नांदेड जिल्हा माहिती मराठी

नांदेड – एक दृष्टीक्षेप :
महाराष्ट्र राज्यात दक्षिण टोकाला तेलंगाणा राज्याच्या सीमेलगत नांदेड जिल्हा वसलेला आहे. “नांदेड” या नावाचा उगम “नंदी-तट” या शब्दामधून झालेला असून, “नंदी” म्हणजे भगवान श्री शंकराचे वाहन आहे आणि “तट” म्हणजे पवित्र गोदावरी नदीचा काठ, नंदीने गोदावरी नदीच्या किनार-यावर तपस्या केली असल्याची आख्यायिका आहे. आज नांदेड जिल्हा हुजूर साहेब नांदेड या नावाने प्रख्यात झाला आहे, शीख धर्माचे गुरु श्री गुरु गोविंद सिंघजी महाराज यांनी सन १७०५ मध्ये या ठिकाणी आपला देह ठेवला.
नांदेड हे सन १७२५ मध्ये हैद्राबाद संस्थानाचा हिस्सा झाले आणि १९४७ नंतर भारताच्या स्वातत्र्यानंतरही निजाम संस्थाने आपले स्वतंत्र अस्तित्व राखल्याने नांदेड हैद्राबाद संस्थानाचाच हिस्सा बनून राहीले. हैद्राबाद संस्थानाविरुद्ध केलेल्या भारत सरकारच्या पोलीस कारावाईनंतर १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारत देशात समाविष्ट झाले.
प्राचीन राजवंश :
इसवीसन पुर्व सहाव्या शतकाच्या सुमारास महाराष्ट्रातील विविध प्रदेश अश्मक, कुंतल, मलक, अपरांता, ऋषिक नावाने संबोधिले जाऊ लागले. नांदेड भोवतीच्या प्रदेशाचा समावेश त्याकाळी विदर्भात होत असे. या भागाची दक्षिण सीमा गोदावरी नदीपर्यंत होती. नांदेड हे नावच मुळी गोदावरीशी निगडीत आहे. नदीच्या काठावर वसलेले म्हणुन नांदीकट, नंदिकड आणि नांदीकट या संस्कृत शब्दापासुन नांदेडची व्युत्पती होते. गोदावरीच्या दोन्ही तीरावर वसलेले म्हणुन नंदीकट. नांदेडचा उत्तरेकडील नंदवंशाच्या कारकिर्दीशी संबंध असावा, “नवनंदडेरा“ यापासून नांदेड झाले असावे.
राजकीयदृष्ट्या सुमारे ४०० पेक्षा अधिक वर्षापर्यंत नांदेडचा परिसर सातवाहनांच्या साम्राज्यात होता. सातनाहनानंतर इ.स. २५० चे सुमारास वाकाटकांनी राज्य केले. या घराण्यातील विन्ध्यशक्ती याने विदर्भात राज्य स्थापिले. व्दितीय रुद्रसेन या वाकाटक राजाची अग्रमहिषी प्रभावती गुप्त ही व्दितीय चंद्रगुप्ताची कन्या होती. प्रथम प्रवरसेन हा या घराण्याचा सर्वश्रेष्ठ राजा. तो पराक्रमी होता. साहित्यिक आणि प्रजाहितदक्ष होता. याने ६० वर्षे राज्य केले. दख्खनच्या फार मोठया भागावर यांचे अधिपत्य होते. वाकाटकांनंतर दक्षिण भारताच्या कांही भागांवर राज्य करणारे घराणे “बदामीचे चालुक्य“ म्हणुन संबोधिले जाते. यांची राजधानी कर्नाटकाच्या विजापूर जिल्ह्यातील वातापी (बदामी) येथे होती म्हणुन याला “बदामीचे चालुक्य घराणे” असे म्हणतात. या घराण्याच्या लेखात नांदेडचा “नंधाल” असा उल्लेख आढळतो.
नांदेडचे परिसराचे भाग्य राष्ट्रकूटांचे काळ उजळले होते तेवढे व तसे भाग्य आजतागायत त्याच्या नशिबी आले नाही, बदामीच्या चालुक्यानंतर “लत्तलूरपुरवराधि वर” असे स्वत:ला म्हणवुन घेणार्‍या राष्ट्रकूटांचे राज्य आले ते सुमा २०० वर्षे टिकले. राष्ट्रकूटांनी त्याच काळात कंधारला राजधानीचा मान मिळवुन दिला.
