Thursday, February 19, 2026
Home Police Bharti Notes महाराष्ट्र पोलीस भरती प्रशासन बद्दल माहिती

महाराष्ट्र पोलीस भरती प्रशासन बद्दल माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

महाराष्ट्र पोलीस प्रशासन म्हणजे काय?

  • महाराष्ट्र पोलीस प्रशासन हे राज्यातील कायद्याची अंमलबजावणी करणारे व लोकशाही रचनेत सार्वजनिक सुव्यवस्था राखणारे प्रमुख संस्थान आहे.
  • याचे काम म्हणजे राज्यात शांतता, सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे आणि जनतेचा विश्वास जपणे.

संघटनात्मक रचना (Organizational Structure)

  • महाराष्ट्र पोलीस हे भारतातील सर्वात मोठ्या राज्य पोलीस दलांपैकी एक आहे. यामध्ये सुमारे 2 लाखांहून अधिक पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत.

महाराष्ट्र पोलीस प्रशासन याची रचना

पोलीस महासंचालक (Director General of Police – DGP)

  • महाराष्ट्र पोलीस दलाचा सर्वोच्च अधिकारी.
  • मुख्यालय: मुंबई
  • राज्यातील सर्व पोलीस विभागांचे नियंत्रण आणि समन्वय पाहतो.

विशेष महासंचालक (Special DGPs)

  • गुन्हे, कायदा-सुव्यवस्था, वाहतूक, प्रशिक्षण, गुप्तचर, इत्यादी विभागांचे प्रमुख.

अतिरिक्त पोलीस महासंचालक (Addl. DGPs)

  • विविध प्रादेशिक व विशेष शाखांचे प्रमुख (उदा. ATS, Cyber, CID, SRPF इ.).

पोलीस आयुक्त (Commissioner of Police – CP)

  • मोठ्या शहरांमध्ये (मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक इ.) कार्यरत.
  • शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे नियंत्रण.

जिल्हा पोलीस अधीक्षक (Superintendent of Police – SP)

  • ग्रामीण जिल्ह्यांमध्ये पोलीस प्रमुख.
  • जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था, गुन्हे तपास आणि नियंत्रण.

उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP / ACP)

  • उपविभागाचे नियंत्रण.
  • त्यांच्या अंतर्गत काही पोलीस ठाणे येतात.

पोलीस निरीक्षक (PI), उपनिरीक्षक (PSI), हवालदार, पोलीस शिपाई

  • प्रत्यक्ष क्षेत्रातील (Field Level) पोलीस कर्मचारी.
  • लोकांशी थेट संपर्कात असतात, गुन्ह्यांची चौकशी, पहारा, गस्त इ. कामे करतात.

पोलीस प्रशासनातील महत्वाचे घटक-

  • Crime Investigation Department (CID) – गंभीर गुन्ह्यांची चौकशी
  • Anti-Terrorism Squad (ATS) – दहशतवादविरोधी कारवाई
  • State Intelligence Department (SID) – गुप्तचर माहिती गोळा करणे
  • Highway & Traffic Police – रस्ते व वाहतूक नियंत्रण
  • State Reserve Police Force (SRPF) – विशेष दल, आपत्ती व्यवस्थापन
  • Cyber Cell – सायबर गुन्ह्यांची तपासणी
  • Women and Child Cell – महिलांवरील अत्याचार प्रकरणे
  • Training Academies – पोलीस प्रशिक्षण केंद्रे (उदा. नाशिक, पुणे, नांदेड इ.)

महाराष्ट्र पोलीसांची प्रमुख जबाबदाऱ्या

  • कायदा व सुव्यवस्था राखणे
  • गुन्हे शोधणे व रोखणे
  • सार्वजनिक सुरक्षा, दंगल नियंत्रण
  • वाहतूक नियंत्रण
  • महिलांचे, मुलांचे व दुर्बल घटकांचे संरक्षण
  • आपत्ती व दुर्घटनांमध्ये मदतकार्य
  • निवडणूक व विशेष प्रसंगी सुरक्षा व्यवस्था

पोलिस प्रशासन बद्दल माहिती

  • ई-चालान प्रणाली सुरू करण्यात आलेले महाराष्ट्रातील पहिला जिल्हा – नागपुर ग्रामीण पोलीस.
  • ई-चालान प्रणाली म्हणजे वाहतुकीचे नियम मोडणार्‍यांना देण्यात येणारे कागदी चालान ऐवजी ई-चालान प्रणालीचा माध्यमातून पावती देण्यात येईल.
  • भारतात ई-चालान प्रणाली सर्वप्रथम कर्नाटक येथे बंगळुरू पोलिसांनी सुरू केली होती.

