एमपीएससी राज्य लोकसेवा आयोगामार्फत गेल्या दोन वर्षापासून भरती प्रक्रियानेहमी स्थगित करण्यात आली होती. एमपीएससी मार्फत भरल्या जाणाऱ्या पदांच्या परीक्षांसाठी वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारास आणखीन एक संधी देण्यात येणार आहे, असे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मांडण्यात आला आहे.MPSC कडून भरल्या जाणाऱ्या पदांसाठीची परीक्षा जाहिरात तब्बल दोन वर्षानंतर कारणास्तव प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. वारंवार रद्द करण्यात आलेली परीक्षा व त्यासाठी उमेदवारांनी दाखल केलेले अर्ज यामधील दोन वर्षाच्या काळात विद्यार्थ्यांचे वयोमर्यादा ओलांडून नुकसान होत आहे.

 

मागील दोन वर्षासाठी उमेदवारांना येणाऱ्या नवीन जाहिराती मध्ये वयोमर्यादा वाढवून देण्यात यावी अशी मागणी सर्व ठिकाणी करण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षणा विषयक मंत्रिमंडळ उपसमिती चे अध्यक्ष माननीय अशोक चव्हाण यांनी याबाबत मंत्रिमंडळात वयोमर्यादा वाढवून देण्यात यावी असा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडला आहे. यावर राज्य सरकार सकारात्मक असून मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत याचा निर्णय होणे अपेक्षित आहे असे त्यांनी सांगितले आहे.

स्त्रोत - लाकमत ईपेपर

आर्थिक दृष्ट्या दुर्बल मागास प्रवर्गात व खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादा 38 वर्षे आहेत तर अन्य राखी उमेदवारांसाठी ती 43 वर्षे इतकी आहे या वयोमर्यादेत मध्ये मागील दोन वर्षातील परीक्षा न देऊ शकणार्‍या व वयोमर्यादा ओलांडणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा विधी व न्याय विभागाचे मत स्पष्ट करून पुढील बैठकीत यासंबंधीचा प्रस्ताव जाहीर करण्यात यावा असे निर्देश माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासनाला दिले आहे.