Thursday, November 5, 2026
More
    Home Maharashtra Giography महाराष्ट्राचा भूगोल थ्योडक्यात

    महाराष्ट्राचा भूगोल थ्योडक्यात

    महाराष्ट्र राज्य:

    महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. स्थापनेचा वेळी महाराष्ट्रात 26 जिल्हे, 235 तालुके, 4 प्रशासकीय विभाग होते.सध्यास्थितीत महाराष्ट्रात 36 जिल्हे, 355 तालुके, 535 शहरे, 43663 खेडी, 6 प्रशासकीय विभाग आहेत.

    महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभाग:

    1. कोकण (30746 चौ.किमी): मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी/सिंधुदुर्ग.
    2. पुणे/प.महाराष्ट्र (57268 चौ.किमी): पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.
    3. नाशिक/खान्देश (574426 चौ.किमी): नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार.
    4. औरंगाबाद/मराठवाडा (64822 चौ.किमी): औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.
    5. अमरावती/प.विदर्भ (46090 चौ.किमी): अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम.
    6. नागपूर/पूर्व.विदर्भ (51336 चौ.किमी): नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया.

    नैसर्गिक सीमा :

    • वायव्येस : सातमाळा डोंगररांगा, गाळणा टेकड्या व सातपुडा पर्वतातील अक्राणी टेकड्या.
    • उत्तरेस : सातपुडा पर्वतरांगा व त्याचा पूर्वेस गाविलगड टेकड्या.
    • ईशान्येस : दरेकासा टेकड्या.
    • पूर्वेस : चिरोळी टेकड्या व भामरागड डोंगर.
    • दक्षिणेस : हिरण्यकेशी नदी व कोकणातील तेरेखोल नदी.
    • पश्चिमेस : अरबी समुद्र.

    राजकीय सीमा व सरहद्द :

    • वायव्येस : गुजरात व दादरा नगर हवेली.
    • उत्तरेस : मध्यप्रदेश.
    • पूर्वेस : छत्तीसगड.
    • आग्नेयेस : आंध्र प्रदेश.
    • दक्षिणेस : कर्नाटक व गोवा.

    राज्य व त्यांना जोडणारे महाराष्ट्रातील जिल्हे :

    • गुजरात : पालघर, नाशिक, नंदुरबार, धुले
    • दादर नगर हवेली : ठाणे, नाशिक
    • मध्ये प्रदेश : नंदुरबार, धुले, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपुर, भंडारा, गोंदिया
    • छत्तीसगड : गोंदिया, गडचिरोली
    • आंध्रप्रदेश : गडचिरोली, चंद्रपुर, यवतमाळ, नांदेड
    • गोवा : सिंधुदुर्ग

    महाराष्ट्रचे भारतातील स्थान :

    भारतातील 29 राज्यांपैकी एक.
    भारताच्या मध्यवर्ती भागात .
    महाराष्ट्र राज्य ही उत्तर भारत व दक्षिण भारतात एकत्र आणणारी विशाल भूमी आहे .
    1. विस्तार
    अक्षांक : 15° 41’ उत्तर अक्षवृत्त ते 22° 6’ उत्तर अक्षवृत्त.
    रेखांश : 72° 36’ पूर्व रेखांश ते 80° 54’ पूर्व रेखावृत्त.
    2. आकार
    व्हीव्हीत्रिकोणाकृती, दक्षिणेस चिंचोळा तर उत्तरेस रुंद.
    पाया – कोकणात व निमुळते टोक विदर्भात.
    3. लांबी, रुंदी व क्षेत्रफळ
    लांबी = पूर्व – पश्चिम – 800 किमी.
    रुंदी = दक्षिण – उत्तर – 720 किमी.
    क्षेत्रफळ = 307713 चौ.किमी.
    क्षेत्रफळाच्या द्रुष्टीने भारतात राजस्थान, मध्येप्रदेश नंतर महाराष्ट्रचा 3 रा क्रमांक लागतो.
    महाराष्ट्राने देशाचा 9.36% भाग व्यापला आहे.
    समुद्रकिनारा 720 किमी. लांबीचा आहे.

