मराठी व्याकरण – अनुस्वार संबंधीचे नियाम

तत्सम : संस्कृतातून मराठीत जसेच्यातसे आलेले शब्द
  • शब्दांतील अनुनासिकांबद्दल विकल्पाने परसवर्ण लिहिण्यास हरकत नाही.
marathi%2BVyakran%2Banuswar

परसवर्ण :

  • क – वर्ग पाचवे व्यंजन अनुनासिक ङ्
  • च – वर्ग पाचवे व्यंजन अनुनासिक ञ्
  • ट – वर्ग पाचवे व्यंजन अनुनासिक ण्
  • त – वर्ग पाचवे व्यंजन अनुनासिक न्
  • प – वर्ग पाचवे व्यंजन अनुनासिक म्

शब्दांमध्ये ‘क’ वर्गातील अक्षरापूर्वी सानुनासिक आल्यास ‘क’ वर्गातील सानुनासिकाचा उच्चार होतो.

  • जसे – कंकण – कङ्कल
  • च वर्ग – चंचल – चञ्चल
  • ट वर्ग – करंटा – करण्टा
  • त वर्ग – मंद – मन्द
  • प वर्ग – कंप – कम्प

अंतर्गत, अन्तर्गत : पंडित, पण्डित

वेदान्त, सुखान्त, दुःखान्त, देहान्त, वृत्तान्त, स्वरान्त, व्यंजनान्त, शालान्त हे शब्द असेच लिहावेत.

स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा.

 जसे – गुलकंद, चिंच, तंटा, निबंध, आंबा, कांदा

य्, र्, ल्, व्, श्, ष्, स्, ह् यांच्यापूर्वी येणाऱ्या अनुस्वारांबद्दल केवळ शीर्षबिंदू द्यावा.

सिंह, संयम, मांस, संशय, संज्ञा, संकेत, सुंदर
वरील नियमातून ‘ष’ वगळावा, कारण या अक्षरापूर्वी अनुस्वार येणारा शब्द मराठीत नाही.

नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्यरुपांवर विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा.

 

  • लोकांना, तुम्हांस, घरांपुढे, लोकांसमोर, घरांपुढे, परंतु, शब्दांत
  • एका व्यक्तीचा आदरार्थी उल्लेख करताना तसेच अनेकवचनी सामान्यारुपांवर अनुस्वार द्यावा.
  • नेहरूंनी, आजोबंपाशी, आपणांस, तुम्हांला

 

वरील नियमांव्यतिरिक्त कोणत्याही कारणांसाठी व्युत्पत्तीने सिद्ध होणारे वा न होणारे अनुस्वार देऊ नयेत.

 

  • संस्कृत शब्द  :  पूर्वीचे  :  आजचे
  • कण्टक          :  कांट     :  काटा
  • चञ्चु             :  तूं         :  तू
  • नाम              :  नांव      :  नाव

त्याचप्रमाणे इतर काही शब्द पूर्वी अनुस्वार देऊन लिहिले जात. कांहीं, हाहीं, हसूं, रडूं, एकदां आता यांसारख्या शब्दांवर अनुस्वार देऊ नये.