पोलीस शिपाई (पोशि/चालक पोशि/सशस्ञ पोशि/बॅण्डस्मन/कारागृह शिपाई) संवर्गात रिक्त असलेल्या पदांची माहिती पाठविणेबाबत परिपत्रक जाहिर! १ जानेवारी २०२६ ते ३० जुन २०२७ पर्यंतच्या रिक्त जागांची माहिती मागवण्यात आली आहे. आगामी भरती प्रक्रियेच्या वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत.
अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, यांचे कार्यालय महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय, शहिद भगतसिंग मार्ग, कुलाबा, मुंबई-4000 01 यांनी दिनांक 11 जून 2026 रोजी प्रकाशित केले आहे ते खालील प्रमाणे-
पोलीस शिपाई (पोशि/चालक पोशि/सशस्त्र पोशि/बॅण्डस्मन कारागृह शिपाई) संवर्गात रिक्त असलेल्या पदांची माहिती पाठविणेबाबत.
उपरोक्त विषयास अनुसरुन सर्व पोलीस घटक प्रमुखांना कळविण्यात येते की, त्यांनी त्यांचे अधिपत्याखालील दिनांक ०१.०१.२०२६ ते दिनांक ३१.१२.२०२६ व दिनांक ०१.०१.२०२७ ते दिनांक ३०.०६.२०२७ या कालावधीत पोलीस शिपाई (पोलीस शिपाई/चालक पोलीस शिपाई/ राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई तसेच बॅण्डस्मन / कारागृह शिपाई) संवर्गात सेवानिवृत्ती, स्वेच्छा सेवानिवृत्ती, प्रतिनियुक्ती, पदोन्नती, जिल्हा बदलीने रिक्त होणारी / झालेली पदांची माहिती सोबत सादर केलेल्या विहित नमुन्यात या कार्यालयास आजच न चुकता या कार्यालयाचे कार्यालय अधीक्षक, श्री. शंकर कुलकर्णी यांचे E-office वरील Shankar B. Kulkarni OS (SBK) O/O TRAINING-DGPMS या युझर आयडीवर कृपया न चुकता पाठवावी, हि विनंती.
PDF फाईल डाउनलोड लिंक:
अशा प्रकारे परिपत्रक जाहीर करण्यात आलेले आहेत. त्यामुळे कोणीही दुर्लक्ष करू नका तयारी जोमाने सुरु ठेवा १००% भरती होणार आहे.















