भारतीय रेल्वे बद्दल संपूर्ण माहिती

भारताच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, आणि तंत्रज्ञानातल्या प्रगतीला भारतीय रेल्वेने वेग दिला आहे. भारतीय उपखंडात 1840 मध्ये ब्रिटिश कार्पोरेशन ला रेल्वे बांधण्यास परवानगी मिळाली.

भारतीय रेल्वेबद्दल महत्वाची माहिती?

 

रेल्वे माहिती मराठी

 

16 एप्रिल 1853 या दिवशी लॉर्ड एल्फिन्स्टन यांनी बोरीबंदर या त्या काळच्या लाकडी स्थानकावर उभ्या असलेल्या वाफेच्या इंजिनाचा आणि त्यामागे काढलेल्या चौदा डब्यांच्या गाडीला 21 तोफांची सलामी देऊन पुढे निघण्यास आदेश दिला. त्याच बरोबर दुपारी 3 वाजून 35 मिनिटांनी भारतातील पहिली रेल्वेगाडी धूर सोडत निघाली. भायखळयापर्यंत विना थांबत गेली.

या गाडीचा पहिला प्रवास अनुभवण्यासाठी चारशे निमंत्रितांना बोलविण्यात आले होते. त्यांना गाडीच्या 14 डब्यात बसवण्यात आले. 3 छोटी वाफेची इंजिन या गाडीला जोडण्यात आली होती. ताशी अवघ्या 25 किमी या वेगाने आणि वाफेच्या इंजिनमध्ये पाणी भरण्यासाठी 12 थांबे घेत 1 तास 20 मिनिटांनी ही गाडी 34 किलोमीटर अंतर ओलांडून ठाणे स्थानकावर पोहोचली . या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली गेली.

रेल्वे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे मांडण्यास 1924 पासून सुरुवात झाली. 2017-18 पासून रेल्वे अर्थसंकल्प हा केंद्रीय अर्थसंकल्पात विलीन केला गेला. भारतीय रेल्वेचा आशियात चीन नंतर दुसरा तर जगात अमेरिका, रशिया, चीन नंतर चौथा क्रमांक लागतो.

दोन रुळांमधील रेल्वे मार्गाचे प्रकार :

  • ब्रॉड गेज – 1.676 मी
  • मीटर गेज – 1.000 मी
  • नॅरो गेज – 0.762 मि
  • लाईट गेज – 0.610 मि

भारतीय रेल्वे बद्दल सविस्तर माहिती?

पश्चिम विभागाची स्थापना नोव्हेंबर 1951 मध्ये करण्यात आली व याचे मुख्यालय मुंबईला आहे. कोल्हापूर-नागपूर (महाराष्ट्र एक्सप्रेस) हा महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त लांबीचा अंतर्गत रेल्वे मार्ग आहे.

जगातील पहिली आगगाडी 1932 सालीच इंग्लंड मध्ये स्टॉकहोम ते डार्लिंग दरम्यान धावली होती. 1983 मध्ये मुंबईचे आद्यजनक शिल्पकार नामदार नाना शंकर शेठ भारताचे लोहपुरुष सर जमशेटजी जीजीभाई यांच्या प्रयत्नाने ग्रेट इंडियन रेल्वे कंपनीची स्थापना केली.

वास्तू शिल्पकार एफ. डब्ल्यू स्टीवेन्सन यांनी 1877 साली बोरीबंदर स्थानक उभारण्याच्या कामास सुरुवात केली. 1 जानेवारी 1925 साली लोकांसाठी खुले करण्यात आले. प्रत्यक्षात 20 जून 1887 रोजी काम पूर्ण झाले. या कामाचा खर्च 1635562 रुपये झाला होता.

ज्युबिली डे ला 1888 बोरीबंदर चे नाव व्हिक्टोरिया टर्मिनल असे ठेवण्यात आले. यास आता छत्रपती शिवाजी टर्मिनल्स म्हणतात. म्हैसूर येथे भारतीय रेल्वेचे मोठे संग्रहालय आहे. पॅलेस ऑन व्हील्स ही रेल्वेची पंचतारांकित सेवा पुरविते.

पहिले सीझन टिकीट मुंबईत 1854 मध्ये देण्यात आली. टॉयलेटची सोय पहिल्या वर्गात 1891 मध्ये तर निम्न वर्गात 1907 मध्ये प्रथम सुरू करण्यात आली. मुंबई आणि दिल्ली यांना जोडणार्‍या पहिल्या राजधानी एक्सप्रेस उद्घाटन 17 मे 1972 रोजी पार पडले. फक्त 19 तास 5 मिनिटांत या गाडीने 1388 किलोमीटर अंतर पार केले होते.

नवी दिल्ली-भोपाळ शताब्दी एक्सप्रेस ही 140 किमी कमाल वेग गाठणारी गाडी आज भारताची सर्वात वेगवान गाडी आहे. भारतीय रेल्वेचा सर्वात दीर्घ मार्ग कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर आहे. या मार्गाचे अंतर 3751 किमी असून 72 तास 45 मिनिटे एवढ्या कालावधीत अंतर पार करते.

जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म खरगपुरला होता सध्या गोरखपुर उत्तर प्रदेश हा आहे. भारतीय रेल्वे चा सर्वात लांब पूल वेंबनाड पूल केरळमध्ये आहे. त्याची लांबी 4620 मीटर आहे. आशियातील सर्वात जास्त लांबीचा बोगदा कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी जवळ करबुडे बोगदा 6.45 किमी लांबीचा आहे. अशियातील सर्वात उंच पूल कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी जवळ पनवेल येथे 65 मीटर उंचीचा आहे.

सर्वात लांबलचक स्टेशनचे नाव वेंकटनससिहसजूवरिपेट्टा असून ते दक्षिण रेल्वे मार्गावर आहे. पहिली जनशताब्दी मुंबई-मडगाव 16 एप्रिल 2002 पासून सुरू झाली. मुंबई ते मंगलोर या मार्गाने धावणारी कोकण रेल्वेची लांबी 843 किमी आहे. रेल्वे प्रकल्पासाठी कोकण रेल्वे कार्पोरेशन ची स्थापना 1990मध्ये करण्यात आली.

महाराष्ट्रात कोकण रेल्वेची लांबी सुमारे 382 किमी आहे या रेल्वे मार्गावर एकूण 68 रेल्वेस्टेशन असून त्यापैकी महाराष्ट्रात 34 रेल्वे स्टेशन आहेत 126 पूल 1359 लहान पूल आहेत तर एकूण बोगद्यांची संख्या 73 आहे आणि बोगद्याचीसंख्या 73 आहे.

मराठवाड्यातील बीड विदर्भातील बुलढाणा व गडचिरोली ही जिल्ह्यांची ठिकाणे कोणत्याही मार्गावर नाहीत.

  1. पूर्व किनारा किनारा रेल्वे झोन ची स्थापना 8 ऑगस्ट 1996 रोजी करण्यात आली.
  2. पश्चिम मध्य रेल्वे झोनची स्थापना 9 डिसेंबर 1996 रोजी करण्यात आली.
  3. दक्षिण-पश्चिम रेल्वे झोन ची स्थापना 1 नोव्हेंबर 1996 रोजी करण्यात आली.
  4. उत्तर पश्चिम रेल्वे झोन ची स्थापना 10 ऑक्टोबर 1996 रोजी करण्यात आली.

भारतातील पहिली बुलेट ट्रेन जपानच्या सहकार्याने मुंबई ते अहमदाबाद अशी धावणार आहे. आज भारतात एकूण 17 रेल्वे झोन आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here