चालू घडामोडी 12 जून 2018

✓ भारत-चीनदरम्यानचे व्दिपक्षीय संबंध बळकट होतील :
शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय आणि जागतिक समस्यांवरचर्चा केली. या बैठकीनंतर द्विपक्षीय संबंधांना बळकटी येणार असल्याचे म्हटले आहे.
दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये वुहान बैठकीनंतर सहा आठवडय़ांत दुसऱ्यांदा बैठक होत असून डोकलाम मुद्दय़ावर दोन्ही देशांतील संबंध तणावाचे बनले होते. मोदी यांचे दोन दिवसांच्या भेटीसाठी येथे आगमन झाले, दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन केले, त्याची छायाचित्रेही घेण्यात आली.

भारत व चीन यांच्यातील मजबूत व स्थिर संबंध हे शांततामय व स्थिर जगासाठी महत्त्वाचे आहेत, असे मोदी यांनी सांगितले. दोन्ही नेत्यांनी वुहान बैठकीतील निर्णयांच्या अंमलबजावणीवर भर देण्याचे ठरवले आहे. दरम्यान एससीओचे सरचिटणीस राशीद अलिमोव व उझ्बेकचे अध्यक्ष शौकत मिरीयायेव यांच्याशीही मोदी यांनी चर्चा केली.

अनेक जागतिक प्रश्नांवर ते चर्चा करणार असून त्यात इराणचा अमेरिकेने रद्द केलेला अणुकरार, इंडो-पॅसिफिक भागातील परिस्थिती या मुद्दय़ांचा समावेश आहे. मोदी यांची ही पाच आठवडय़ांत चीनला दुसरी भेट आहे.

✓ मानसिक आजारांना विमा संरक्षण नाही :
मानसिक आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून प्रदीर्घ काळ चालणाऱ्या या उपचारासाठी लागणारा खर्च कुटुंबाच्या आवाक्याबाहेर असतानाही गेल्या आठवडय़ात जारी करण्यात आलेल्या विधेयकातही विमा संरक्षणाबाबत संदिग्धता आहे.

सहा महिन्यानंतर मानसिक आरोग्य विधेयक जारी करण्यात आले असून त्यात फक्त एका वाक्यात उल्लेख असून त्यामुळे विमा कंपन्या कितपत उत्सुकता दाखवतील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मानसिक आजारांनी ग्रस्त रुग्णांमध्ये प्रामुख्याने नैराश्य, चिंता आदी विकार आढळत आहेत. स्किझोफ्रेनिया, बायपोलर, ओसीडी या विकारग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आत्महत्येचे विचार सतत घोळत असणाऱ्या रुग्णांवर इलेक्ट्रो कन्वल्सिव्ह थेरपी (ईसीटी) म्हणजेच शॉक ट्रीटमेंट प्रभावी असल्याचा मानसोपरतज्ज्ञांचा दावा आहे.

तसेच याशिवाय रिपिटिटिव्ह ट्रान्सक्रॅनिअल मॅग्नेटिक (आरटीएमएस) तसेच थीटा बर्स्ट आदी उपचार उपलब्ध आहेत. मात्र हे उपचार महागडे असतानाही हा सर्व खर्च मानसिक आजारांसाठी असल्याचे कारण पुढे करून विमा कंपन्या दावा अमान्य करतात.

✓‘नादारी व दिवाळखोरी संहिता (दुरूस्ती) अध्यादेश-2018’ प्रस्तावित :
राष्ट्रपती राम नाथ कोविंद ‘नादारी व दिवाळखोरी संहिता (दुरूस्ती) अध्यादेश-2018’ याला प्रख्यापित करण्यास परवानगी दिली आहे.

नादारी व दिवाळखोरी संहिता (Insolvency and Bankruptcy Code) यामधील दुरूस्तीमुळे रिअल इस्टेट (बांधकाम) क्षेत्रात एकाच रात्रीत काम (एक प्रवृत्ती) करून कामचुकारपणा करणार्‍यांची समस्या दूर होईल आणि प्रकल्प वेळेत पूर्ण होण्याची खात्री केली जाईल. शिवाय हे विधेयक दिवाळखोरी कार्यवाही चालू असताना स्थानिक गृह खरेदीदारांना आर्थिक कर्जप्रदाते म्हणून मान्यता देण्यास परवानगी देते.

