loading...

स्पर्धा परीक्षा देताना संयम हवाच

समाजामध्ये वावरताना positive अन Negative
power चा नकळत प्रत्येक व्यक्तीवर परिणाम होतो.

आता Negative शक्ती म्हणजे आपण घेतलेल्या
निर्णयांपासून आपल्याला परावृत्त करणा-या
शक्ती.
 या शक्ती कधी नातेवाईक, मित्र, मौत्रिणी
यांच्या रूपातही भेटू शकतात.
त्यांच्या तोंडी
हमखास ठरलेली विधानं असतात ‘अरे/अगं, नको करू
एमपीएससी, ते अवघड असतं, पाच-पाच वर्ष यश मिळत
नाही. त्याला खूप अभ्यास करावा लागतो.
दिवसातले १७-१८ तास.
 आमचा एक मित्र २० तास
अभ्यास करायचा तरी शेवटी पास झाला नाही.
मेडिकलची व अभियांत्रिकी, कृषी शाखेची मुलं
यामध्ये यशस्वी होतात.
 त्यापेक्षा वेगळं काहीतरी
बघ. एमपीएससी आजिबात नको’… मित्रांनो, ही
यादी खूप वाढवता येईल, प्रश्न असा आहे की
अनेकांकडून अशा विधानांचा मारा झाल्यावर
तयारी करणा-याचा आत्मविश्वास ढासळू लागतो
आणि साशंकपणे अभ्यास सुरू होतो.
याचं फळ म्हणजे
सुरुवातीचे काही दिवस अभ्यास नेमका काय
करायचा हेच समजत नाही.
 आभासी अभ्यासात
दिवस मजेत जात असतात.
आपण अभ्यासाचा झंझावात म्हणतो, पण
शंकाकुंशकानी मन वेढलं असताना झंझावात कसा
निर्माण होणार म्हणून सर्वप्रथम या शंकाकुशंका,
संशयकल्लोळ मनातून बाजूला करावा.
आयोगाने
पुरवलेल्या महत्त्वाच्या बाबीकडे लक्ष केंद्रीत करावं.
ती महत्त्वाची बाब म्हणजे अभ्यासक्रम काय आहे:
एमपीएससी राज्यसेवा परीक्षा पूर्व परीक्षा, मुख्य
परीक्षा, मुलाखत या तीन टप्प्यांत घेण्यात येते.
हे
तीन टप्पे एक प्रकारे अडथळेच आहेत.
अडथळ्याची
शर्यत आपल्याला पार करायची आहे.
 मुळात आयुष्य हे
सरल, सुगम कधीही नसतं.
अनंत अडचणी, अडथळे,
विवंचना यातून मार्ग शोधावा लागतो. त्या
आयुष्याच्या अडथळ्यांच्या तुलनेत हे अडथळे अगदी
किरकोळ आहेत.
आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत
दुखः करीत बसू नका,कारण काळ अनंत आहे. वारंवार
प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊले टाका.
सतत कर्तव्य करीत राहा,आज न उद्या तुम्ही नक्कीच
यशस्वी व्हाल.
"Nothing is impossible, this word itself says, I'M
POSSIBLE!"