Marathi vykaran मराठी शब्दाच्या जाती

    नाम – जे शब्द प्रत्यक्ष किंवा काल्पनिक वस्तूची, वस्तूच्या गुणांची नावे असतात अशा शब्दांना नाम असे म्हणतात.
          उदाहरण – घर, आकाश, गोड
    सर्वनाम – जे शब्द नामाच्या ऐवजी वापरले जातात त्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात.
      उदाहरण – मी, तू, आम्ही
    विशेषण – जे शब्द नामाबद्दल जास्त माहिती सांगतात त्या शब्दांना विशेषण असे म्हणतात.
     उदाहरण – गोड, उंच
    क्रियापद – जे शब्द वाक्यातील क्रिया दाखवतात व त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्या शब्दांना क्रियापद असे म्हणतात.
      उदाहरण – बसणे, पळणे
    क्रियाविशेषण – जे शब्द क्रियापदाबद्दल जास्त माहिती सांगतात त्या शब्दांना क्रियाविशेषण असे म्हणतात.
      उदाहरण – इथे, उद्या
    शब्दयोगी अव्यय – जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात त्या शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.
      उदाहरण – झाडाखाली, त्यासाठी
    उभयान्वयी अव्यय – जे शब्द दोन शब्द किंवा वाक्य यांना जोडतात त्या शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
      उदाहरण – व, आणि, किंवा
    केवलप्रयोगी अव्यय – जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भवन व्यक्त करतात त्या शब्दांना केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.
     उदाहरण – अरेरे, अबब

 

शब्द विकाराचे प्रकार
काही शब्द जेंव्हा वाक्यात वापरले जातात तेंव्हा मूळ शब्दास प्रत्यय लागून त्यात बदल होतो किंवा शब्द जसाच्या तसा वापरला जातो. ज्या विविध कारणामुळे मुळ शब्दात बदल घडतो ती कारणे पाच विभागात मोडतात.

१) वचन    २) लिंग    ३) पुरुष    ४) विभक्ती    ५) काळ
वचन
एखाद्या नामावरून ती वस्तू एक आहे का अनेक आहेत हे कळते त्याला वाचन असे म्हणतात. वाचनाचे एकूण २ प्रकार आहेत.
      एकवचन : ज्या नामावरून त्या वस्तूची संख्या एक आहे असे समजते, तेंव्हा त्या नामाचे वचन एकवचन मानले जाते.
      उदाहरण – अंबा, घोडा, पेढा
     अनेकवचन : ज्या नामावरून त्या वस्तूची संख्या एकपेक्षा जास्त आहे असे समजते, तेंव्हा त्या नामाचे वचन अनेकवचन मानले जाते.
      उदाहरण – अंबे, घोडे, पेढे 
लिंग
एखाद्या नामावरून ती वस्तू पुरुषजातीची, स्त्रीजातीची किंवा भिन्न जातीची आहे हे कळते त्याला त्या नामाचे लिंग असे म्हणतात. लिंगाचे एकूण ३ प्रकार आहेत.
      पुल्लिंग : ज्या नामावरून ती वस्तू पुरुषजातीची आहे असे समजते, तेंव्हा त्या नामाचे लिंग पुल्लिंग समजावे.
      उदाहरण – मुलगा, घोडा, कुत्रा
      स्त्रीलिंग : ज्या नामावरून ती वस्तू स्त्रीजातीची आहे असे समजते, तेंव्हा त्या नामाचे लिंग स्त्रीलिंग समजावे.
उदाहरण – मुलगी, घोडी, कुत्री
      नपुंसकलिंग : ज्या नामावरून ती वस्तू पुरुषजातीची किंवा स्त्रीजातीची आहे हे समजत नाही, तेंव्हा त्या नामाचे लिंग नपुसंकलिंग समजावे.
      उदाहरण – मुल, पिल्लू, पाखरू 
पुरुष
एखाद्या नामावरून बोलणारा , ज्याच्याशी बोलायचे तो व ज्याविषयी बोलयचे त्या सर्व नामाला पुरुषवाचक सर्वनामे म्हणतात. पुरुषवाचक सर्वनामाचे ३ प्रकार आहेत.
      प्रथम पुरुषवाचक : बोलणारा किंवा लिहिणारा स्वतःचा उल्लेख करण्यासाठी ज्या सर्वानामाचा उपयोग करतो त्या सर्वनामाला प्रथम पुरुषवाचक सर्वानाम म्हणतात.
      द्वितीय पुरुषवाचक: : ज्याच्याशी बोलायाचे त्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा उल्लेख करण्यासाठी ज्या सर्वानामाचा उपयोग करतात त्या सर्वनामाला द्वितीय पुरुषवाचक सर्वानाम म्हणतात.
      तृतीय पुरुषवाचक : ज्याच्या विषयी बोलायचे त्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा उल्लेख करण्यासाठी ज्या सर्वानामाचा उपयोग करतात त्या सर्वनामाला तृतीय पुरुषवाचक सर्वानाम म्हणतात.
विभक्ती
वाक्यात येणार्‍या नामांचा व सर्वनामांचा क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबध असतो व हा संबंध दाखवण्या साठी जो नामात किंवा सर्वानामात बदल करतात त्याला विभक्ती असे म्हणतात. विभक्तीचे एकूण ८ प्रकार आहेत.
काळ
क्रियापदावरून ती घटना कधी घडली हे समजते त्याला काळ असे म्हणमा तात. काळाचे एकूण ३ प्रकार आहेत.
      वर्तमानकाळ : ज्या क्रियापदावरूनती घटना आत्ता घडत आहे असे समजते, तेंव्हा त्या क्रियापदाचा काळ वर्तमानकाळ मानला जातो.
      भूतकाळ : ज्या क्रियापदावरूनती घटना आधी घडली आहे असे समजते, तेंव्हा त्या क्रियापदाचा काळ भूतकाळ मानला जातो.
      भविष्यकाळ : ज्या क्रियापदावरूनती घटना पुढे घडणार आहे असे समजते, तेंव्हा त्या क्रियापदाचा काळ भविष्यकाळ मानला जातो. 

 

जात व प्रकारवचनलिंगपुरुषविभक्तीकाळ
नामहोहोनाहीहोनाही
सर्वनामहोहोहोहोनाही
विशेषणहोहोनाहीनाहीनाही
क्रियापदहोहोहोनाहीहो
क्रियाविशेषणहोहोनाहीनाहीनाही
शब्दयोगी अव्ययनाहीनाहीनाहीनाहीनाही
उभयान्वयी अव्ययनाहीनाहीनाहीनाहीनाही
केवलप्रयोगी अव्ययनाहीनाहीनाहीनाहीनाही
 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here