नादारी आणि दिवाळखोरी संहिता-2016 मध्ये दुरूस्ती करणारा नवा कायदा देशात नुकताच लागू करण्यात आला आहे. बेईमान वा धोकादायक व्यक्तींकडून या कायद्याच्या तरतुदीचा दुरुपयोग टाळण्याच्या उद्देशाने ‘नादारी व दिवाळखोरी संहिता-2017’ हा कायदा तयार करण्यात आला आहे. याअंतर्गत संपूर्ण प्रक्रिया भारतीय नादारी व दिवाळखोरी मंडळ (IBBI) मार्फत चालवली जाते.

✓ सिनौली गावात उत्खननात 5000 वर्षांपूर्वीचा रथ सापडला :
उत्तरप्रदेशातील बागपत जिल्ह्यातील सिनौलीगावात नुकत्याच झालेल्या उत्खननात पुरातत्त्व विभागाच्या संशोधकांना कांस्य युगात (3300 बीसी -1200 बीसी) वापरल्या जाणार्‍या एका रथाचे अवशेष आढळून आले आहे.

या शोधामुळे हे सिद्ध झाले आहे की, या परिसरात 5000 वर्षांपूर्वी योद्ध्यांचे वास्तव्य होते. या शोधात तीन रथ, दोन ताबूत, तलवार, मणी, हेल्मेट्स आणि अन्य कलाकृत्या अश्या गोष्टी सापडल्या आहेत.

भारतीय नौदलात 'करंज' पाणबुडी दाखल :
भारताची स्कॉर्पिन श्रेणीतील तिसरी पानबुडी आईएनएस 'करंज' भारतीय नौदलात दाखल झाली आहे. पी 75 क्लासच्या तिसऱ्या श्रेणीतील करंज या पाणबुडीचे माझगाव गोदीत बुधवारी अनावरण करण्यात आले.

'करंज'च्या अनावरण कार्यक्रमप्रसंगी भारतीय नौदलाचे प्रमुख एडमिरल सुनील लांबा यांच्यासह नौदलातील अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 'करंज'ची निर्मिती फ्रान्सच्या मदतीने करण्यात आली आहे. या पाणबुडीच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कमी आवाजतही शस्त्रूच्या जहाजाला लक्ष्य करण्यात विशेष अशी आहे.

'कंरज'ची निर्मिती 'मेक इन इंडिया' या योजनेंतर्गत करण्यात आली आहे. ही एक स्वदेशी बनावटीची आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या पाणबुडीची निर्मिती करण्यात आली आहे. ही पाणबुडी नौदलात दाखल झाल्याने पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. जाॅईन करा टेलीग्राम चॅनेल नाॅलेजहब.

दरम्यान, या वर्गातील पाणबुडी 'कलवरी'चा मागील महिन्यात नौदलात समावेश करण्यात आला. त्यानंतर आता 'करंज' ही पाणबुडी भारतीय नौदलात दाखल झाली आहे. अशा 6 पाणबुड्यांचा माझगाव डॉकयार्डमध्ये 2020 पर्यंत समावेश होणार आहे.

ला लिगा स्पर्धेत रोनाल्डोच्या माद्रिदला जेतेपद :
5 वर्षांचा दुष्काळ संपुष्टात, रोनाल्डो व करिम बेन्झेमाचे प्रत्येकी एक गोल

स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो व करीम बेन्झेमा यांनी प्रत्येकी एक गोल केल्यानंतर रियल माद्रिदने मॅलागाला 2-0 असे नमवत रविवारी ला लिगा स्पर्धेच्या जेतेपदावर थाटात शिक्कामोर्तब केले. जेतेपदावर आपली मोहोर उमटवण्यासाठी माद्रिदला फक्त एका गुणाची गरज होती. ती त्यांनी येथे वसूल केली. माद्रिदसाठी हे 33 वे लीग जेतेपद ठरले आहे.

पोर्तुगालचा आक्रमक आघाडीवर रोनाल्डोने अवघ्या दुसऱयाच मिनिटाला गोलजाळय़ाचा यशस्वी वेध घेत एकच खळबळ उडवून दिली. त्यानंतर जवळपास पूर्ण सामन्यावर माद्रिदचे वर्चस्व राहिले. रोनाल्डोसाठी हंगामातील हा 40 वा गोल ठरला. बेन्झेमाने दुसऱया सत्रात 10 मिनिटांचा खेळ बाकी असताना संघाचा दुसरा गोल केला. या विजयासह माद्रिदने 93 गुणांवर झेप घेत जेतेपद निश्चित केले. या स्पर्धेत त्यांचा हा सलग सहावा विजय ठरला. जाॅईन करा टेलीग्राम चॅनेल नाॅलेजहब.