राष्ट्रकूटांनंतर या भागावर राज्य केले ते कल्याणीच्या चालुक्य वंशीय राजांनी, महाराष्ट्राच्या अन्य कुठल्याही प्रदेशापेक्षा नांदेड आणि उस्मानाबाद या जिल्ह्याशी या घराण्याचा निकटचा संबंध होता. या काळात या परिसरात कितीतरी मंदिरे उभारली गेली. पैकी होट्टल, मुखेड, खानापूर, बार्‍हाळी, सुगांव, एकलारे, येशगी, सगरोळी, संगम करडखेड, तडखेल इत्यादी ठिकाणच्या मंदिरांची माहिती मिळते.
कंधारपुरला राजधानी स्थापणारे राष्ट्रकूट पूढे कल्याणी चालुक्यांचे मंडलिक म्हणुन अकराव्या शतकात राहत होते. कल्याणीच्या चालुक्यांचे राज्य चालू असता या घराण्याच्या राज्यकालामुळे त्यात मध्येच खंड पडला. प्रस्तुत घराण्याला मराठवाड्याचे कलचुरी असे म्हणता येईल.
महाराष्ट्रभर केवळ नव्हे तर त्या बाहेरच्या विस्तृत प्रदेशावर राज्य करणारे हे यादवांचे घराणे, महाराष्ट्र महोदयाच्या इतिहासाच्या उष:काली सातवाहनांचे साम्राज्य जेवढ्या मह्त्वाचे होते तेवढेच प्रचीन काळच्या शेवटी या यादव घराण्याचे महत्त्व होते. सहाजिकच संपूर्ण नांदेड परिसर त्यांच्या अधिपत्याखाली होता. पांचव्या भिल्लमाने देवगिरी हे नगर वसलिले आणि तेथे आपली राजधानी हलविली. तेव्हां पासून मराठवाडा मह्त्वाचा ठरला. कृष्णेच्या उत्तरेकडील सारे राज्य. याच्या ताब्यात होते. रट्ट घराण्याच्या बल्लाळाची अमर्दकपूर (औंढा जि.हिंगोली) येथे राजधानी होती आणि उपराजधानी होती अराध्यपूर (अर्धापूर जि.नांदेड) येथे, या ठिकाणी बल्लाळाचा सेनापती चालुक्य याचा निवास असे.
मध्ययुगीन इतिहास :
सन.१३१८ मध्ये यादवांचे राज्य कायमचे बुडले. महाराष्ट्र मुसलमानी सत्तेचा अमंल सुरू झाला. नांदेड परिसर त्याला अपवाद नव्हता. इसवी सन. १२९६ पर्यंत नांदेड परिसरावर देवगिरीच्या यादवांचा प्रभाव होता. यादवांच्या सत्तेचे एक प्रमुख ठाणे नांदेड नजिकच्या अर्धापूरात होते. हे अर्धापूर म्हणजे यादवकालीन आराध्यपूर. १४ व्या शदकाच्या प्रारंभी घडलेल्या या राजकीय स्थित्यंतराचे दूरगामी परिणाम महाराष्ट्राच्या आणि दख्खनच्या इतिहासावर झाले. अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणाने राजकीय संघर्षाचे एक नवे पर्व दख्खन पठारावर झाले.
