तलाठी भरती 2026 बद्दल संपूर्ण माहिती
महाराष्ट्रात तलाठी भरती जिल्हा निवड समिती अंतर्गत महसूल विभाग व वन विभागा मार्फत तलाठी या पदासाठी 200 गुणांची लेखी परिक्षा घेतली जाते. या परीक्षेसाठी पात्रता, वयोमर्यादा, परिक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम, तलाठी भरती बद्दल माहिती व नेहमी पडणारे प्रश्नांची माहित Talathi Bharti Mahiti Marathi खाली दिलेली आहे.
महत्वाचे- तलाठी पदाच्या नावात बदल करून आता ग्राम महसूल अधिकारी असे करण्यात आले आहे.
तलाठी भरती परिक्षा कशी असते?
जिल्हा निवड समिती : प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती असते. या निवड समितीतर्फे तलाठी (गट- क) या संवर्गातील रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करून अर्हता प्राप्त उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येतात. दर वर्षी या पदासाठी पदवीधर युवक मोठ्या प्रमाणात अर्ज भरतात.
तलाठी भरती शैक्षणिक पात्रता?
तलाठी पदासाठी संवैधानिक विद्यापीठाची पदवी उमेदवाराने धारण करणे आवश्यक असते तसेच शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून जाहीर केलेली अन्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मराठीचे ज्ञान आवश्यक आहे.
संगणक/माहिती तंत्रज्ञानविषयक MS-CIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ही परीक्षा उत्तीर्ण नसल्यास नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षांच्या आत ती प्राप्त करणे आवश्यक राहील.
माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी/ हिंदी विषयाचा समावेश नसल्यास निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी/ हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
तलाठी भरतीसाठी वयोमर्यादा किती असते?
Talathi Bharti Mahiti Marathi
तलाठी भरती पदभरतीचा कार्यक्रम :
- जिल्हा निवड समितीने जाहिरात प्रसिद्ध केल्यापासून लेखी परीक्षा देण्यापर्यंतचा कालावधी 50 ते 60 दिवसांचा असतो.
- जाहिरात प्रसिद्ध होण्याची वाट न बघता विद्यार्थ्यांनी अगोदरपासूनच या परीक्षेची चांगली तयारी केल्यास लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादीत प्रवेश करता येतो.
- तलाठी पदाकरिताही आता हजारो विद्यार्थी अर्ज करतात. त्यामुळे साहजिकच स्पर्धा वाढते. शासनाच्या निर्णयानुसार या पदासाठी आता मौखिक परीक्षा घेण्यात येणार नसून फक्त लेखी परीक्षेच्या गुणाच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
- तलाठी पदासाठी गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी एकूण गुणांच्या 45 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
ग्राम महसूल अधिकारी भरती बद्दल संपूर्ण माहिती
तलाठी भरती परीक्षेचा दर्जा :
तलाठी भरती परीक्षेचे स्वरूप :
तलाठी भरती परीक्षेची तयारी :
Talathi Bharti Information In Marathi
विद्यार्थ्यांना नेहमी पडणारे प्रश्न:

















