घड्याळ वेळ व प्रतिमा

प्रतिमा ओळखणे उपक्रम

  1. विद्यार्थ्यांना आरसा स्वतः वापरून सुरवातीला …अंक , इंग्रजी अद्याक्षर , भुमीती आकृत्या कशा दिसतात याचे निरीक्षण करायला लावावे.

  2.  प्रत्यक्ष आकार व आरश्यातील किंवा पाण्यातील प्रतिमा …नेमका बदल शोधने

  3.  आरश्यात जसेच्या तसे दिसणारे अक्षर शोधणे …मुले आवडीने हा उपक्रम करतील.

एकूण  11 अक्षरे आहेत जे  आरश्यात बदलत नाहीत .
>  A  , H , I , M , O , T , U , V
W , X  Y
👆🏼👆🏼👆🏼👆🏼 हे अक्षर असेच आरश्यात दिसतील .
_______________________________
घड्याळ वेळ आरश्यात 

उदाहरणार्थ  – घड्याळात 4: 40 ही वेळ आरश्यात पाहिली तर किती दिसेल  ??

स्पष्टीकरण –
यासाठी अगदी सोपे सुञ आहे .  दिलेली वेळ 11:60 मधुन वजा करणे.

11 : 60
–     4 : 40
————-
7 : 20

म्हणून  4: 40 ही वेळ आरश्यात 7:20  अशी दिसेल.
————————————————–
दोन आरश्यात प्रतिमा किती
दोन आरश्यातील कोन दिला जातो व प्रतिमा किती तयार होतील असा प्रश्न विचारतात .

सुञ  –

आरश्यातील एकूण प्रतिमा
360°
=  ———————–  –  1
दोन आ. कोन

उदाहरणार्थ –
दोन आरश्यात 30° चा कोन असेल तर एकूण प्रतिमा किती मिळतील ?
स्पष्टीकरण –

एकूण प्रतिमा संख्या
360
=  ———————-  –   1
दोन आ. कोन
360
=  —————-  –   1
30

=  12  –  1   = 11

म्हणून  11 प्रतिमा तयार होतील.