माद्रिदला एप्रिलमध्ये बार्सिलोनाविरुद्ध 3-2 फरकाने स्वीकारावा लागला. त्यानंतर त्यांनी विजयात सातत्य राखले आहे. गतवर्षातील जेत्या बार्सिलोना संघाने घरच्या भूमीत खेळताना ऐबरला 4-2 अशा मोठय़ा फरकाने नमवले आणि 90 गुणांपर्यंत मजल मारली. स्पर्धेत ते दुसऱया स्थानी असतील, हे यावेळी निश्चित झाले. माद्रिदचे बॉस व माजी दिग्गज फुटबॉलपटू झिनेदिन झिदान यांनी आपल्या व्यावसायिक जीवनातील हा सर्वात आनंदाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया दिली. अगदी ख्रिस्तियानो रोनाल्डोने देखील हा हंगाम आपल्यासाठी विशेष फलदायी ठरला असल्याचे नमूद केले.

✓पंतप्रधान मोदी आणि पाकीस्तानचे अध्यक्ष हुसेन यांची भेट :
शांघाय सहकार्य परिषदेच्या बैठकीनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकीस्तानचे अध्यक्ष ममनून हुसेन यांची आनंदी वातावरणात भेट झाली. दोन्ही नेत्यांनी भेटल्यावर हस्तांदोलनही केले. 18 व्या शांघाय सहकार्य परिषदेच्या नंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते उपस्थित होते.

2016 मध्ये पाकीस्तानकडून भारतीय लष्कराच्या उरी येथील छावणीवर झालेल्या हल्ल्यामुळे आणि गेल्या वर्षीच्या कुलभुषण जाधव यांच्या प्रकरणाने भारत आणि पाकीस्तान यांच्यातील संबध आणखीनच ताणले गेले होते. त्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये झालेली ही भेट सकारत्मकता दर्शवत आहे.

उरी हल्ल्याच्या वेळीही भारताने सार्क परिषदेवर बहिष्कार टाकला होता. भारताने या परिषदेवर बहिष्कार टाकला म्हणून बांग्लादेश, भूतान आणि अफगाणिस्तान या देशांनीही इस्लामाबाद येथे होणाऱया या परिषदेवर बहिष्कार टाकला होता.

✓ रविवारची साप्ताहिक सुटीला 128 वर्षे पूर्ण :
सत्यशोधक विचारांच्या मुशीतून घडलेले कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांच्या हक्क आणि न्यायासाठी सातत्याने लढे उभारून त्यांना न्याय मिळवून दिला.

रविवारची सुटी देण्यास त्यांनी ब्रिटिश सरकार आणि गिरणीमालकांना भाग पाडले. 10 जून 1890 पासून रविवारची साप्ताहिक सुटी सुरू झाली. त्याला 10 जून रोजी 128 वर्षे पूर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे आजच्या लोकशाही पद्धतीचा मार्ग लोखंडेंनी त्या काळात अवलंबून कामगारांना न्याय मिळवून दिला होता.

अखंड मानवजातीच्या कल्याणासाठी कार्य करणाऱ्या महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीचा केवळ धार्मिकच नव्हे सर्वच प्रकारच्या शोषणाला विरोध होता. त्यामुळे नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांच्या अनिर्बंध शोषणाविरोधात आवाज उठवत त्यांचे हक्क, न्यायासाठी लढा उभारला.

अनेक दाखले देत लोखंडेंनी रविवार हा दिवस साप्ताहिक सुटीसाठी कसा योग्य आहे, हे सरकारला पटवून दिले. लोखंडे यांच्या मागणीला कामगारांचा वाढता पाठिंबा पाहून अखेर 10 जून 1890 मध्ये गिरणीमालकांनी रविवारच्या साप्ताहिक सुटीचा ठराव पास केला आणि कामगारांना साप्ताहिक सुटी लागू झाली.

✓ जेईई अॅडव्हान्स परीक्षेत प्रणव गोयल प्रथम :
JEE Advanced Result 2018 देशभरात आयआयटी, एनआयटी आणि तत्सम संस्थांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या 'जेईई अॅडव्हान्स' परीक्षेचा निकाल 10 जून रोजी जाहीर झाला आहे.

तसेच या परीक्षेत हरियाणाच्या प्रणव गोयलने 360 पैकी 337 गुण मिळवत देशातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. तर महाराष्ट्रातून ऋषी अग्रवाल हा पहिला आला आहे. ऋषी अग्रवाल हा मुंबईच्या पेस इन्स्टिस्टूटचा विद्यार्थी आहे.