महाराष्ट्र पोलीस भरती प्रशासनाची मुख्य जबाबदारी

  • भरती प्रक्रिया नियोजन – प्रत्येक जिल्हा व युनिटमध्ये किती जागा भरायच्या आहेत हे निश्चित करणे.
  • जाहिरात प्रसिद्ध करणे – अधिकृत वेबसाइटवर व वृत्तपत्रांत भरतीची जाहिरात प्रसिद्ध करणे.
  • ऑनलाईन अर्ज प्रक्रिया– उमेदवारांकडून अर्ज घेणे (वेबसाइट: https://policerecruitment2025.mahait.org

पोलिस भरतीसाठी लेखी परिक्षा नक्की वाचा…!

  • महाराष्ट्रातील पहिले सीसीटीव्ही शहर बनले आहे – पुणे
  • महाराष्ट्र शासनाने नक्षलवाद विरोधी अभियानचे मुख्य केंद्र नागपूर येथे उभारले आहे.
  • भारतात सर्वाधिक महिला पोलीस संख्या असणारे राज्य – महाराष्ट्र – 10.5 टक्के
  • देशात सर्वाधिक एकूण राज्याच्या पोलीसामध्ये महिला पोलिसांची टक्केवारी सर्वाधिक असणारे राज्य – तमिळनाडू – 12.4 टक्के.
  • लॉक नसलेले लॉकअप असणारे महाराष्ट्रातील एकमेव पोलीस स्टेशन – शनी शिंगणापूर ता. नेवासा, जि. अहमदनगर.
  • शनी शिंगणापूर हे गाव चोरी न होणारे, दरवाजे नसणारे गाव म्हणून ओळखले जाते.
  • महाराष्ट्रात सीआयडी/राज्य गुन्हे अन्वेशन विभागाचे औरंगाबाद, पुणे, नागपुर व अमरावती हे चार विभाग आहेत.
  • सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी – हैद्राबाद येथे आहे.
  • सीसीटीएनएस/क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम चे महराष्ट्रातील सर्व 1041 पोलीस स्टेशन आणि 638 वरिष्ठ पोलीस अधिकारी कार्यालये जोडण्याचा शुभारंभ 15 सप्टेंबर 2015 रोजी नागपुर येथे करण्यात आला.
  • या प्रकल्पांतर्गत 1998 पासुन चा सर्व गुन्हेगारांचा लेखाजोखा ऑनलाईन उपलब्ध आहे.
  • ऑनलाईन पोलीस स्टेशन एसएसटीएनएस यंत्रणेच्या माध्यमातून करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
  • पोलीस महासंचालक हे महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वोच्च अधिकारी असतात.
  • 21 ऑक्टोबर हा दिवस भारतात पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो.
  • 21 ऑक्टोबर 1959 रोजी जम्मू काश्मिरमधील लड्डाख भागात भारत व चीन सीमेवर चीनी सैनिकांच्या हल्ल्यात 10 केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान शहीद झाले होते. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा दिवस साजरा केला जातो.
  • मुदखेड जि. नांदेड येथे केंद्रीय राखीव पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे.
  • महाराष्ट्राच्या पोलीस लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने 23 ते 31 ऑक्टोबर 2015 दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताह साजरा केला होता.
  • महाराष्ट्रात असणारे एकूण तुरुंग – 53 (9 मध्यवर्ती तुरुंग, 29 जिल्हा तुरुंग, 11 खुले तुरुंग)
  • औरंगाबाद, येरवडा-पुणे , मुंबई, ठाणे, नागपूर, अमरावती, तळोजा- नवी मुंबई, कोल्हापूर हे प्रमुख नऊ मध्यवर्ती तुरुंग/जेल महाराष्ट्रात आहेत.
  • राष्ट्रीय गुप्तचर अकाडमी/नॅशनल इंटेलिजन्स एजन्सी – नवी दिल्ली येथे आहे.

अधिकृत संकेतस्थळ- https://www.mahapolice.gov.in

जाहिराती
सराव पेपर
व्हाट्सअप ग्रुप
टेलेग्राम
error: Content is protected !!