आजच्या नांदेड जिल्ह्याचा मध्ययुगीन इतिहास एकुण दख्खन पठारावरील राजकीय घडामोडीशी प्रत्यक्ष संबंध ठेवून होता. मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश या भूप्रदेशात घडणार्‍या संघर्षाचे पडसाद नांदेड घेण्याअगोदर दख्खन पठारावरील राजकीय स्थित्यंतरे समजुन घेणे अगत्याचे आहे. इसवी सनाच्या तेराव्या शतकापर्यंत मराठवाड्याचा वरिसर म्हणजेचे महाराष्ट्रातील गोदा खोरे, संपन्न अशा राजसत्ताचे माहेरघर होते. इसवीसन पूर्व ५ व्या शतकातील अश्मक आणि मूलक ही दोन्ही महाजनपदे या परिसरातील, त्यानंतर अनुक्रमे सातवाहन, वाकाटक, पुर्वचालुक्य, राष्ट्रकुल, उत्तरचालुक्य, यादव शिलाहार, कलचुरी या राजसत्तांच्या कालखंडात या परिसराने आर्थिक संपन्नता, राजकीय स्थैर्य, प्राचिन व्यापार उदीम उपभोगली. मोठ मोठी व्यापारी शहरे इथे उदयाला आली. अप्रतिम कालाविष्कार घडविले. द-याखो-यातून सह्याद्रीच्या कड्याकपारीतून अप्रतिम कला अविष्कार घडविले होते. या कला अविष्काराला उदार हस्ते मदत करणारे संपन्न व्यापारी इथे होते. राजघराण्याच्या कोषागारात अमित संपती होती. इथल्या संपन्नतेच्या कथा अरब व्यापार्‍यामार्फत सर्वदूर पसरल्या होत्या. १३ शतकात हे सारे बदलू लागले. पराकोटीचा सत्तासंघर्ष सुरु झाला. त्याची झळ नांदेड जिल्ह्यालाही बसली. या संघर्षाबरोबरच प्रशासन व्यवस्थेतही बदल घडले, नवी सुभेदारी व्यवस्था उदयास आली. इ.स. १३४६ साली दिल्लीच्या सलतनतीने दख्खन पठारावर चार सुभे निर्मीले. नांदेडचा समावेश या सनतनती सुभ्यामध्ये झाला. नांदेड जिल्ह्याचा समावेश व-हाड आणि बिदर तरफेत झालेला होता. सफदरखान सिस्तानी हा व-हाड तरफेचा तरपफदार होता. सत्तासंघर्षाचे नांदेड परिसरातील आणखी एक केंद्र होते माहुर, येथला डोंगरी किल्ला अनेक लढ्याचा साक्षीदार आहे. या किल्ल्याच्या परिसरात खरे तर गोंडाचे राज्य होते. गोंड हे दख्खनच्या पठारावरील वनक्षेत्राचे खरे राजे, तुघलक आणि बहमनी सत्तांच्या विस्ताराला गोंडांनी सतत विरोध केला. नांदेड जिल्ह्यातील खेरलाचा गोंड राज नरसिंगदेव हा देखील अनेक वर्षे बहमनीशी लढत राहिला. महमनी सलतनतीचा वजीर महंमद गवान याने बहमनी राज्याची प्रशासकीय पुर्रचना करण्याचे काम हाती घेतले. या महंमद गवानचे लष्करी ठाणे नांदेड शहराच्या परिसरातच होते. त्याची आठवण म्हणुन आजही नांदेडमध्ये वजिराबाद नावाची वस्ती आहे. या वजीर महंमद गवानने केलेल्या प्रशासकीय सुधारणेत बहमनी राज्याचे चार तरफ रद्द करण्यात येऊन आठ नवे सुभे निर्माण करण्यांत आले. या पुनर्रचनेनुसार आजचा नांदेड जिल्हा माहुर सुभ्याचा भाग बनला. नांदेड जिल्हा आकाराला यायला लागला तो येथपासून.
महंमद गवानच्या विरुध्द राजदरबारात मात्र बरेच राजकारण घडले इ.स. १४८१ साली या राजकीय कट कारस्थानचा परिणाम वजीर महंमद गवानच्या मृत्युत झाला. त्याला देहदंड देण्यापर्यंत सलतनतीतले कटकारस्थान पोहोचंले. पराकोटीचा सत्तासंघर्ष सगळीकडे चालु होता. १४८२ साली सुलतान महमंदशाह तिसरा बहमनी मृत्यु पावला व त्याचा १२ वर्षाचा मुलगा महमुदशाहा अल्पवयीन राजा म्हणून सत्तेवर आला. सलतनतीतील सारी सत्त कासीम बरीदने आपल्या हाती घेतली व पालनकर्ता राजा म्हणून तो कारभार पाहु लागला. नांदेड जिल्ह्यातील कंधारचा किल्ला हा कासीम बरीदचे प्रमुख लष्करी ठाणे बनला. इसवीसन १५२६ साली तिकडे दिल जहिरुद्दीन मुहंमद बाबरने मुघल सत्तेची स्थापना केली ही मुघलसत्ताही दख्खनच्या सत्ता्संघ येऊन उतरली. अहमदनगरच्या निजामशाहीत समाविष्ट असलेला व-हाड सुभा आणि त्यातला नांदेड जिल्हा इ.स. १५९६ मध्ये मुघलांच्या राज्यात समाविष्ट झाला. गेली तिनशे-साडेतिनशे वर्षे चाललेला स्थानिक मुस्लीम सलतनतीचा संघर्ष संपला आणि नांदेड जिल्हा पुन्हा दिल्लीपतीच्या अधिपत्याखाली आला.