आयआयटी कानपूरने हे निकाल घोषीत केले आहेत. 20 मे रोजी आयआयटी कानपूरच्या वतीने देशभरातील विविध केंद्रांवर हा परीक्षा घेण्यात आली होती.

कोटा येथील साहिल जैन देशातून दुसरा आला असून दिल्लीच्या कलश शहाने तिसरा क्रमांक पटकावला. तर मुलींमध्ये कोटा येथील मीनल पारेख पहिली आली, देशातून ती सहावी आली आहे. तिला 360 पैकी 318 गुण मिळाले आहेत.

अधिकृत संकेतस्थळ jeeadv.ac.in यावर जाऊन विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतात. देशभरातून यावर्षी जवळपास एक लाख 60 हजार विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र ठरले होते.

निकाल जाहीर झाल्यानंतर आता 15 जूनपासून जागा वाटपाचा प्रक्रिया सुरू होणार आहे. गेल्या वर्षी आयआयटी मद्रासकडून देशभरातील विविध केंद्रांवर हा परीक्षा घेण्यात आली होती.

काही महत्वाच्या घटना:
२००१ कोनेरु हंपी ही बुद्धीबळातील 'वूमन ग्रॅंडमास्टर' बनली. हा पराक्रम करणारी ती भारताची सर्वात कमी वयाची व एकुणात दुसरी खेळाडू आहे.
१९९६ एच.डी.देवेगौडा यांच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत बहुमत सिध्द केले.
१९९३ पृथ्वी क्षेपणास्त्राची ११ वी चाचणी यशस्वी
१९७५ अलाहाबाद न्यायालयाने इंदिरा गांधीची निवडणूक रद्द ठरवली व त्यांना ६ वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी केली. या निर्णयामुळे इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लादली.
१९६४ वर्णद्वेषाविरोधात लढणारे नेते नेल्सन मंडेला यांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.
१९४४ दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी वापरलेला पहिला फ्लाईंग बॉब लंडनवर आदळला.
१९४० दुसरे महायुद्ध – १३,००० ब्रिटिश व फ्रेन्च सैनिकांनी मेजर जनरल रोमेल समोर शरणागती पत्करली.
१९१३ जॉन ब्रे या अमेरिकन माणसाने जगातील पहिली कार्टून फिल्म बनवली.
१९०५ नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची (Servants of India Society) स्थापना केली.
१८९८ फिलिपाइन्सने स्पेनपासुन स्वतंत्र असल्याचे घोषित केले.

जन्म :
१९५७ जावेद मियाँदाद – पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू व प्रशिक्षक
१९२९ अ‍ॅन फ्रँक – जर्मन छळछावणीत मरण पावलेली मुलगी (मृत्यू: ?? मार्च १९४५)
१९१७ भालचंद्र दत्तात्रय खेर – लेखक व पत्रकार (मृत्यू: २१ जून २०१२)
१८९४ पुरुषोत्तम विश्वनाथ तथा पु. वि. बापट – प्राच्य विद्या संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पाली भाषा कोविद, सिंहली, ब्राम्ही व थाई भाषा तज्ञ, त्यांनी सुमारे १४० शोधनिबंध प्रसिद्ध केले. (मृत्यू: ४ नोव्हेंबर १९९१)
  ४९९ आर्यभट्ट – भारतीय गणिती व खगोलशास्त्रज्ञ (मृत्यू: ? ? ५५०)

मृत्यू :
२००३ ग्रेगरी पेक – हॉलीवूड अभिनेता (जन्म: ५ एप्रिल १९१६)
२००० पु. ल. देशपांडे तथा ’पु. ल.’ – आपल्या अलौकिक प्रतिभेने जगभरातील मराठी मनांवर अधिराज्य गाजवणारे आणि त्यांची अभिरुची संपन्न करणारे लेखक, नाटककार, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, संगीतकार, गायक, वादक आणि वक्ते (जन्म: ८ नोव्हेंबर १९१९)
१९८३ नॉर्मा शिअरर – कॅनेडियन - अमेरिकन अभिनेत्री (जन्म: १० ऑगस्ट १९०२)
१९८१ प्र. बा. गजेंद्रगडकर – भारताचे ७ वे सरन्यायाधीश (जन्म: १६ मार्च १९०१)
१९६४ कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी – लेखक व मराठी भाषातज्ञ (जन्म: ५ जानेवारी १८९२ - इस्लामपूर, सांगली)

Post a Comment

0 Comments