होती.
१९५९ सिंगापूरमधील पहिल्या सरकारची स्थापना झाली.
१९१५ डेन्मार्कमधे महिलांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला. 

जन्म :
१९०८ रवि नारायण रेड्डी – ’कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’ चे सहसंस्थापक (मृत्यू: ७ सप्टेंबर १९९१)
१८८३ जॉन मायनार्ड केन्स – ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ (मृत्यू: २१ एप्रिल १९४६)
१८८१ गोविंदराव टेंबेगोविंदराव टेंबे – हार्मोनियम वादक, अभिनेते व संगीतकार, नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार, पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक, संगीत क्षेत्रातील पहिले सौंदर्य मीमांसक, संगीतिकांचे प्रवर्तक. ’अयोध्येचा राजा’, ’अग्निकंकण’, ’मायामच्छिंद्र’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. हार्मोनियम या साथीच्या वाद्याला त्यांनी स्वतंत्र वाद्याची प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली. (मृत्यू: ९ आक्टोबर १९५५)
१८७९ नारायण मल्हार जोशी – भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक (मृत्यू: ३० मे १९५५)
१७२३ अ‍ॅडॅम स्मिथ – स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता (मृत्यू: १७ जुलै १७९०)

मृत्यू :
२००४ रोनाल्ड रेगन – अभिनेते आणि अमेरिकेचे ४० वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ६ फेब्रुवारी १९११)
१९९९ राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे शाहूमहाराज भोसले (जन्म: ? ? ????)
१९७३ माधव सदाशिव गोळवलकर तथा श्री गुरूजी – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक (जन्म: १९ फेब्रुवारी १९०६)
१९५० हरिश्चंद्र बिराजदार – कुस्तीगीर व प्रशिक्षक (जन्म: १४ सप्टेंबर २०११)