१७ व्या शतकातील नांदेड :
१७ व्या शतकातील नांदेड जिल्ह्याचा इतिहास म्हणे अहमदनगररची निजामशाही आणि मुघल सत्ता यांच्यातल्या संघर्षाची गाथा होय. दोन आडीच दशके हा संघर्ष चालला. १६३२ साली दौलताबादही मुघलांच्या ताब्यात आले. निजामशाहीतील कंधार आणि दौलाताबाद सारखी प्रमुख लष्करी ठाणी पडल्यामुळे मुघलांचा प्रभाव वाढला. नांदेड हे सुभ्याचे प्रमुख ठिकाण झाले. नांदेडच्या किल्यातून सुभ्याचा कारभार होऊ लागला. छत्रपती शिवरायांनी सामान्य रयतेचा विश्वास जागवला. त्याना लढण्याचे सामर्थ्य दिले. सत्तेचा उपभोग स्वत:च्या स्वार्थासाठी करण्यांच्या या मध्ययुगीन कालखंडात काळाची चौकठ भेदुन लोककल्याणाचा विचार करणारे मराठी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजानी निर्मीले. मुघल-मराठा संघर्षातील लक्षणीय अशी लढाई नांदेड जिल्ह्यात झाली नसली तरी उभय पक्षाच्या पक्षाच्या फौजानी नांदेड परिसरात घोडदौड मारली. १६७० साली व-हाडवरील चढाईच्या वेळी शिवाजी महाराज नांदेडला आले होते. इ.स. १६५८ साली औरंगजेब मुघल सम्राट बनला. इ.स. १६८६ साली मुघलांनो विजापूर जिंकले. विजापुरची आदिलशाही आणि गोवलकोंड्याची कुतूबशाही या दोन सलतनतीच्या पाडवानंतर औरंगजेबाने मराठ्यावर सगळे लक्ष केंद्रीत केले. कंधारचा आपला लष्करी तळही मजबुत केला हमिदुद्दीनखान या किल्लेदाराने याच काळात कंधारच्या किल्यावर आपला तळ ठोकला, मुघल-मराठा संघर्ष तीव्रतर बनत चालला. हा संघर्ष चालू असतांना नांदेड परिसरातील सामान्य रयतेचे जिव अत्यंत हालाखीचे झाले होते. अनेक लोक स्थालांतरीत होऊ लागले. याच काळात नांदेड मधील कांह घराणी काशी प्रयाग अशा तिर्थक्षेत्री स्थलांतरत झालेली दिसतात. १८ व्या शतकातील संघर्षही मुख्यत: मुघल आणि मराठा यांच्यातला सत्तासंघर्ष होता.
loading…

 

श्री गुरुगोविंद सिंघाची नांदेड भेट :
इ.स. १७०४ च्या नंतर मुघल–मराठा संघर्ष अशा वळण येऊन पोहोचला की मुघलांचा पराजय स्पष्टपणे जाणवावा. मराठ्यानी दख्खन पठारावरील आपली सारी ठाणी परत मिळवली. आजचा नांदेड जिल्हा त्याकाळातल्या नांदेड आणि माहूर जिल्ह्यात विभागलेला होता. त्यातले माहुर हे वर्‍हाड सुभ्यात समाविष्ट होते तर नांदेड समावेश बिदर सुभ्यात झालेला होता. नांदेडची विभागणी ३० परगण्यात आणि ९४९ गावात झाली होती तर माहूर जिल्ह्यात २० तालुके- परगणे आणि ११४१ गावं होती. राजकीय सत्तासंघर्षाच्या या धामधुमीत नांदेड शहराला अन्यनयसाधारण मह्त्व प्राप्त करुन देणारी एक लक्षणीय घटना घडली. या घटनेचे महत्व स्थानिक नांदेड पुरते मर्यादित न राहता भारतीय इतिहासात नांदेडला एक आगळे स्थान प्राप्त करुन देणारी ही घटना आहे. एका नव्या युगाचा प्रारंभ झाल्याची साक्ष नांदेड परिसर देत होता. आज पासून तीनशे वर्षापूर्वीची श्री गुरुगोविंद सिंघाची नांदेड भेट ही घटना केवळ त्यांच्या अंतकाळापुरती मर्यादत राहत नाही तर गुरु ग्रंथसाहिबच्या रुपात झालेल्या तत्वचिंतनाची ती मुहुर्तमेढ ठरते. शिखधर्मासंबंधीचे कांही मह्त्वपुर्ण हुकूम नांदेड मुक्कामाहून निघाले आहेत. त्यामुळे नांदेडला एक आगळे मह्त्व आहे. १७२४ च्या आक्टोबर महिन्यात मुघल आणि निजामी सैन्यात साखरखंडी येथे मोठी लढाई झाली. दख्खनचे सहा मुघल सुभे निजामच्या ताब्यात आले. मुघल साम्राज्याचा सुभेदार म्हणुन निजामाने दख्खनचे सुभे ताब्यात घेतले असले तरी प्रत्यक्षात साखरखंडी येथील लढाईतील विजयामुळे मुघलाना पराभूत करुन चिन कुलीखान निजाम-उल् मुल्कने आपले स्वतंत्र राज्यच अस्तित्वात आणले होते. या स्वतंत्र राज्याचा कारभार औरंबादेतुन पाहिला जाऊ लागाला. नांदेड जिल्हा आता मुघलाच्या वर्चस्वातुन बाहेर पडला आणि स्वतंत्र निजामी राज्याचा भाग बनला कालांतराने निजामी राज्याची राजधानी, हैद्राबादला स्थलांतरीत झाली.
इ.स. १७२४ मधला नांदेड जिल्हा म्हणजे नांदेड सरकार खुप विस्तृत होते. आजचा नांदेड जिल्हा,अदिलाबादद आणि निजामाबाद जिल्हा हा सारा परिसर मिळुन हे नांदेड सरकार बनले होते. या काळात इंग्रज आणि फ्रेंच व्यापारी आपल्या फौज दख्खनच्या राजकारणात उतरले होते.
आधुनिक काळ :
महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये सन.१८१८ पासून आधुनिक काळाची सुरुवात मानावी लागते. या एतद्देशीय सत्तेचा अस्त होऊन पेशवाई संपुष्टात आली व ब्रिटीस राज्य स्थिरावले. इ.स. १८५३ साली इंग्रज आणि निजाम यांच्यात एक नवा करार झाला. या करारान्वये हैद्राबादच्या निजामाने आपल्या राज्यातला पन्नास लाख शेतसारा वसुल करता येण्याजोगा भूप्रदेश इंग्रजाच्या ताब्यात द्यायचे कबुल केले. त्याअन्वये सारा विदर्भ सरकार हा विभाग इंग्रजांचा बराचसा बाग आणि नांदेड परिसरातील हदगांव, माहुर, किनवट हा भाग मात्र हैद्राबाद राज्यातच राहिला. अशा प्रकारे हदगांव, माहूर, किनवट हे भाग विदर्भ सरकारातून नांदेड सरकारात दाखल झाले. नांदेड जिल्ह्याच्या दृष्टीने हा बदल लक्षणीय आहे. नबाब सालारजंगने ही गुत्तेदारी पध्दत आणि शेतसारा वसुलीच्या इतर पध्दती बंद करुन एक नवी शेतसारा पध्दत, जिल्हाबंदीपध्दती अंमलात आणली. रोव्हेन्यू सर्वे अँन्ड सेटलमेंट डिपार्टमेंट स्थापन करण्यांत आले. शेतसारा वसुलीसाठी शासकीय महसुल यंत्रणा निर्माण करण्यांत आली. १८८१ च्या दरम्यान आठ तालुक्यांचा नांदेड जिल्हा आकाराला आला आणि औरंगाबाद सुभ्याचा भाग बनला. १८८५साली सुभेदार पद पुन्हा निर्माण झाले आणि ते १९४९ पर्यंत कायम होते. जिल्हा प्रशासनाचा प्रमुख म्हणुन तालुकापद निर्माण झाले ते १९४९ पर्यंत कायम होते. तालुका पातळीवर तहसिलदार पद होते. जिल्हा प्रशासनात नायब तालुकदार,पेशकार, शिरस्तेदार अशी कांही पदेही होती. हैद्राबाद शहरात १८५५ साली स्टेट बँक काढण्यांत आली. अधुनिक बँकींग व्यावस्था सुरु झाली. कालातंराने निजामी राज्यातल्या कांही गावांत स्टेट बँकेच्या शाखा निघाल्या. नांदेड जिल्ह्यातील उमरी या बाजारपेठत अशीच एक शाखा उघडली गेली. हैद्राबाद राज्याची राजभाषा फार्शी होती, फार्शी शिक्षण देणारे मदरसे कांही ठिकाणी होते. १८६८ साळी नांदेडलाही एक फारसी मदरसा निघाली. इ.