    जिल्हे निर्मिती :

    1. 1 मे 1981 : रत्नागिरीपासून – सिंधुदुर्ग (27 वा जिल्हा)
                         औरंगाबादपासून – जालना (28 वा जिल्हा)
    2. 16 ऑगस्ट 1982 : उस्मानाबादपासून – लातूर (29 वा जिल्हा),
        26 ऑगस्ट 1982 : चंद्रपूरपासून – गडचिरोली (30 वा जिल्हा)
    3. 1990 : मुंबईपासून – मुंबई उपनगर (31 वा जिल्हा)
    4. 1 जुलै 1998 : धुळेपासून – नंदुरबार (32 वा जिल्हा)
                           अकोल्यापासून – वाशिम (33 वा जिल्हा)
    5. 1 मे 1999 : परभणीपासून – हिंगोली (34 वा जिल्हा)
                         भंडारा – गोंदिया (35 वा जिल्हा)
    6.1 ऑगस्ट 2014 : ठाण्यापासून – पालघर (36 वा जिल्हा)

    महाराष्ट्राची प्राकृतिक रचना :

    महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचे तीन विभाग
    1. कोकण किनारपट्टी
    2. सह्याद्रि पर्वत / पश्चिम घाट
    3. महाराष्ट्र पठार / दख्खन पठारी

    1. कोकण किनारपट्टी :

    • स्थान: महराष्ट्र अरबी समुद्र व सह्याद्रि पर्वत यांच्या दरम्यान दक्षिणोत्तर लांब पट्टयास ‘कोकण’ म्हणतात.
    • विस्तार: उत्तरेस – दमानगंगा नदीपासून दक्षिणेस – तेरेखोल खाडीपर्यंत. कोकण किनारपट्टी ‘रिया’ प्रकारची आहे.
    • लांबी: दक्षिणोत्तर = 720 किमी, रुंदी = सरासरी 30 ते 60 किमी. उत्तर भागात ही रुंदी 90 ते 95 किमी. तर दक्षिण भागात ही रुंदी 40 ते 45 किमी.
    • क्षेत्रफळ: 30,394 चौ.किमी.

    2. सह्याद्रि पर्वत / पश्चिम घाट :

    • स्थान: दख्खनच्या पठाराचा पश्चिमेकडील न खचलेला भाग म्हणजेच सह्याद्रि होय.
    • यामुळे सह्याद्रि पश्चिमेकडून अत्यंत उंच व सरल भिंतीसारखा दिसतो.
    • पठाराकडून मात्र अत्यंत मंद उताराचा दिसतो.सह्याद्रि पर्वत हा प्राचीन असून या पर्वताची बर्‍याच ठिकाणी झीज झाल्याने कमी – अधिक उंचीची ठिकाणे तयार झाली आहेत. उदा. शिखरे, घाट, डोंगर, उंचीवरील सपाट प्रदेश इ.
     

    महाराष्ट्र पठार / दख्खन पठार / देश :

    • स्थान: महाराष्ट्र राज्यांपैकी एकूण क्षेत्रफळापैकी 90% क्षेत्र महाराष्ट्र पठाराणे व्यापले आहे.
    • लांबी-रुंदी: पूर्व- पश्चिम – 750km. उत्तर- दक्षिण – 700km.
    • ऊंची: 450 मीटर- या पठाराची ऊंची पश्चिमेस (600 मी) जास्त व पूर्वेस (300 मी) कमी आहे.
    • महाराष्ट्र पठार डोंगर रांगा व नद्या खोर्‍यांनी व्यापले आहे. mh%2Bgiography
    जाहिराती
    सराव पेपर
    व्हाट्सअप ग्रुप
    टेलेग्राम
    error: Content is protected !!