भारतातील आजपर्यंतच्या राष्ट्रपतींची यादी

2375
१९५० सालच्या पदनिर्मितीनंतर आजवर १३ व्यक्ती भारताचे राष्ट्रपती राहिले आहेत. या 13 राष्ट्रपतींची थोडक्यात मुद्देसुद व परिक्षाभिमुख माहिती.
List of Indian Presidents till today.

 भारतालील आतापर्यंतच्या झालेल्या राष्ट्रपतींची माहिती

#नावचित्रपदग्रहणपद सोडलेटीपा
डॉ. राजेंद्र प्रसाद
(१८८४-१९६३)
Food Minister Rajendra Prasad during a radio broadcast in Dec 1947 cropped.jpg२६ जानेवारी १९५०१३ मे १९६२बिहार राज्याचे रहिवासी असलेले डॉ. राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते. ते एक स्वातंत्र्यसैनिक देखील होते.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
(१८८८-१९७५)
Radhakrishnan.jpg१३ मे १९६२१३ मे १९६७डॉ. राधाकृष्णन हे एक ख्यातनाम तत्ववेत्ते होते.
3झाकिर हुसेन
(१८९७-१९६९)
१३ मे १९६७३ मे १९६९डॉ. हुसेन ह्यांना पद्म विभूषण व भारतरत्न हे पुरस्कार मिळाले होते.
वराहगिरी वेंकट गिरी
(१८९४-१९८०)
३ मे १९६९२० जुलै १९६९
मोहम्मद हिदायतुल्ला
(१९०५-१९९२)
२० जुलै १९६९२४ ऑगस्ट १९६९राष्ट्रपती होण्यापूर्वी हिदायतुल्ला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते.
वराहगिरी वेंकट गिरी
(१८९४-१९८०)
Varahagiri Venkata Giri.jpg२४ ऑगस्ट १९६९२४ ऑगस्ट १९७४कार्यवाहू व निर्वाचित पदांवर असणारे वेंकट गिरी हे आजवरचे एकमेव राष्ट्रपती आहेत.
5फक्रुद्दीन अली अहमद
(१९०५-१९७७)
Fakhruddin Ali Ahmed.jpg२४ ऑगस्ट १९७४११ फेब्रुवारी १९७७
बी.डी. जत्ती
(१९१२-२००२)
११ फेब्रुवारी १९७७२५ जुलै १९७७
नीलम संजीव रेड्डी
(१९१३-१९९६)
NeelamSanjeevaReddy.jpg२५ जुलै १९७७२५ जुलै १९८२
झैल सिंग
(१९१६-१९९४)
ZailSingh.jpg२५ जुलै १९८२२५ जुलै १९८७१९७२ साली झैल सिंग पंजाबचे मुख्यमंत्री तर १९८० साली भारताचे गृहमंत्री होते.
रामस्वामी वेंकटरमण
(१९१०-२००९)
R Venkataraman.jpg२५ जुलै १९८७२५ जुलै १९९२वेंकटरमण हे एक स्वातंत्र्यसेनानी होते व ब्रिटिश राजवटीत त्यांना तुरुंगवास भोगायला लागला होता.
शंकरदयाळ शर्मा
(१९१८-१९९९)
Shankar Dayal Sharma 36.jpg२५ जुलै १९९२२५ जुलै १९९७राष्ट्रपती होण्यापूर्वी शर्मा हे मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री होते.
१०के.आर. नारायणन
(१९२०-२००५)
K. R. Narayanan.jpg२५ जुलै १९९७२५ जुलै २००२
११डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम
(जन्म १९३१)
Abdulkalam04052007.jpg२५ जुलै २००२२५ जुलै २००७अब्दुल कलाम हे एक शास्त्रज्ञ होते. भारताचा अंतराळ कार्यक्रम राबवण्यात त्यांची आघाडीची भूमिका होती. त्यांना देखील भारतरत्न पुरस्कार मिळाला होता.
१२प्रतिभा पाटील
(जन्म १९३४)
PratibhaIndia.jpg२५ जुलै २००७२५ जुलै २०१२राष्ट्रपती बनणाऱ्या पाटील ह्या पहिल्या महिला होत्या.
१३प्रणव मुखर्जी
(जन्म १९३५)
Pranab Mukherjee-World Economic Forum Annual Meeting Davos 2009 crop(2).jpg२५ जुलै २०१२२५ जुलै २०१७मुखर्जी मनमोहनसिंग सरकारमध्ये अर्थमंत्री होते.
१४रामनाथ कोविंदRamNathKovind.png२५ जुलै २०१७विद्यमान२०१५ ते २०१७ या काळात बिहार राज्याचे राज्यपाल होते.२५ जुलै, २०१७ पासून पासून या पदावर आहेत. रामनाथ कोविन्द याचं जन्म उत्तर प्रदेश येतील कानपुर जिल्हयात डेरापुर, कानपुर या एका छोट्याशा गावात झाला.

 

List of Indian Presidents till today.

रामनाथ कोविंद हे भारताचे विद्यमान राष्ट्रपती आहेत (२५ जुलै २०१७ पासून)

भारताचा राष्ट्रपती हा भारत देशाचा राष्ट्रप्रमुख आहे. राष्ट्रपती हा सरकारचा, संसदेचा व न्यायसंस्थेचा कायदेशीर प्रमुख असून तो भारतीय सेनेचा लष्करप्रमुख देखील आहे.
भारताच्या संविधानानुसार राष्ट्रपतीची निवड थेट नागरिकांद्वारे न होता संसदेच्या लोकसभा व राज्यसभा तसेच देशातील सर्व घटक राज्यांच्या विधान मंडळाच्या विधानसभा ह्या शाखांमधील निर्वाचित प्रतिनिधींमार्फत होते. राष्ट्रपतीचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. संसदेला महाभियोग चालवूनच फक्त त्यांना मुदत संपायच्या आधी पदावरून दूर करता येते. नवी दिल्लीमधील राष्ट्रपती भवन हे राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here