स.१८८४ मध्ये फार्शी एेवजी उर्दुला राजभाषेचा मान मिळाला. शिक्षणाचे माध्यम उर्दु झाले. इग्रजांच्या प्रभावातुन दळणवळणाची साधने वाढली. हैद्राबाद ते वाडी पर्यंत रेल्वे सुरु झाली. इ.स. १९०० साली नांदेड या गावात रल्वे आली. हैद्राबाद-मनमाड असा मिटर गेज रेल्वे मार्ग पुर्ण झाला. आणि या रेल्वेमार्गावरील एक रेल्वे स्टेशन नांदेड गावाजवळ उभारले गेले. १९४२ च्या चलेजाव आंदोलनाचेही असेच पडसाद राज्यात उमटले. स्वामी रामानंद तिर्थानी या आंदोलनाच्या दृष्टीने संघटन कार्य सुरु केले. हैद्राबाद राजकारणाची पावले आझाद हैद्राबादच्या दिसेने पडु लागली होती. हैद्राबादच्या निजामाची भूमीकाही या वाटचालीला पुरक होती.
 
मुक्तिसंग्राम पर्व :
१६ ऑगस्ट  १९४६ रोजी स्टेट कॉंग्रेससाची बैठक हैद्राबादला संपन्न झाली. कॉंग्रेस मधला जहाल गट प्रभावी पणे सक्रिय झाला. रझाकाराच्या आक्रमक पवित्र्यामुळे आता जीवनमरणाचा अंतिम संघर्ष पुढे दिसत होता. १९४६ च्या अखेरीस महाराष्ट्र परिषदेचे हैद्राबाद स्टेट कॉंग्रेस मध्ये विलीणीकरण झाले. हैद्राबाद स्टेट कॉंग्रेससाचे पहिले अधिवेशन मुझीराबाद येथे १६ ते १८ जुन या काळात संपन्न झाले. स्वामी रामानंद तिर्थाची स्टेट कॉंग्रेससचे पहिले अध्यक्ष म्हणुन निवड झाली. त्यानी या अधिवेशनातच निजामाच्या आझाद हैद्राबाद विरुध्दच्या आणि प्रस्तावित स्वतंत्र भारतातल्या हैद्राबादच्या विलीनीकरणाच्या अंतिम लढ्याचे रणसिंघ फुंकले.
१५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र होणार या पार्शभुमीवर हैद्राबादच्या निजामाने राज्यातल्या रयतेवर अनेक निर्बध लादले.सभा बंदी, भाषण बंदी, हिंदी संघराज्याच्या म्हणजेच तिरंगा झेंड्यावर बंदी अशा अनेक प्रकारच्या बंदी लादणारे फर्मान काढले गेले. स्वतंत्र होऊ घातलेल्या भारताचा तिरंगा ध्वज हा हैद्राबाद राज्यात परकीय ध्वज ठरवला जाऊन  तो ध्वज फडकवणार्याणस राजद्रोही मानले गेले. अशा अवस्थेत स्वतंत्र भारतात विलीन होऊ इच्छिणारी राज्यातली ८५% जनता अधिकाधिक अस्वस्थ होत गेली. असंतोष भडकत गेला. विलिनीकरणाच्या मागणीने उग्र अशा आंदोलनाचे रुप धारण केले.इंग्रजांनी भारतसोडुन जायचे ठरवले त्याच्या ताब्यात असलेल्या भारताला स्वातंत्र्य मिळणार ही गोष्ट स्पष्ट झाली. त्याचबरोबर भारतातल्या ५६५ राजांनाही इंग्रजांनी स्वातंत्र्य द्यावयाचे ठरवले, याचा अर्थ हैद्राबादच्या निजाम उस्मान अलीला स्वातंत्र्य मिळणार होते. १५ आगस्ट १९४७ भारताला स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा या स्वातंत्र्य प्राप्तीचा निखळ आनंद नांदेड परिसरातील लोकांना उपभोगता आला नाही. सार्या  हैद्राबाद राज्यातच पोलिसांचा रझाकराचा ससेमिरा चुकवत तीर फडकावण्याचे प्रयत्न झाले. तिरंगा फडकवणार्याी कार्यकर्त्याना राज्यद्रोही ठरवुन तुरुंगात डांबण्यात आले. विलिनीकरण दिन म्हणुन हा दिवस साजरा झाला.
