शब्द समूहाबद्दल एक शब्द Shabd Samuh Baddal Shabd

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

शब्द समूहाबद्दल एक शब्द Shabd Samuh Baddal Shabd

अनेक बाबींवर एकाच वेळी लक्ष ठेवणारा – अष्टावधानी
अनेक केळ्यांचा समूह – घड
अनेक गुरांचा समूह – कळप
अनेक फळांचा समूह – घोस
अनेक फुलांचा समूह – गुच्छ
अनेक माणसांचा समूह – जमाव
अंग चोरून काम करणारा – अंगचोर
अस्वलाचा खेळ करणारा – दरवेशी
ईश्वर आहे असे मानणारा – आस्तिक
उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह – धबधबा 
ऐकायला येत नाही असा – बहिरा
ऐकायला व बोलायला येत नाही असा – मूकबधीर
कथा सांगणारा – कथेकरी
कधीही जिंकला न जाणारा – अजिंक्य
कपडे धुण्याचे काम करणारा – धोबी
कपडे शिवण्याचे काम करणारा – शिंपी
कष्ट करून जगणारा – श्रमजीवी
कमी आयुष्य असणारा – अल्पायुषी
कर्तव्य तत्परतेने पार पडणारा – कर्तव्यदक्ष 
कापड विणणारा – विणकर
कादंबरी लिहिणारा लेखक – कादंबरीकार
कविता करणारी – कवयित्री
किल्ल्याच्या सभोवतालची भिंत – तट
केवळ स्वतःचाच फायदा करू पाहणारा – स्वार्थी
केलेले उपकार जाणणारा – कृतज्ञ
केलेले उपकार विसरणारा – कृतघ्न
कैदी ठेवण्याची जागा – तुरुंग 
कोणत्याही क्षेत्रात एकदम होणारा इष्ट बदल – क्रांती
खूप दानधर्म करणारा – दानशूर
खूप आयुष्य असणारा – दीर्घायुषी
खूप पाऊस पडणे – अतिवृष्टी
गुरे राखणारा – गुराखी
shabd samuhabddal shabd

shabd samuh badal ek shabd marathi

घरदार नष्ट झाले आहे असा – निर्वासित
घरापुढील मोकळी जागा – अंगण
घरे बांधणारा – गवंडी
चार रस्ते एकत्र येतात ती जागा – चौक
चांदण्या रात्रीचा पंधरवडा – शुक्लपक्ष
चित्रे काढणारा – चित्रकार
जमिनीवर राहणारे प्राणी – भूचर 
जादूचे खेळ करून दाखवणारा – जादूगार
जे प्रत्यक्षात नाही ते आहे असे भासणे – आभास
जेथे वस्तू विकल्या जातात ती जागा – दुकान
ज्याचे वर्णन करणे शक्य नाही ते – अवर्णनीय
ज्याचे कधी विस्मरण होत नाही ते – अविस्मरणीय
ज्याला एकही शत्रू नाही असा – अजातशत्रू
ज्याला आईवडील नाहीत असा – अनाथ, पोरका
ज्याला मरण नाही असा – अमर
ज्याला कधी म्हातारपण येत नाही असा – वजर
ठरावीक काळाच्या अंतराने प्रकाशित होणारे – नियतकालिक
एकत्र येतात ती जागा – तिठा  
झाडांची निगा राखणारा – माळी
तिथी (दिवस, वेळ) न ठरवता (अचानक) आलेला – अतिथी
दगडावर कोरलेले लेख – शिलालेख
दगडावर मूर्ती घडवणारा – शिल्पकार
दररोज प्रसिद्ध होणारे – दैनिक
दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे – साप्ताहिक
दर पंधरवड्याने प्रसिद्ध होणारे – पाक्षिक
दर महिन्याला प्रसिद्ध होणारे – मासिक
दर तीन महिन्यांनी प्रसिद्ध होणारे – त्रैमासिक
दर सहा महिन्यांनी प्रसिद्ध होणारे –  षण्मासिक
दर वर्षाला प्रसिद्ध होणारे – वार्षिक
दारावरील पहारेकरी – द्वारपाल, दरवान
दुष्काळात सापडलेले – दुष्काळग्रस्त
दुसर्यावर अवलंबून असणारा – परावलंबी
दुसर्यावर उपकार करणारा – परोपकारी
दूरदर्शनवर, आकाशवाणीवर बातम्या सांगणारा – वृत्तनिवेदक 
देशाची सेवा करणारा – देशसेवक
देवापुढे सतत जळणारा दिवा – नंदादीप
दोन किंवा अनेक नद्या एकत्र येतात ते ठिकाण – संगम
धान्य साठवण्याची जागा – कोठार
नदीची सुरवात होते ती जागा – उगम
नाटकांत किंवा चित्रपटांत काम करणारा – अभिनेता
नेहमी घरात बसून राहणारा – घरकोंबडा
पाऊस अजिबात न पडणे – अवर्षण
पायात चपला वा बूट न घालता चालणारा – अनवाणी
पायापासून डोक्यापर्यंत – आपादमस्तक
पालन करणारा – पालक
पायी चालणारा – पादचारी
पुरामुळे नुकसान झालेला – पूरग्रस्त
पूर्वी कधी घडले नाही असे – अभूतपूर्व, अपूर्व 
फुकट भोजन मिळण्याचे ठिकाण – सदावर्त, अन्नछत्र
बसगाड्या थांबण्याची जागा – बसस्थानक
बातमी आणून देणारा/देणारी – वार्ताहर
बोलता येत नाही असा – मुका
भाषण ऐकणारा – श्रोता
भाषण करणारा – वक्ता 
माकडाचा खेळ करणारा – मदारी
मातीची भांडी करणारा – कुंभार
मृत्यूवर विजय मिळवणारा – मृत्युंजय
रणांगणावर आलेले मरण – वीरमरण
रोग्यांची शुश्रुषा करणारी – परिचारिका
लग्नासाठी जमलेले लोक – वर्हाडी
लहानांपासून वृद्ध माणसांपर्यंत – आबालवृद्ध
लाकूडकाम दरणारा – सुतार
लाज नाही असा – निर्लज्ज
लागत नाही असा – अथांग
वाद्य वाजवणारा – वादक
वाडवडिलांनी मिळवलेली – वडिलोपार्जित
विनामुल्य पाणी मिळण्याची जागा – पाणपोई
विमान चालवणारा – वैमानिक
व्याख्यान देणारा – व्याख्याता
शत्रूकडील बातमी काढणारा – हेर
शत्रूला सामील झालेला – फितूर
शेती करणारा – शेतकरी
शोध लावणारा – संशोधक
श्रमांवर जगणारा – श्रमजीवी
सतत काम करणारा – दिर्घोद्योगी
स्तुती गाणारा – भाट
सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष – कल्पवृक्ष
सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय – कामधेनू
स्वर्गातील इंद्राची बाग – नंदनवन
स्वतः श्रम न करता खाणारा – ऐतखाऊ
स्वतःचा स्वार्थ न पाहणारा – निःस्वार्थी
संकटे दूर करणारा – विघ्नहर्ता
सूर्य उगवण्याची घटना – सूर्योदय
सूर्य मावळण्याची घटना – सूर्यास्त
सोन्याचांदीचे दागिने करणारा – सोनार
हत्तीला काबूत ठेवणारा – माहूत 
हाताच्या बोटात घालायचं दागिना – अंगठी
हिमालयापासून कन्याकुमारीपार्यंत होडी चालवणारा – नावाडी