१५ सप्टेंबर १९४७ पर्यंत राज्यभरात आंदोलनाने व्यापक स्वरुप धारण केले होते. हैद्राबाद राज्य पुरभिलेखागारातील उपलब्ध कागदपत्रातून तुरुंगात डांबलेल्या १९४८ च्या ऑगस्ट सप्टेबर महिन्यात हैद्राबाद राज्यातली परिस्थिती दिवसेन् दिवस तणावपुर्ण बनत गेली. रझाकाराचे अत्याचार वाढत गेले. १३ सप्टेंबर १९४८ या रोजी स्वतंत्र भारताच्या फौजा हैद्राबाद राज्यात शिरल्या आणि     “आपरेशन पोलो” सुरु झाले. चार दिवसात हैद्राबादच्या सैन्याने शरणागती पत्कारली, हैद्राबाद सैन्याचा सेनापती अल् इद्रुसने शरणागती पत्कारली आणि हैद्राबादेत तिरंगा फडकला. नांदेडच्या अव्वल तालुकदार कार्यालयावरही तिरंगा फडकला. हळुहळु स्थित्यंतर घडु लागले. अव्वल तालुकदाराच्या जागी नांदेडलाही कलेक्टर आला. मध्ययुगीन निजामी सलतनतीच्या कारभाराचे रुपांतर अधुनिक पजासत्ताकीय यंत्रणेत होऊ लागले. प्रत्येक जिल्ह्यासाठी नागरी प्रशासक, जिल्हा पोलीस प्रमुख नेमला गेला. लष्करी प्रशासनाचा काळ संपल्यानंतर नागरी प्रशासकाच्या जागी कलेक्टर नेमले गेले.
राज्य पुनर्रचना आणि महाराष्ट्र राज्य निर्मिती :
१९२० साली अखिल भारतीय कॉंग्रेसने घटनेच्या पहिल्या मसुद्यातच भाषावार प्रांत रचनेचा विचार समाविष्ट केला होता. १९५५ साली फाजलअली अहवाल सादर झाला. व्देभाषीक मुंबई राज्य अस्तित्वात आले. हैद्राबाद राज्याचे विभाजन झाले. मराठवाडा मुंबई राज्यात समाविष्ट झाला. नांदेड जिल्ह आता हैद्राबाद राज्यातून मुंबई राज्यात समाविष्ट झाला. १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला. मुंबई प्रांताचे विभाजन होऊन गुजरात आणि महाराष्ट्र ही दोन राज्ये निर्मीली गेली.
आता नांदेड जिल्हा महाराष्ट्र राज्याचा भाग बनला. अत्यंत संथ गतीने वाटचाल करणारे मध्ययुगीन सलतनतीतले नांदेड आता झपाट्याने बदलु लागले. नंदीतटांचे नांदेड आता लहान गावठाण राहीले नाही, शहर बनले, पाहता पाहता शहराचा विस्तार घडत गेला आणि नांदेड- वाघाला महानगरपालीका अस्तित्वात आली. संपुर्ण जिल्ह्यात मिळुन एक हायस्कुल असलेल्या नांदेडात स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापिठ स्थापन झाले. अनेक महाविद्यालये निघाली. मेडीकल, इंजिनिअरीग,लाँ,फार्मसी अशा विविध विद्याशाखांचे शिक्षण देणारी महाविद्यालये अस्तित्वात आली. नांदेड जिल्ह्याने मध्ययुगीन मागसलेपणाची कात टाकुन २१ व्या शतकाकडे वाटचाल सुरु केली आहे.
tmp 21733 Nanded%2BDistrict%2Bmpsckida.com 133661366